सोमय्या ग्रामीण विकास केंद्र करणार शैक्षणिक मदत
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी कारखान्यापासून वीस किलोमीटर पर्यंत कोपरगाव तसेच शहर व राहाता तालुक्यातील परिसरातील हायस्कूल व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या हुशार व परिस्थितीने गरीब असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी सोमय्या ग्रामीण विकास केंद्र समीर वाडी या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन 2021 22 या शैक्षणिक वर्षाकरिता दहावी-बारावी डिग्री व उच्च शिक्षण या परीक्षेत 75 टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी व 70 टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत दिली जाणार आहे .यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दोन ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान भरावयाचे आहेत अर्ज भरलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना ऑक्टोबर 2021 मध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची एक प्रत आमच्या कार्यालयात जमा करावी असे आवाहन गोदावरी बायो रिफायनरी चे संचालक सुहास गोडगे व उपमहाव्यवस्थापक बाळासाहेब पालवे यांनी केले आहे. गोदावरी बायो रिफाइनरी लिमिटेड समीर वाडी आणि साखरवाडी या भागातील रहिवासी शिक्षण घेणारे विद्यार्थी वीस किलोमीटर पर्यंत बसलेले विद्यार्थी यासाठी पात्र राहतील सन दोन हजार वीस एकवीस शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा त्यापेक्षा जास्त श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत दारिद्र रेषेखालील कुटुंबातील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य मानले जाईल विद्यापीठ परीक्षेतील गुणांची टक्केवारी मुलांसाठी 75 टक्के मुलींसाठी 70 टक्के पेक्षा जास्त असावी एमबीबीएस औषधी अभ्यासक्रमासाठी नीट श्रेणी 25000 च्या आत असावी अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी श्रेणी दहा हजार च्या आत असावी द्वितीय अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सीईटी श्रेणी दोन हजार च्या आत असावी अभ्यासक्रमाचे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान 80 टक्के गुण असावे पात्र विद्यार्थ्यांकडून www.helpchild.org.in ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात येत आहेत अर्जाच्या छाननीनंतर दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पात्रता परीक्षा घेण्यात येईल ऑनलाईन पात्रता परीक्षा रविवार 12 सप्टेंबर रोजी साडे दहा ते साडे अकरा या वेळेत घेतलेल्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत आर्थिक स्थिती परिसराची पडताळणी करण्यासाठी घरी भेटी दिल्या जातील .शिष्यवृत्तीसाठी आमच्या वेबसाईटवर शॉर्टलिस्ट विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करण्यात येईल ज्या विद्यार्थ्यांची आई किंवा वडील हयात नाहीत अनाथ दैनंदिन मजुरी कामगार लहान व अल्पभूधारक शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. असे व्यवस्थापनाच्या वतीने कळविण्यात आले आहे
Comments
Post a Comment