केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याचा कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध
कोपरगाव प्रतिनिधी
मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगांवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून निषेध नोंदवून शहर पोलिस ठाण्यात केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेसाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने शिवसैनिकां च्या भावना दुखावल्या आहेत. हे वक्तव्य अशोभनीय असून लोकशाहीच्या विरोधात आहे. राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिले आहे.
या वेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अमृतमहोत्सव हा शब्द आठवला नाही म्हणून नारायण राणेंची देशभक्ती जागृत झाली मग उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या पार्थिवावर असलेल्या भारताच्या झेंड्यावर भाजपचा झेंडा टाकला गेला तेव्हा ह्यांची देशभक्ती कुठे गेली होती.
निवेदन देतांना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, विधानसभा संघटक अस्लम शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,तालुकाप्रमुख विमल पुंडे, ,बाळासाहेब जाधव, वाहतूकसेना उपजिल्हाप्रमुख, उपशहरप्रमुख विकास शर्मा, भुषण पाटणकर, आकाश कानडे, संघटक बाळासाहेब साळुंके,व्यापारी सेनेचे योगेश मोरे, वैभव गिते,राहूल देशपांडे,सतिष शिंगाणे, विभागप्रमुख समीर शेख, गौरव गुप्ता, वैभव हलवाई, वाहतूकसेनेचे अविनाश धोक्रट, पप्पू पेकळे, प्रविण शेलार, किरण आडांगळे, सचिन जाधव, दत्तू लोणारी, संतोष लोणारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment