श्रावणातला चौथ्या सोमवारीही अनेक भाविकांचे कळसाचे तसेच पायरीचे दर्शन घेऊन समाधान


कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक  पौराणिक संदर्भ धार्मिक परंपरा असल्याने तालुक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मंदिरे आहेत मात्र राज्य शासनाच्या आदेशाने व कोरोना चा प्रसार वाढत असल्याने सध्या मंदिरे बंद आहेत श्रावणातला चौथा सोमवार आज होता मात्र भाविकांना मंदिरे उघडे नसल्याने कळसाचे व पायरीचे दर्शन दूरवरून घ्यावे लागले त्यातच अनेकांनी समाधान व्यक्त केले काही भाविकांनी दक्षिण गंगा गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधली तालुक्यातील संवत्सर येथील कोकमठाण कांचनवाडी येथील विभांडक ऋषी आश्रमात बेट भागातील श्री प्रति त्रंबकेश्वर कचेश्वर महाराज  मंदिर गुरु शुक्राचार्य मंदिर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम समाधी मंदिर मंजूर येथील महादेव मंदिर कुंभारी येथील श्री राघवेश्वर मंदिर कोकमठाण येथील हेमाडपंथी मंदिर शहरातील गावठाण भागातील सराफ बाजार मधील सोमेश्वर महादेव मंदिर कुंभारी चे गंगेश्वर महादेव मंदिर आदी ठिकाणच्या शिवमंदिराचे भाविकांनी दूरवरून कळसाचे व पायरीचे दर्शनासाठी गर्दी केली होती चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाला पारंपारिक पद्धतीने दुग्ध अभिषेक पंचामृत अभिषेक गंगा अभिषेक पूजा अर्चा दुपार मध्यान आरती ब्रह्मवृंद यांच्या हस्ते करण्यात आल्या अनेक भाविकांनी महादेवाला कोरोना चे संकट जाऊदे परत पहिल्या सारखे दिवस येऊ देत असे म्हणत साकडे घातले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"