कठीण प्रसंगात संजीवनीच धावून आली.....

आपण स्वतः अपंग त्यात कोरोनाचा कहर चालू झाला, मोलमजुरी बंद.  मुलगी बाळंतपणाला आली, तिचे बाळंतपण कसे करावे हा प्रश्न. घरात खाण्यासाठी काही शिल्लक नाही.  कोरोणामुळे बाहेरचे तर सोडाच पण घरचेही मदतीला येईना.   कोण काय मदत करते हे फक्त ऐकून होतो, अशा सार्‍या कठीण प्रसंगात फक्त संजीवनी धावून आली आणि क्षणार्धात संकटाचे ढग दूर झाले, ही परिस्थिती तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांचे समोर कथन करताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते आभार कोणत्या शब्दात म्हणावे हे वारी कान्हेगावच्या दिलीप अहिरे यांना सुचत नव्हते.   त्यातच तत्कालीन सभापती मच्छिंद्र टेके यांनी वारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच यांना आपली कहाणी कळवली आणि त्यांनी अपंग निधीतील किराणा एका दिवसात घरी पाठवला असेही अहिरे म्हणाले.
          तालुक्यातील वारी कान्हेगाव येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान नुकताच सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी श्री. अहिरे बोलत होते.
           ते पुढे म्हणाले की, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना आपण कधीही पाहिले नाही, पण त्यांना परिस्थिती सांगितली आणि तात्काळ त्यांनी यंत्रणा हलवली म्हणून आपल्यावरील 
व मुलीच्या बाळंतपणाचे संकट दूर झाले.   मुलीला कोरोना काळात कुणी दवाखान्यात दाखल करून घ्यायला तयार नव्हते, कोरोनामुळे  सगळेच घाबरत होते.  रुग्णवाहिका करून तिला कुठे बाळंतपणासाठी न्यावे हा प्रश्न होता, आणि खिशात पैसेही नव्हते.  पण संजिवनी  युवा प्रतिष्ठानचे दातृत्व आपल्याला कामी आले.   त्यांच्या कार्याला परमेश्वराने आपले आयुष्य द्यावे असे सांगत अहिरे यांनी सौ. कोल्हे यांचे समोर हात जोडून  ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. त्यावर सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, अहो संकटात मदत कारायची असते हा वसा बिपिंनदादा कोल्हे यांच्या कडून मिळाला,  म्हणूनच पुन्हा पुन्हा सामाजिक कार्याला बळ मिळत राहते, आपल्या सारख्यांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद कामाला येतात, मदत ही मोठी बाब नाही.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"