श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पोशाख व शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीला व मूर्तीला शाल महावस्त्र दान देणाऱ्या बेंगलोर येथील भाविक ड्रेस डिजाइनर सविता चौधरी


कोपरगाव प्रतिनिधी

संपूर्ण विश्वाचे पालक पंढरपूर चे श्री विठ्ठल रुक्मिणी अख्या महाराष्ट्राचे दैवत शिर्डीचे साईबाबा आंतरराष्ट्रीय देवस्थान येथील दैवतांना बेंगलोर स्थित असलेल्या ड्रेस डिझायनर सविता चौधरी यांनी पोशाख महावस्त्र दान दिले आहेत माझी छोटीशी सेवा विठ्ठल-रुक्मिणी व साईबाबांनी त्यांच्या चरणी स्विकारली व हिंदुस्थानातील सर्व नागरिकांना निरोगी आरोग्य व मनःशांती मिळावी सर्वजण सुखा समाधानाने रहावे कोरोनाला कायमच हद्दपार करावं म्हणून त्यांनी महा वस्त्र अर्पण करतेवेळी या दैवतांना साकडे घातले .बंगलोर निवासी असलेल्या ड्रेस डिझायनर सविता चौधरी यांचे वडील विधिज्ञ श्रीशेल चौधरी व आई लक्ष्मी बाई चौधरी यांनी आत्तापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी ला वसंत पंचमी विवाह सोहळ्यात व गुरुपौर्णिमे च्या नंतर प्रक्षाळ पूजेला पिवर वेलवेट  सिल्क पगडी रेशमी  धोतर उपरणे अंगरखा बंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी  विठ्ठल जोशी यांचेकडेअर्पण केले. प्रक्षाळ पूजेच्या दिवशी देवाची पूजा करणारे डॉक्टर दिनेश कुमार कदम, देवगड दत्त देवस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज आदींच्या उपस्थितीत हे महावस्त्र पोशाख पांडुरंगाला परिधान केले होते तसेच आंतरराष्ट्रीय देवालय असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीला उच्च प्रतीचे कापड वापरून रुद्राक्ष हातकाम विणकरी करून स्टोन मोती लेस वापरून महाशिवरात्रीला तसेच दरवर्षीच्या गुरुपौर्णिमेला हे महावस्त्र दान दिल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले शिर्डीच्या साईबाबांना साईबाबांनी सांगितल्याप्रमाणे देव एकच आहे त्याची विविध रूपे आहेत सत्यम शिवम सुंदरम शिर्डी माझे पंढरपुर ही देवस्थाने सर्व हिंदुस्थानातील जगातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे अनेक जाती धर्माचे लोक त्यांच्या चरणी नतमस्तक होतात अशा देवस्थानांच्या मूर्तींना मला देवानेच  पोशाख शाल महावस्त्र दान करण्याची बुद्धी दिली त्यामुळे मला खरोखर मनशांती मिळत आहे असे तरुण ड्रेस डिझायनर सविता चौधरी म्हणाल्या .त्यांनी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी कर्नाटक राज्यातील छोटे मोठे साई मंदिर हुबळी साई मंदिर महाराष्ट्रातील विविध मंदिरातून आपल्या कलेद्वारे तयार केलेल्या विविध पोशाख शाली उपरणे यांचे दान केलेले आहे. विविध महा वस्त्रांसाठी त्या सुरत मुंबई कर्नाटक बंगलोर दिल्ली येथून उच्च प्रतीचे रेशमी कापड पिवर सिल्क विविध मटेरियल  वापरतात.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा