तालुक्यातील वारी-कान्हेगांव परिसरात ग्रामविकास निधी अंतर्गत 60 लाख रूपये खर्चाची तीन सामाजिक सभागृहे असुन त्यापैकी एका सभागृहाचे लोकार्पण शनिवारी सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले.
छाया_ जय जनार्दन फोटो, संजीवनी. |
सांस्कृतिक ठेव्याची जपवणूक सामाजिक उपक्रमातुन व्हावी या प्रामाणिक हेतुने कोपरगांव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक सामाजिक सभागृहे मंजुर करून ती पुर्णत्वास आणली असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील वारी-कान्हेगांव परिसरात ग्रामविकास निधी अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतुन 60 लाख रूपये खर्चाची तीन सामाजिक सभागृहे मंजुर केली त्यापैकी एका सामाजिक सभागृहाचे लोकार्पण शनिवारी सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी देवीमंदिर व जयबाबाजी येथील प्रत्येकी 25 लाख रूपये खर्चाच्या सामाजिक सभागृह कामाची पाहणी करून कोरोना महामारीत सर्वोत्कृश्ट कार्य करणां-या आशासेविका, वारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डाॅ पुजा बोर्डे, डाॅ. वरज अजेय गर्जे, अंगणवाडीताई, पोष्ट,तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सोसायटी सदस्य, कर्मचारी, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, विद्युत कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, गोदावरी बायोरिफायनरी, गांवपातळीवरील ज्येष्ठ श्रेष्ठ यासह शंभर कोरोना योध्दयांचा सत्कार करण्यांत आला. अध्यक्षस्थानी माजी सभापती मच्छिंद्र टेके होते.
प्रारंभी उपसरपंच सौ मनीषा विशाल गोर्डे यांनी प्रास्तविक करून कोल्हे यांच्या विकास कार्याची माहिती दिली. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सहकार महर्षी कोल्हे कारखान्यांचे संचालक फकिरराव बोरनारे, हिंमतराव भुजंग, प्रकाश गोर्डे, बाबुराव गोर्डे, पोपटराव गोर्डे, आप्पासाहेब गोरे, बापूसाहेब टिक्कल, वसंतराव गोरे, दिवाकर निळे, सौ नंदाताई निळे, विशाखा निळे, सुवर्णाताई गजभिये, अनिल गोरे, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर वेताळ, प्रशांत संत, विशाल गोर्डे, बंटी खैरनार यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून बोलतांना माजी सभापती मच्छिंद्र टेके म्हणांले की, कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम धावुन मदत करण्यांत कोल्हे कुटूंबियांचा राज्यात लौकीक आहे. तोच वारसा युवानेते व जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यात असुन कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहवा केली. जनतेची सेवा करून विवेक कोल्हे स्वतःला सिध्द करत आहेत. आशा, अंगणवाडी सेविकासह सर्वांनी जीव धोक्यात घालुन कोरोना काळात काम केले त्या सामाजिक कार्यातुन उतराई व्हावी हाच प्रयत्न आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, कोपरगांव विधानसभा मतदार संघातील प्रत्येकाच्या अडी-अडचणी लक्षात घेवुन रस्ते, पाटपाणी, आरोग्य, वीज आदि सामाजिक प्रश्नांची सोडवणुक प्रामाणिकपणे करण्यांत आपला सातत्यांने पुढाकार असतो. आज कोरोनो आपत्तीत सर्वसामान्यांसह अनेकजण होरपळले., अनेकांचे छत्र गेले अशाही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रशासनांने देशात कुठेही भूकबळी होवु दिला नाही. कोरोना लसीकरणात मोलाची भूमिका बजावत सर्वाधिक लसींची मात्रा महाराष्ट्र राज्याला उपलब्ध करून दिली. राजकारणांत अनेक कंगोरे असतात पण जनतेच्या मुलभूत समस्या सुटाव्या यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्टा आपल्या ठायी असल्याचेही त्या शेवटी म्हणांल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल गोर्डे, डाॅ. सर्जेराव टेके यांनी केले.
Comments
Post a Comment