श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव


शिर्डीः-

          श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थाशिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात काल रात्रौ १२.०० वाजता श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. तर आज दुपारी १२.०० वाजता काल्‍याचे कीर्तनानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली.

श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर दिनांक ३० ऑगस्‍ट रोजी रात्रौ १०.०० ते १२.०० यावेळेत मंदिर कर्मचारी ह.भ.प.संभाजी तुरकणे महाराज यांचे श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटेउप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरेमुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदेमंदिर प्रमुख रमेश चौधरीपुजारी व कर्मचारी उपस्थित होते. त्‍यानंतर श्रींची शेजारती झाली.

          तसेच आज सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर मंदिर पुजारी ह.भ.प.उल्‍हास वाळुंजकर महाराज यांचे काल्‍याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर १२.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरेसंरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशीमंदिर प्रमुख रमेश चौधरीपुजारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदरचा श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव कोरोना विषाणुच्‍या पार्श्‍वभुमीवर भाविकांविना व मर्यादित संस्‍थान अधिकारी आणि मंदिर पुजारी यांच्‍या उपस्थितीत यशस्‍वीरित्‍या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा