Posts

Showing posts from August, 2021

कै.गोकुळचंद ठोळे यांची १४५वी जयंती विदयालयांत उत्साहाने संपन्न

Image
कोपरगाव प्रतिनिधी येथील गोकुळचंद विदयालय चे संस्थापक कै.गोकुळचंद ठोळे यांची १४५वी जयंती विदयालयात उत्साहाने संपन्न झाली.  कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी  साईबाबा सुपर स्पेशालीटी हाॕस्पीटलचे प्रमुख डाॕ.विजय नरोडे  होते तर  प्रमुख पाहुणे म्हणुन साईबाबा सुपर स्पेशालीटीचे हाॕस्पीटलचे तज्ञ कार्डीआलाॕजिस्ट डाॕ.संदीप देवरे उपस्थित होते.   प्रारंभी मान्यरांच्या हस्ते कै.गोकुळचंद ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी  स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परीचय   मुख्याध्यापक .मकरंद को-हाळकर यांनी करुन दिला.विदयालयांचे उपमुख्याध्यापक .रवि पाटील यांनी कै.गोकुळचंद ठोळे यांच्या कार्याचा आलेख स्पष्ट केला.  डाॕ.संदीप देवरे यांनी विदयार्थीना मार्गदर्शन करतांना खडतर परीश्रमा शिवाय यश मिळत नाही हे स्पष्ट करुन  समाजात आपले स्थान निर्माण करुन परत शाळेत पाहुणे म्हणून शाळेत या असे सुचवले. अध्यक्ष पदावरुन भाषण करतांना डाॕ.विजय नरोडे यांनी माझ्या  यशामध्ये श्री.गो.विदयालयाचा सिंहाचा वाटा आहे असे स्पष्ट केले.ज्ञानदान चांगले संस्कार देवुन आदर्श विदयार्थी घडव

यवतमाळच्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे पदाधिकाऱ्यांची समता पतसंस्थेस भेट

Image
कोपरगाव प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुकास्थित  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे तपासणी अधिकारी अशोक चवळे, शाखा व्यवस्थापक  संजय दोरखंडे,  कविश्वर शास्रकार, अनिल ठाकरे , लेखापाल  वैभव झाडे, लिपिक  राजेश दुधलकर,  अनिल वगारे आदी पदाधिकाऱ्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेस नुकतीच सदिच्छा भेट दिली. सर्व पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे संचालक  संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी स्वागत करून सत्कार केला.           श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे तपासनीस अधिकारी  अशोक चवळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,  महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील समता पतसंस्था प्रत्येक विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळेत ग्राहकांना सेवा देत आहे ही विशेष उल्लेखनीय बाब असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी पतसंस्था चळवळीत नावारूपाला येणारी महाराष्ट्रातील पहिलीच पतसंस्था असून सरकारी बँकांनाही लाजवेल असे ऑनलाईन फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम आणि स्टोर रूम ची संरचना येथे त्यांनी अवलंबिली आहे आम्हीही आमच्या संस्थेत  ही प्रणाली रागवणार आहोत. काका कोयटे यांनी आम्हाला त्यासंबंधी मार्गदर्शन करावे,अशी इच्छा व्यक्त

एकूण ४५ वाहनापैकी २६ वाहनांचा झाला लिलाव त्यातून शासनाला ४७ लाख रुपये एवढा मिळाला महसूल

कोपरगाव प्रतिनिधी ३१ ऑगस्ट रोजी कोपरगाव तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली आणि सर्व प्रक्रीया राबवूनही शासनाला दंड न भरलेल्या वाहनांचा लिलाव तहसिल कार्यालयात झाला. सदर लिलावामध्ये एकूण ४५ वाहने लिलावासाठी ठेवण्यात आली होती त्याची एकूण रक्कम ७५ लाख रुपये आहे. आजच्या लिलाव प्रक्रियेमध्ये एकूण २६ वाहने हे लिलाव प्रक्रियेमध्ये गेलेले असून त्यातून शासनाला ४७ लाख एवढा महसूल प्राप्त झाला आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. वाहनाची  माहिती पुढील प्रमाणे ,   एकूण वाहने ४५ वाहनाचा प्रकार   ट्रक्टर  २७ ,टाटा झेनोन  ७,डम्पर  ५ जेसीबी ५,ट्रक १ यापैकी लिलावात गेलेली वाहने वाहनाचा प्रकार   ट्रक्टर  १९ ,टाटा झेनोन  ३,डम्पर  ३, जेसीबी ०,ट्रक १               अशाप्रकारे एकूण ४५ वाहनापैकी २६ वाहनांचा लिलाव झाला असून त्यातून शासनाला ४७ लाख रुपये एवढा महसूल मिळाला आहे. उर्वरित १९ वाहने जे आज लिलावात  गेलेली नाही त्यांचा लिलाव परत १५ दिवसांनी होणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार चंद्रे यांनी केले आहे.

मंदिरे उघडण्यासाठी कोपरगावात भाजपाचा शंखनाद

Image
मागीलदोन वर्षापासुन करोना महामारीचे संकट आलेले आहे, यामुळे सर्व धार्मिक देवस्थाने पुर्ण पणे बंद केलेली आहेत. परंतु या धार्मिक स्थळावर उदरनिर्वाहासाठी अवलंबुन असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावण महिन्यात  सर्व देवस्थानके बंद आहेत. जग विख्यात असलेले श्री साईबाबा मंदिरही बंद असल्याने अनेक लाखो कुटुंबीयांचा रोजगार गेला,  रिक्षा, फुल,  आदीं व्यावसायिक घटकांचे जीवनमान पूर्ववत होण्यासाठी सर्व मंदिरे तात्काळ उघडावे अशी मागणी कोपरगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष साहेबराव रोहोम व शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केली.                  श्री.साहेबराव रोहोम पुढे म्हणाले की, ज्यांची उपजिवीका या धार्मिकस्थाळावर अवलंबुन आहे त्यांच्या पढे अनंत प्रश्न उभे राहिले. या महाभकास आघाडी सरकारच्या गलिच्छ कारभारामुळे एस.टी. च्या कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याच्या भाजीपाला,दुध इत्यादीं कोणत्याही उत्पादनाला भाव नाही.   या सरकारचा निषेध म्हणुन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष व  प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मीक स

श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव

Image
शिर्डीः-           श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था ,  शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात काल रात्रौ १२.०० वाजता श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. तर आज दुपारी १२.०० वाजता काल्‍याचे कीर्तनानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली. श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर दिनांक ३० ऑगस्‍ट रोजी रात्रौ १०.०० ते १२.०० यावेळेत मंदिर कर्मचारी ह.भ.प.संभाजी तुरकणे महाराज यांचे श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे ,  उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे ,  मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे ,  मंदिर प्रमुख रमेश चौधरी ,  पुजारी व कर्मचारी उपस्थित होते. त्‍यानंतर श्रींची शेजारती झाली.            तसेच  आज सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर मंदिर पुजारी

श्री सुभाष बुलाखे सेवानिवृत्त...... सेवानिवृत्ती निमित्त गौरव

Image
श्री सुभाष बुलाखे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव समवेत श्रीमती शुभांगी मांडगे, सविता ताकपेरे,श्री शिवाजी कांबळे केडगाव: अहमदनगर प्रधान डाकघरातील ओव्हरसियर पोस्टमन श्री सुभाष आबाजी बुलाखे हे त्याचे 26 वर्षाच्या  प्रदीर्घ सेवेनंतर आज दि 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले.   श्री बुलाखे यांनी त्याचे डाकसेवक ,ब्रँच पोस्टमास्टर सुरेगाव ता श्रीगोंदा येथून प्रारंभ केला. 6 वर्ष सुरेगाव येथे काम पाहिल्यानंतर खाते अंतर्गत परीक्षा होऊन पदोन्नती होऊन ते  अहमदनगर प्रधान डाकघर येथे पोस्टमनच्या सेवेस सुरवात केली.त्यानंतर सावेडी रोड येथेही काही काळ सेवा केले नंतर कर्जत व अहमदनगर पश्चिम उपविभागात मेल ओव्हरसियर ,व सध्या अहमदनगर प्रधान डाकघर येथे कॅश ओव्हरसियर पदी ते आज सेवानिवृत्त झाले. श्री बुलाखे हे कर्तव्यदक्ष तर सतत हसतमुख असत ते आपल्या विनोदी स्वभावने परिचित होते.  आज केडगाव पोस्टऑफिस मध्ये त्याचे सेवानिवृत्त निमित्त त्याचा यथोचित गौरव करण्यात आला.या वेळी बोलताना श्री संतोष यादव म्हणाले,की श्री बुलाखे यांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केली ,पोस्टमन पद

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा...

कोपरगाव प्रतिनिधी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी  तालुका एज्युकेशन सोसायटीचे  अध्यक्ष अशोक   रोहमारे, संस्थेचे सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त  संदीप रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य  बी   .  आर. सोनवणे, जिमखाना समितीचे चेअरमन  जी. एन. डोंगरे,  एस. बी. जगझाप,  डी.एस. बुधवंत व शारीरिक शिक्षक  एम. व्ही. कांबळे उपस्थित होते.              कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले.  पाहुण्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या चारित्र्याविषयी बहुमोल माहिती देत क्रीडा क्षेत्रातील योगदानावरही प्रकाश टाकला. कार्यक्रम प्रसंगी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. जिमखाना समिती चेअरमन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

कोपरगांव बाजार समितीने दिले कर्मर्‍यांना विमा सुरक्षा कवच

कोपरगांव प्रतिनिधी जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणू संसर्गाविरूद्ध प्रत्येक भारतीय धैर्याने लढा देत आहे. या कठिण  प्रसंगी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सेवा देणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना संस्थेतर्फे विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहे. बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे उपसभापती राजेंद्र निकोले सचिव नानासाहेब रणशुर  व सर्व संचालक मंडळाच्या पुढाकाराने प्रत्येक कर्मचार्‍यांचा पाच लाखाचा विमा काढण्यात आला आहे. बाजार समितीमधील 20 कर्मचार्‍यांना या विम्याचा लाभ मिळणार आहे. कोपरगांव बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात शेतमालाची खरेदी विक्री होते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोपरगांव बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांना विविध सुविधा दिल्या जातात. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतांना सुद्धा बाजार समितीमधील कर्मचारी सेवा देत असतात. अशा प्रसंगी कर्मचारी व त्याच्या कुटूंबियांची भविष्याची काळजी घेण्यासाठी बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले सचिव नानासाहेब रणशुर व सर्व संचालक मंडळ यांनी पुढाकार घेवून प्रत्येक कर्मचार्‍यांना पाच लाखांचा सुरक्षा विमा कवच दिले आहे या न

कोपरगांव बाजार समितीत मायक्रो फोन स्पीकर चा वापर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय कोपरगांव प्रतिनिधी कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना कोविडविषयक नियम घालून दिले आहेत त्या नियमांचे पालन होत असतांनाच येथील  कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत कांदा लिलाव सुरु असतांना बाजारभाव ऐकणार्‍यांची गर्दी कमी करण्यासाठी लिलाव पुकारा करणार्‍या कर्मचार्‍याजवळ मायक्रोफोन स्पिकर देण्यात आला आहे. या स्पिकरमुळे संपूर्ण बाजार समितीच्या आवारात प्रत्येक वाहनधारक व कांदा विक्रेता शेतकर्‍यास आपल्या वाहनाजवळ बसून बाजारभाव ऐकतायेत असल्याने होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात बाजार समितीला यश आले आहे. सध्याच्या डिजीटल युगात एक आदर्श डिजीटल बाजार समितीकडे कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची वाटचाल सुरु आहे. बाजार समितीचा आत्मा असलेल्या शेतकर्‍यांना समितीच्या वतीने पिण्याचे शुद्ध पाणी, शेतकरी निवास, मानसन्मान आणि इतर सुविधांवर भर दिला जात आहे. त्याच बरोबर बाजार समितीच्या सर्व घटकांना सुचना, नियम आदि ऐकवण्यासाठी संपूर्ण बाजार आवारात ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. सद्यस्थितीत या लाऊडस्पिकरद्वारे कोरोन

१२ वर्षांच्या मनस्वी आढावकडून आरोग्य सेवा माहिती देणाऱ्या को-केअर ॲपची निर्मिती

Image
कोपरगाव प्रतिनिधी कोविड हाॅस्पिटल आणि रुग्णसेवेशी निगडित  आरोग्य सेवा केंद्रांची माहिती देणारा व तातडीचे सेवेसाठी सर्वांना उपयुक्त ठरणारा मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असलेल्या को-केअर ॲपची निर्मिती येथील १२ वर्षांच्या कु मनस्वी मंदार आढाव हिने हैदराबाद येथील व्हाईट हॅटच्या  ज्युनिअर  शिक्षिका मोनिका सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर  केली आहे.   या ॲपमध्ये कोविड रुग्णालय यांची नावे,पत्ता, उपलब्ध बेड, हाॅस्पिटलचा फोन नंबर,कोरोना व्यतिरिक्त सर्व तज्ञांचे हाॅस्पिटलची नावे,पत्ता, तसेच सोनोग्राफी व रेडिओलॉजी केंद्र, सिटीस्कॅन, रक्तपेढी, रुग्णवाहिका यांचे मोबाईल नंबर उपलब्ध असणार आहे. तसेच तालुक्या बाहेरील आरोग्य सुविधा देणारे रुग्णालयांची नावे मोबाईल नंबर उपलब्ध असणार आहेत.    ॲपची शुभारंभ प्रांताधिकरी गोविंद शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आला . तहसीलदार योगेश चंद्रे यांनीही ॲपचे कौतुक केले आहे. कु.मनस्वी ही येथील वकील संघाचे माजी अध्यक्ष व मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष .शंकरराव आढाव व  सौ. रंजना आढाव, यांची नात आहे.  काका वैभव, काकी गीतांजली, वडील मंदार व

श्रीमान गोकुळचंद विदयालयांत 'राष्ट्रीय क्रीडा दिन' उत्साहाने संपन्न

Image
कोपरगाव प्रतिनिधी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन *राष्ट्रीय क्रीडा दिन* म्हणून श्री गो विदयालयात  उत्साहाने संपन्न झाला.           या कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक  मकरंद को-हाळकर   होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय आॕलिंपिक असो.चे सहसचिव  नामदेवराव शिरगांवकर हे आॕनलाईन उपस्थित  होते या प्रसंगी  उपमुख्याध्यापक .रवि पाटील, पर्यवेक्षक .आर.बी.गायकवाड ,.दिलीप तुपसैंदर,. ए.बी अमृतकर ए.के काले, डी.व्ही, विरकर. डी.पी, कुकडे. एन.के, बडजाते ए.जे.  कोताडे आदी शिक्षक व विदयार्थी आॕनलाईन या वेळी उपस्थित होते.        मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन  मुख्याध्यापक  को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले. उपमुख्याध्यापक .रवि पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.    भारतिय आॕलिंपिक असो.सहसचिव .नामदेव शिरगांवकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरिल कोरोना आजारा  नंतर क्रीडा क्षेत्रातील चालु घडामोडीची माहीती स्पष्ट करुन नुकत्याच आॕलिपिंक मधील भालाफेकीतील सुवर्ण व अॕथलेटीक मधील रौप्यपदक मेंजर ध्यानचंद यांना श्रध्दांजली ठरेल असे स्पष्ट केले.मेजर ध्यानचंद यांचे हाॕकी खेळातील योगदान अविस्मरणीय आहे यातुनच खेळाडुं

श्रावणातला चौथ्या सोमवारीही अनेक भाविकांचे कळसाचे तसेच पायरीचे दर्शन घेऊन समाधान

Image
कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक  पौराणिक संदर्भ धार्मिक परंपरा असल्याने तालुक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मंदिरे आहेत मात्र राज्य शासनाच्या आदेशाने व कोरोना चा प्रसार वाढत असल्याने सध्या मंदिरे बंद आहेत श्रावणातला चौथा सोमवार आज होता मात्र भाविकांना मंदिरे उघडे नसल्याने कळसाचे व पायरीचे दर्शन दूरवरून घ्यावे लागले त्यातच अनेकांनी समाधान व्यक्त केले काही भाविकांनी दक्षिण गंगा गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधली तालुक्यातील संवत्सर येथील कोकमठाण कांचनवाडी येथील विभांडक ऋषी आश्रमात बेट भागातील श्री प्रति त्रंबकेश्वर कचेश्वर महाराज  मंदिर गुरु शुक्राचार्य मंदिर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम समाधी मंदिर मंजूर येथील महादेव मंदिर कुंभारी येथील श्री राघवेश्वर मंदिर कोकमठाण येथील हेमाडपंथी मंदिर शहरातील गावठाण भागातील सराफ बाजार मधील सोमेश्वर महादेव मंदिर कुंभारी चे गंगेश्वर महादेव मंदिर आदी ठिकाणच्या शिवमंदिराचे भाविकांनी दूरवरून कळसाचे व पायरीचे दर्शनासाठी गर्दी केली होती चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाला पारंपारिक पद्धतीने दुग्ध अभिषेक पंचामृत अभिषेक गंगा अभिषेक पूजा

कठीण प्रसंगात संजीवनीच धावून आली.....

आपण स्वतः अपंग त्यात कोरोनाचा कहर चालू झाला, मोलमजुरी बंद.  मुलगी बाळंतपणाला आली, तिचे बाळंतपण कसे करावे हा प्रश्न. घरात खाण्यासाठी काही शिल्लक नाही.  कोरोणामुळे बाहेरचे तर सोडाच पण घरचेही मदतीला येईना.   कोण काय मदत करते हे फक्त ऐकून होतो, अशा सार्‍या कठीण प्रसंगात फक्त संजीवनी धावून आली आणि क्षणार्धात संकटाचे ढग दूर झाले, ही परिस्थिती तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांचे समोर कथन करताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते आभार कोणत्या शब्दात म्हणावे हे वारी कान्हेगावच्या दिलीप अहिरे यांना सुचत नव्हते.   त्यातच तत्कालीन सभापती मच्छिंद्र टेके यांनी वारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच यांना आपली कहाणी कळवली आणि त्यांनी अपंग निधीतील किराणा एका दिवसात घरी पाठवला असेही अहिरे म्हणाले.           तालुक्यातील वारी कान्हेगाव येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान नुकताच सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी श्री. अहिरे बोलत होते.            ते पुढे म्हणाले की, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना आपण कधीही पाहिले नाही, पण त्यांना परिस्थिती सांगितली आणि

तांत्रिक ऊस शेतीचा मार्गदर्शक हरपला - कोल्हे

उसाचे उत्पादन 100 मेट्रिक टनाचे पुढे सहज शक्य आहे आणि ते मिळवण्याचा सोपा मार्ग तांत्रिक शेतीतून देणाऱ्या मुलंमंत्राचे शिल्पकार, डॉ. ज्ञानदेवराव हापसे यांच्या निधनाने हरपले अशा शब्दात संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक, माजी मंत्री, शंकरराव कोल्हे यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.             ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक राज्यात तांत्रिक शेतीचे प्रयोग राबवत शेतकऱ्यांना ज्ञानाचे प्रबोधन केले.  शेतकऱ्यांचे  आर्थिक जीवनमान उंचाण्ण्यासाठी त्यांच्या सूचना या अत्यंत मौलिक होत्या. महाराष्ट्र राज्यात ऊस शेतीचे प्रति हेक्‍टरी उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर संघ नवी दिल्ली, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबई, यांच्याबरोबर त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोल्हे कारखाना कार्यस्थळावर त्यांचे असंख्य ऊस शेती मार्गदर्शन मेळावे संपन्न झाले. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस जाती  शोधन्याबाबतचे प्रयोग त्यांनी कोपरगाव परिसरात राबवले., शेतकऱ्याला ऊस शेती ज्ञानातून समृद्ध केले.  उसावर येणारा प्रत्येक रोग_किडीवर त्यांचे संशोधन होते. त्यातू

गुरु शुक्राचार्यांना सिंहासनमुकुट

Image
कोपरगाव प्रतिनिधी शहरानजीक असलेल्या बेट भागातील सोमवार निमित्त औचित्य साधून परमसद्गुरु श्री गुरु शुक्राचार्य महाराज यांना मंदिर प्रशासनाच्या वतीने सिंहासन बनवले असून त्या सिहासनाला येथील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर  रामदास आव्हाड यांनी चांदीचा मुलामा देण्याचे कबूल केले आहे. या सिंहासनाचे श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक करून मुखवटापूजन  येथील आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर रामदास आव्हाड त्यांच्या पत्नी  सौ अंजली आव्हाड  होमिओपॅथिक डॉक्टर राजेंद्र श्रीमाळी सौ मनीषा श्रीमाळी यांचे हस्तेकरण्यात आले . सिंहासनाचे पुजन करीत असतानाच डॉक्टर आव्हाड यांनी लगेचच सिंहासनाला चांदीचा मुलामा देण्याचे गुरु शुक्राचार्य मुखवट्याच्या साक्षीने कबूल केले .सदरचे सिंहासन श्रीरामपूर येथील स्वामी आर्ट चे चालक कलाकार रोहिदास राऊत यांनी केले असून हे सिंहासन संपूर्ण ऍक्रेलिक पद्धतीने बनवले आहे त्यांनी याआधी या मंदिरासाठी दोन वर्षापूर्वी दोन मोठाले हत्ती गजराज मंदिरासाठी तयार करून दिले होते अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली. यावेळी सचिन परदेशी प्रसाद प-हे मुन्ना आव्हाड संजय वडांगले विकास शर्मा विशाल राऊत भागचंद रुईकर ड

वारी सामाजिक सभागृहाचे कोल्हेंच्या हस्ते लोकार्पण

Image
तालुक्यातील   वारी - का न्हेगांव   परिसरात   ग्रामविकास   नि धी   अंतर्गत  60  लाख   रूपये   खर्चा ची   तीन   सामाजिक   सभागृहे   असुन   त्यापैकी   एका   सभागृहाचे   लोकार्पण   श निवारी   सौ .  स्नेहलता   कोल्हे   यां च्या   हस्ते   करण्यांत   आले.   छाया_   जय   जनार्दन   फोटो,   संजी वनी. सांस्कृतिक   ठेव्या ची   जपवणूक   सामाजिक   उपक्रमातुन   व्हा वी   या   प्रामाणिक   हेतुने   कोपरगां व  विधानसभा   मतदार   संघात   सर्वाधि क   सामाजिक   सभागृहे   मंजुर   करून   ती   पुर्णत्वास   आणली   असे   प्रतिपादन   भाजपाच्या   प्रदेश   सचिव   स्ने हलता   कोल्हे   यांनी   केले .              तालुक्यातील   वारी - का न्हेगांव   परिसरात   ग्रामविकास   नि धी   अंतर्गत   तत्कालीन   मुख्यमंत् री   देवेंद्र   फडणवीस   यांच्या   मा ध्यमांतुन  60  लाख   रूपये   खर्चाची   तीन   सामाजिक   सभागृहे   मंजुर   के ली   त्यापैकी   एका   सामाजिक   सभागृ हाचे   लोकार्पण  श निवारी   सौ .  स्ने हलता   कोल्हे   यांच्या   हस्ते   करण् यांत   आले   त्याप्रसंगी   त्या   बोलत   होत्या .  याप्रसंगी   देवीमंदिर   व   जयबा

सागर पंचारिया यांचे डाक विभाग टेबल टेनिस मध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड

Image
श्री सागर पंचारिया यांचे राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेबदल त्यांचा सत्कार करताना पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव समवेत श्री संदीप कोकाटे,प्रकाश कदम,कमलेश मिरगणे,अनिल धनावत अहमदनगर: प्रधान डाकघर अहमदनगर मधील डाक सहायक श्री सागर शिवकुमार पंचारिया यांची डेक्कन जिमखाना पुणे येथे दि 25 ते 26 ऑगस्ट दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.     राज्यस्तरीय डाक विभागीय  टेबल टेनिस स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली.  महाराष्ट्रातील पंचेवीस स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता त्यामधून पुरुष गटात 5 तर महिला गटात 4 स्पर्धकांची जणांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.  त्यामध्ये अहमदनगर पोस्टल विभागातून  श्री सागर पंचारिया,पुणे विभागातील श्री मधू लोणारे तर मुंबईतील श्री नरेंद्र चिपळूणकर,श्री गवास,श्री ठाकूर  तर श्री तेली यांची राष्ट्रीय पुरुष गटातून तर श्रीमती मालवणकर,श्री टिकम मुंबई तर श्रीमती सारिका नलावडे पुणे यांची महिला गटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा कोलकत्ता येथे होणार असून वरील स्पर्धेत वरील  महाराष्ट्र राज्याचे वतीने हे सहभागी

सोमय्या ग्रामीण विकास केंद्र करणार शैक्षणिक मदत

कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी कारखान्यापासून वीस किलोमीटर पर्यंत  कोपरगाव तसेच शहर व राहाता तालुक्यातील परिसरातील हायस्कूल व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या हुशार व परिस्थितीने गरीब असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी सोमय्या ग्रामीण विकास केंद्र समीर वाडी या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन 2021 22 या शैक्षणिक वर्षाकरिता दहावी-बारावी डिग्री व उच्च शिक्षण या परीक्षेत 75 टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी व 70 टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत दिली जाणार आहे .यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दोन ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान भरावयाचे आहेत अर्ज भरलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना ऑक्टोबर 2021 मध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची एक प्रत आमच्या कार्यालयात जमा करावी असे आवाहन गोदावरी बायो रिफायनरी चे संचालक सुहास गोडगे व उपमहाव्यवस्थापक  बाळासाहेब पालवे यांनी केले आहे. गोदावरी बायो रिफाइनरी लिमिटेड समीर वाडी आणि साखरवाडी या भागातील रहिवासी शिक्षण घेणारे विद्यार्थी वीस किलोमीटर पर्यंत बसलेले

आपेगावात २०१ कोरोना लसीकरण

Image
कोरोना जागतिक महामारीत स्वतःच्या आरोग्याबरोबरच गावचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण महत्त्वाचे असून गावकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच मंगल ज्ञानेश्वर भुजाडे व उपसरपंच किसन सोपानराव गव्हाळे  यांनी केले. कोरोना प्रतिबंध शिबिरात 201 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.                गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोना महामारीचा संसर्ग वाढला आहे. त्यात  संजिवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व संजिवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सातत्याने गाव पातळीवर लक्ष केंद्रित करून कोरोना योद्ध्यासह  असंख्य नागरिकांना व निराधार व्यक्तींना आधार देण्याचे काम केले आहे.  भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी महिलांमध्ये याविषयी जागृती करून बचतगटांच्या भगिनींना सहकार्य केले असे उपसरपंच किसन गव्हाळे म्हणाले गावातील युवकांनी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी रेजिस्ट्रेशनसाठी सहकार्य केले.या शिबीरात ग्रामसेवक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आपेगाव सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटोळे, उपाध्यक्ष आसाराम सोमा पगारे, मंगलताई पाटोळे, शैलाबाई

संजीवनीच्या १८ विद्यार्थ्यांची टीसीएस मध्ये निवड - अमित कोल्हे..... संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल

Image
कोपरगांव प्रतिनिधी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या १८  विध्यार्थ्यांना  टाटा कन्सलटनसी सर्विसेस (टीसीएस) या बहुतांशी  क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या  बहुराष्ट्रीय    नांमांकित कंपनीने नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे. यातील सर्वच विद्यार्थ्यांना  सुरूवातीस सुमारे रू ३. ५  लाखांचे वार्षिक  पॅकेज देवु केले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी  पत्रकाद्वारे दिली आहे.  श्री. कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की टीसीएस कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवड केलेल्या  विद्यार्थ्यांमध्ये  संकेत विजय वालझडे, भगवान अशोक शिंदे , आदित्य राजेश  डोंगरे, दिपक मोहन निकम, मानसी सुनिल अमृतकर, अभय राजेंद्र पानगव्हाणे, महेश  पोपटराव शिंदे , शुभम  माधवराव डांगे, पुणम संभाजी सौदागर, तृप्ती राजेंद्र महाजन, अनिकेत शशिकांत  मते, ऋतुजा सुभाष  दंडवते, शिवम  वैभव दर्शने , प्रतिक शरद गमे, यशवंत रावसाहेब गुरसळ, निकिता दिनेश  काबडे, गणेश  संजय कराळे व  अंकुश  तुकाराम केदार यांचा समावेश  आहे.            मा

कल्पना बोरा यांचे निधन

Image
कोपरगाव प्रतिनिधी येथील स्थानकवासी जैन समाजाच्या कार्यकर्त्या व  पीपल्स बँकेच्या माजी संचालिका कल्पना सुनिल बोरा वय 52 यांचे संथारा व्रतात निधन झाले कापड व्यापारी सामाजिक कार्यकर्ते साई भक्त सुनील भाऊ बोरा यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्यामागे पती दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

सौ. शकुंतला रंगनाथ डोखे यांचे निधन

Image
कोपरगाव प्रतिनिधी खडकी येथील  वारकरी सांप्रदायातील सौ. शकुंतला रंगनाथ डोखे वय - ६५ यांचे  हृदयविकाराने निधन झाले . वारकरी संप्रदायातील अनुयायी रंगनाथ निळोबा डोखे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या  मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षाबंधन साजरा करून सासरी परतत असलेल्या श्रीरामपूरच्या नवविवाहितेचा कोपरगाव जवळअपघातात दुर्दैवी मृत्यू भाऊ जखमी

कोपरगाव  प्रतिनिधी नगर-मनमाड महामार्गावर  शहरानजीक असलेल्या मोठ्या पुलावरून भावासोबत सासरी जाणाऱ्या नवविवाहितेला एका भरधाव कंटेनरने जोराची धडक दिल्याने श्रीरामपूरच्या नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून अपघात होताच कंटेनरचालक पळून गेला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबतचीअधिक माहिती अशी भाऊ बहिणीच्या   अतूट नात्यांचा सण रक्षाबंधन  या निमित्ताने  नवविवाहिता प्रियंका सचिन साळुंके (वय २४)हल्ली रा.मालूजे खुर्द ता श्रीरामपूर ही येवला तालुक्यातील देशमाने येथे भावासोबत आली होती मोठ्या आनंदाने सण साजरा करून सासरी  मोटारसायकल वरून जात असताना कोपरगाव शहरातील नगर - मनमाड महामार्गावर असलेल्या गोदावरी मोठ्या पुलानजीक  दुचाकीला कंटेनरने जोराची धडक दिल्याने अपघात होऊन या अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.   या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे  पथकाने याठिकाणी येऊन नवविवाहिता व तिच्या भावाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी नवविवाहित तरुणीला मयत घोषित केले. दरम्यान पोलीसांनी कंटे

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याचा कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध

कोपरगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांनी  आक्षेपार्ह विधान केल्याने  शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगांवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने  करून निषेध नोंदवून  शहर पोलिस ठाण्यात केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेसाठी निवेदन देण्यात आले.        निवेदनात म्हटले  की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करतांना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने  शिवसैनिकां च्या भावना दुखावल्या आहेत. हे वक्तव्य अशोभनीय असून लोकशाहीच्या विरोधात आहे.  राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी  एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिले आहे. या वेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  अमृतमहोत्सव हा शब्द आठवला नाही म

जगाच्यi पोशिंद्याला शेतकरीदिनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे_ खंडागळे

Image
मुर्शतपुर व धiरणगाव येथे शेतकरी दिन साजरा करण्यात आला, शेतकऱ्यांना यावेळी शेती शाळा बॅगचे  वाटप करण्यात आले. जगाचा पोशिंदा शेतकरी असून कमी पाण्यात, कमी खर्चात त्याच्या शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे यासाठी तालुक्यातील मुर्शतपुर व धारणगाव परिसरातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत निफाड येथील वरिष्ठ संशोधक पोपटराव खंडागळे यांनी डॉ.   विखे पाटील यांच्या १२१ व्या जयंती शेतकरीदिनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देऊन शेतकरी दिन साजरा करण्यात आला.   उपस्थित शेतकर्‍यांना यावेळी शेतीशाळा बॅगेचे वाटप करण्यात आले.   प्रारंभी कोपरगाव तालुका कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी संगीता सोळसे यांनी शेतकरी दिन का साजरा करावा याचे प्रास्ताविक केले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले.                वरिष्ठ कृषी संशोधक पोपटराव खंडागळे म्हणाले की, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविल्या  आहेत.   शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणं हे महत्त्वाचे आहे.  तंत्रज्ञान प्रगत आहे, त्याचा शेतकऱ्यांनी वेळोवेळी लाभ