यवतमाळच्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे पदाधिकाऱ्यांची समता पतसंस्थेस भेट


कोपरगाव प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुकास्थित  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे तपासणी अधिकारी अशोक चवळे, शाखा व्यवस्थापक  संजय दोरखंडे,  कविश्वर शास्रकार, अनिल ठाकरे , लेखापाल  वैभव झाडे, लिपिक  राजेश दुधलकर,  अनिल वगारे आदी पदाधिकाऱ्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेस नुकतीच सदिच्छा भेट दिली. सर्व पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे संचालक  संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी स्वागत करून सत्कार केला.  
        श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे तपासनीस अधिकारी  अशोक चवळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,  महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील समता पतसंस्था प्रत्येक विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळेत ग्राहकांना सेवा देत आहे ही विशेष उल्लेखनीय बाब असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी पतसंस्था चळवळीत नावारूपाला येणारी महाराष्ट्रातील पहिलीच पतसंस्था असून सरकारी बँकांनाही लाजवेल असे ऑनलाईन फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम आणि स्टोर रूम ची संरचना येथे त्यांनी अवलंबिली आहे आम्हीही आमच्या संस्थेत  ही प्रणाली रागवणार आहोत. काका कोयटे यांनी आम्हाला त्यासंबंधी मार्गदर्शन करावे,अशी इच्छा व्यक्त केली.
      मुख्य कार्यालयाच्या एच.आर.उज्वला बोरावके यांनी कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली, ऑनलाईन फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम विषयी प्रमुख  संजय पारखे यांनी सविस्तर माहिती दिली,संस्थेच्या मुख्य कार्यालयासह विविध शाखांत वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची  माहिती ई.डी.पी विभाग प्रमुख  योगेश आसने यांनी दिली. जितेंद्र अमृतकर यांनी फंड विभागाची माहिती दिली.                                                                                             प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी समता पतसंस्थेच्या प्रत्येक विभागास भेट देत विभागाची परिपूर्ण माहिती घेऊन समाधान व्यक्त करत संस्थेच्या प्रत्येक वापरत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे विशेष कौतुक करून  समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा