एकूण ४५ वाहनापैकी २६ वाहनांचा झाला लिलाव त्यातून शासनाला ४७ लाख रुपये एवढा मिळाला महसूल
कोपरगाव प्रतिनिधी
३१ ऑगस्ट रोजी कोपरगाव तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली आणि सर्व प्रक्रीया राबवूनही शासनाला दंड न भरलेल्या वाहनांचा लिलाव तहसिल कार्यालयात झाला. सदर लिलावामध्ये एकूण ४५ वाहने लिलावासाठी ठेवण्यात आली होती त्याची एकूण रक्कम ७५ लाख रुपये आहे. आजच्या लिलाव प्रक्रियेमध्ये एकूण २६ वाहने हे लिलाव प्रक्रियेमध्ये गेलेले असून त्यातून शासनाला ४७ लाख एवढा महसूल प्राप्त झाला आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. वाहनाची माहिती पुढील प्रमाणे ,
एकूण वाहने ४५
वाहनाचा प्रकार ट्रक्टर २७ ,टाटा झेनोन ७,डम्पर ५ जेसीबी ५,ट्रक १
यापैकी लिलावात गेलेली वाहने
वाहनाचा प्रकार ट्रक्टर १९ ,टाटा झेनोन ३,डम्पर ३, जेसीबी ०,ट्रक १
अशाप्रकारे एकूण ४५ वाहनापैकी २६ वाहनांचा लिलाव झाला असून त्यातून शासनाला ४७ लाख रुपये एवढा महसूल मिळाला आहे. उर्वरित १९ वाहने जे आज लिलावात गेलेली नाही त्यांचा लिलाव परत १५ दिवसांनी होणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार चंद्रे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment