श्रीमान गोकुळचंद विदयालयांत 'राष्ट्रीय क्रीडा दिन' उत्साहाने संपन्न


कोपरगाव प्रतिनिधी

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन *राष्ट्रीय क्रीडा दिन* म्हणून श्री गो विदयालयात  उत्साहाने संपन्न झाला.
 
        या कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक  मकरंद को-हाळकर   होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय आॕलिंपिक असो.चे सहसचिव  नामदेवराव शिरगांवकर हे आॕनलाईन उपस्थित  होते या प्रसंगी  उपमुख्याध्यापक .रवि पाटील, पर्यवेक्षक .आर.बी.गायकवाड ,.दिलीप तुपसैंदर,. ए.बी अमृतकर ए.के काले, डी.व्ही, विरकर. डी.पी, कुकडे. एन.के, बडजाते ए.जे.  कोताडे आदी शिक्षक व विदयार्थी आॕनलाईन या वेळी उपस्थित होते.
       मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन  मुख्याध्यापक  को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले. उपमुख्याध्यापक .रवि पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.
   भारतिय आॕलिंपिक असो.सहसचिव .नामदेव शिरगांवकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरिल कोरोना आजारा  नंतर क्रीडा क्षेत्रातील चालु घडामोडीची माहीती स्पष्ट करुन नुकत्याच आॕलिपिंक मधील भालाफेकीतील सुवर्ण व अॕथलेटीक मधील रौप्यपदक मेंजर ध्यानचंद यांना श्रध्दांजली ठरेल असे स्पष्ट केले.मेजर ध्यानचंद यांचे हाॕकी खेळातील योगदान अविस्मरणीय आहे यातुनच खेळाडुंनी प्रेरणा घेवुन आपल्या खेळात देशाला पदके मिळवुन दयावी . 
या प्रसंगी कु.नेहा भोसले या विद्यार्थींने मेजर ध्यानचंद विषयी माहीती सादर केली तर कु. कल्याणी खैरनार हीने आॕलिपिक स्पर्धाचा आलेख स्पष्ट केला. कु.तनया संत हीने खेळातील शारीरिक क्षमतेचे महत्व सांगितले.
 विदयालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे  एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप कुमार अजमेरे व सहसचिव .सचिन अजमेरे यांनी *राष्ट्रीय क्रीडा दिना* निमित्त शुभेच्छा दिल्या.
      या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक .एन.के.बडजाते यांनी तर आभार  .ए.के.काले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"