कै.गोकुळचंद ठोळे यांची १४५वी जयंती विदयालयांत उत्साहाने संपन्न


कोपरगाव प्रतिनिधी

येथील गोकुळचंद विदयालय चे संस्थापक कै.गोकुळचंद ठोळे यांची १४५वी जयंती विदयालयात उत्साहाने संपन्न झाली.
 कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी  साईबाबा सुपर स्पेशालीटी हाॕस्पीटलचे प्रमुख डाॕ.विजय नरोडे  होते तर  प्रमुख पाहुणे म्हणुन साईबाबा सुपर स्पेशालीटीचे हाॕस्पीटलचे तज्ञ कार्डीआलाॕजिस्ट डाॕ.संदीप देवरे उपस्थित होते.  
प्रारंभी मान्यरांच्या हस्ते कै.गोकुळचंद ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी  स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परीचय   मुख्याध्यापक .मकरंद को-हाळकर यांनी करुन दिला.विदयालयांचे उपमुख्याध्यापक .रवि पाटील यांनी कै.गोकुळचंद ठोळे यांच्या कार्याचा आलेख स्पष्ट केला. 
डाॕ.संदीप देवरे यांनी विदयार्थीना मार्गदर्शन करतांना खडतर परीश्रमा शिवाय यश मिळत नाही हे स्पष्ट करुन  समाजात आपले स्थान निर्माण करुन परत शाळेत पाहुणे म्हणून शाळेत या असे सुचवले.
अध्यक्ष पदावरुन भाषण करतांना डाॕ.विजय नरोडे यांनी माझ्या  यशामध्ये श्री.गो.विदयालयाचा सिंहाचा वाटा आहे असे स्पष्ट केले.ज्ञानदान चांगले संस्कार देवुन आदर्श विदयार्थी घडविण्याचे चांगले कार्य  विद्यालयात होत आहे असे स्पष्ट केले.
या प्रसंगी एस.एस.सी. परीक्षेत व  चित्रकला स्पर्धात यश मिळविलेल्या विद्यार्थींचा  पाहुण्याच्या हस्ते गुण गौरव करण्यात आला. माजी निवृत्त मुख्याध्यापक आर.डी.गवळी,माजी उपमुख्याध्यापक  डी.एम. कांबळे माजी पर्यवेक्षक एस.ए.इनामदार यांचा शाल व श्रीफळ देवुन सन्मान करण्यात आला.

 विदयालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे , एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप कुमार अजमेरे यांनी उपस्थित विदयार्थी,शिक्षकांना मार्गदर्शन केले.विद्यालयांचे क्रीडा शिक्षक .डी.व्हि.विरकर यांनी कै.गोकुळचंद ठोळे यांच्या वरील रचलेल्या कवितेचे वाचन केले.
     या कार्यक्रमाला सहसचिव .सचिन अजमेरे, डाॕ.अमोल अजमेरे,डाॕ.ढाकणे,प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मिना पाटणी,भागचंद माणिकचंद इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य निमोणकर जेष्ठशिक्षक  डी.व्ही, तुपसैदर. ए.जे, कोताडे  ए.के. काले  एस.डी, गोरे  ए.के बडजाते पालक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद विदयार्थी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.

            सुत्रसंचलन सौ.एस.ए.अजमेरे यांनी केले. तर आभार एस.डी.गोरे  यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा