तांत्रिक ऊस शेतीचा मार्गदर्शक हरपला - कोल्हे

उसाचे उत्पादन 100 मेट्रिक टनाचे पुढे सहज शक्य आहे आणि ते मिळवण्याचा सोपा मार्ग तांत्रिक शेतीतून देणाऱ्या मुलंमंत्राचे शिल्पकार, डॉ. ज्ञानदेवराव हापसे यांच्या निधनाने हरपले अशा शब्दात संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक, माजी मंत्री, शंकरराव कोल्हे यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
            ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक राज्यात तांत्रिक शेतीचे प्रयोग राबवत शेतकऱ्यांना ज्ञानाचे प्रबोधन केले.  शेतकऱ्यांचे  आर्थिक जीवनमान उंचाण्ण्यासाठी त्यांच्या सूचना या अत्यंत मौलिक होत्या. महाराष्ट्र राज्यात ऊस शेतीचे प्रति हेक्‍टरी उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर संघ नवी दिल्ली, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबई, यांच्याबरोबर त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोल्हे कारखाना कार्यस्थळावर त्यांचे असंख्य ऊस शेती मार्गदर्शन मेळावे संपन्न झाले. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस जाती  शोधन्याबाबतचे प्रयोग त्यांनी कोपरगाव परिसरात राबवले., शेतकऱ्याला ऊस शेती ज्ञानातून समृद्ध केले.  उसावर येणारा प्रत्येक रोग_किडीवर त्यांचे संशोधन होते. त्यातून पिकाची जपवणूक कशी करायची व  काय उपाय योजना करायच्या याविषयी त्यांचे ज्ञान सखोल होते.   त्यांच्या जाण्याने ऊस उत्पादन वाढ करणाऱ्या तांत्रिक शेतीचा जादूगार आपल्यातून हिरावला गेला असे कोल्हे म्हणाले. सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे  व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"