केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे गोदावरी नदीपात्रात हजारो मासे मृत नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवासावर होणार परीणाम


कोपरगाव प्रतिनिधी

गोदावरी नदीला आलेल्या पावसाच्या पुराच्या पाण्यात केमिकलयुक्त पाणी मिसळल्यामुळे कोठुरे ता निफाड जवळ गोदावरी नदीत हजारो मासे मृत झाल्याचे  समोर आले आहे. यामुळे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात असणाऱ्या पक्षांचा अधिवास धोक्यात आला आहे. कोठुरे लगत नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य असून केमिकलयुक्त दूषित पाण्याने पक्षी अधिवास धोक्यात आला आहे,मासे मृत झाल्याच्या ठिकाणी ग्लोसी आयबीज हा पक्षी देखील मृत अवस्थेत आढळला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी कोठुरे जवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये  हजारो मासे पाण्यावर तरंगताना दिसले परिसरातील नागरिक व मासेमारी करणार्यानी मासे जवळ जाऊन पाहिले तेव्हा ते मृत अवस्थेत आढळले त्यावेळी पाण्यावर  केमिकल युक्त तवंग दिसला  त्यात हे मासे मृत झाल्याचे समोर आले.

     विशेष म्हणजे पाण्यावर तरंगणारे हे मासे परिसरातील काही लोकांनी गोण्या भरून घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे, साधारण पाहून ते एक किलोचा एक एक मासा होता ,दूषित पाण्याने मृत झालेले हे मासे जर चुकून खाण्यात आले आणि त्याचा यदाकदाचित आरोग्यावर परिणाम झाला तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे 

      गेल्या आठवड्यात नांदूरमध्यमेश्वर धरणातून गेट टेस्टिंग  साठी पाणी सोडल्यानंतर

शेकडो मासे मृत झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा गोदापात्रात मासे मृत झाले आहेत,यापूर्वीही गोदापात्रात मासे आणि काही पक्षी मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

-----------------------------------------------

रामसर दर्जा धोक्यात 


नांदूरमध्यमेश्वर पक्षितीर्थ व परिसर हा रामसर दर्जा मिळालेला  हे ठिकाण आहे, हजारो विविध प्रकारचे देशी विदेशी पक्षांचा अधिवास येथे असल्याने पक्षी अभयारण्य म्हणून ख्याती पावलेल्या या ठिकाणी येणाऱ्या पक्षांचे बंधाऱ्यातील नदीपात्रातील मासे हे प्रमुख खाद्य आहे, दूषित पाण्याने मृत मासे होत असतील तर तर पक्षांचा अधिवास निश्चितपणे धोक्यात आहे.

     गोदावरी नदीमध्ये नाशिक महानगरपालिका  क्षेत्रातून व परिसरातील कारखान्यातून केमिकल सोडले जाते,हे केमिकल पाण्यात मिसळून पाणी दूषित होते, नांदूरमध्यमेश्वर धरणातून लासलगाव सह 16 गाव पाणीपुरवठा व इतर पाणी योजना असल्याने पिण्याचा पाणी पुरवठाही धोक्यात असून केमिकल पाणी सोडण्यावर अनेकदा चर्चा झाली,निवेदने दिली पण गोदापात्रात केमिकल मिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार गेल्या काही वर्षापासून थांबत नाही.

------------------------------------------

गेल्या अनेक वर्षापासून गोदावरी नदी पात्रात येणार आहे केमिकलयुक्त पाण्यामुळे अनेकदा मासे  व इतर प्राणी संपदा मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या याबाबत प्रशासन फारस गांभीर्याने घेत नाही निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर नंतर आठवडाभरातच कोठुरे परिसरात मासे मृत आढळल्याने पक्षी तसेच माणसांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होणार आहे शरद चांदोरी कोठुरे तालुका निफाड
फोटो केमिकल यक्त पाण्यामुळे परिसरात होत झालेली मासे या परिसरात मृत आढळलेला पक्षी ग्लॉसी आय बीज.तामसवाडी   ,तारुखेडले.ना़ंदुरमध्यमेश्वर.करंजी खुर्द.ब्राह्मण वाडे.खेडले झुंगे व आदी गावातील गोदापात्रात दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू
  नदीतून कुंपण नलिकेद्वारे पाणीपुरवठा असणाऱ्या गावांना आरोग्याचा धोका    तामसवाडी परिसरात रवीवारी गोदावरी नदीच्या पात्रात दूषित निळेशार पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तर या दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत  होऊन ते नदीच्या काठावर आल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
    गोदावरी नदीच्या काठावरून अनेक गावांना कुंपण नलिकेद्वारे पाइपलाइन करून पाणी पुरवठा केला आहे तर काही शेतकऱ्यांनी शेती साठी केलेल्या पाइपलाइनद्वारे पाणी शेतात व त्यातून शेतीवाडी वस्त्यावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत जात आहे त्यामुळे हेच पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत तर हेच पाणी शेतातील पिकांना देत असल्यामुळे शेतीचा पोत खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही   
   नाशिक शहरातील अनेक केमिकल युक्त औषध, किटकनाशक, कंपन्यांमधून गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जाते गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील सांडपाणी याच नदीत येऊन त्यामुळे पाणी वारंवार दूषित होते प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी  नागरिक आणि मुके प्राणी यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बे जबाबदार लोकांवर कारवाई करावी अशी मागणी अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे
              तामसवाडी  व  गोदा काठ शिवारात गोदावरी नदीत मोठया प्रमाणावर पानवेली आल्याने त्या पानवेली पूर्णपणे सडलेल्या असुन त्याची दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे दुर्गंधीयुक्त पाणी आले असून केमिकलयुक्त पाणी आल्यामुळे अनेक मासे मृत झाले तर डासाचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ्न निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे

प्रतिक्रिया
           दूषित पाण्यामुळे गोदापात्रात मासे मृत झाले या माश्यांवर नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षांची उपजीविका अवलंबून आहे दरम्यान या माश्यामुळे पक्षांच्या अदीवासावर परिणाम होणार आहे तर काही मृत मासे काही नागरिकांनी खाण्यासाठी घेऊन गेल्याने उद्या काही घडल्यास तर याला जबाबदार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सडलेल्या पानवेलीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावचे आरोग्य धोक्यात आले आहे
दत्ता आरोटे
जिल्हाध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना नाशिक


दुषित पाण्यामुळे गोदापात्रात मासे मृत झाले या माश्यांवर नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयआरण्यातील पक्ष्यांची उपजीविका अवलंबून आहे दरम्यान या माशांमुळे पक्षांच्या अधिवासावर परिणाम होणार आहे तर आढळलेले मृत मासे काही नागरिकांनी खाण्यासाठी घेऊन गेल्याने उद्या काही विपरीत घडले तर याला जबाबदार कोण

        ------ रोहित मोगल पक्षीमित्र

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा