मंदिरे उघडण्यासाठी कोपरगावात भाजपाचा शंखनाद
मागीलदोन वर्षापासुन करोना महामारीचे संकट आलेले आहे, यामुळे सर्व धार्मिक देवस्थाने पुर्ण पणे बंद केलेली आहेत. परंतु या धार्मिक स्थळावर उदरनिर्वाहासाठी अवलंबुन असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावण महिन्यात सर्व देवस्थानके बंद आहेत. जग विख्यात असलेले श्री साईबाबा मंदिरही बंद असल्याने अनेक लाखो कुटुंबीयांचा रोजगार गेला, रिक्षा, फुल, आदीं व्यावसायिक घटकांचे जीवनमान पूर्ववत होण्यासाठी सर्व मंदिरे तात्काळ उघडावे अशी मागणी कोपरगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष साहेबराव रोहोम व शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केली.
श्री.साहेबराव रोहोम पुढे म्हणाले की, ज्यांची उपजिवीका या धार्मिकस्थाळावर अवलंबुन आहे त्यांच्या पढे अनंत प्रश्न उभे राहिले. या महाभकास आघाडी सरकारच्या गलिच्छ कारभारामुळे एस.टी. च्या कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याच्या भाजीपाला,दुध इत्यादीं कोणत्याही उत्पादनाला भाव नाही. या सरकारचा निषेध म्हणुन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष व प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मीक सेलच्या वतीने कोपरगांव शहरातील विघ्नेश्वर चौक येथील गणपती मंदिरा समोर नुकतेच शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, बाळासाहेब नरोडे, विजयराव आढाव, विनोद राक्षे, कैलास खैरे, आर.डी.सोनवणे, उपनगराध्यक्ष अरीफ कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, युवामोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, ओ.बी.सी. मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक राउत, तालुका सरचिटणीस दिपक चौधरी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष खालीकभाई कुरेशी, नरेंद्र डंबीर, अशोक लकारे, गोपी गायकवाड, किरण सुर्यवंशी, असिफभाई शेख, विजय चव्हाणके, दौलतराव लटके, जिल्हाध्यक्ष कामागार आघाडी सतिष चव्हाण, संदिप वाकचौरे, महेश गोसावी, जॅकी दिगवॉ, रोहन दरपेल, अनु.जाती शहराध्यक्ष शंकर बिऱ्हाडे, शरद त्रिभुवन, बाळासाहेब राउत, रविंद्र रोहमारे, सचिन दिनकर, मनोज इंगळे, विशाल गोर्डे, प्रशांत संत, अर्जुन मोरे, नरेंद्र लकारे, जगदीश मोरे, दादाभाऊ नाईकवाडे, फकिरमंहमद पहिलवान, सुजल चंदनशिव, रविंद्र लचुरे, पुरुषोत्तम जोशी, जयेश बडवे, अनिल गायकवाड, विष्णुपंत गायकवाड, इलियास खाटीक,सत्येन मुंदडा, संतोष नेरे, राहुल बहादुरे, सोमनाथ म्हस्के, भानुदास पवार, कैलास माकोणे, सोमनाथ अहिरे, सोमनाथ ताकवाले आदी सर्व आघाड्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment