सेवेचे कर्म कर्तव्याच्या धर्मातून चिपळूनपूरग्रस्तांना मदत_ विवेक कोल्हे

कोपरगाव शहर व परिसरातील प्रत्येक व्यक्ती, उद्योजक, कारखानदार, सामाजिक संस्था, छोट्या-मोठ्या घटकांनी, संजीवनी उद्योग समूह- संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत चीपळूनपूरग्रस्तांसाठी जी सामग्री दिली  मदत दोन ट्रकच्या सहाय्याने रवाना करण्यात आली त्याचे विधिवत पूजन करताना संजीवनी  युवा  प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे.

आपत्तीत माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य देत त्या कामातूनच कर्तव्याचा धर्म मानून चिपळूनपूरग्रस्तांसाठी कोपरगाववासिय  पुढे आले, त्यांनी प्रत्यक्ष मदतीच्यi  आवाहनाला प्रतिसाद देत सामग्री दिली ती थेट पूरग्रस्तiपर्यंत पोहचून संजीवनी युवा प्रतिष्ठान त्या भागातील आपद्ग्रस्तांसाठी एक दिवस वैद्यकीय मदत कॅम्प घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
            कोपरगाव शहर व परिसरातील प्रत्येक व्यक्ती, उद्योजक, कारखानदार, सामाजिक संस्था, छोट्या-मोठ्या घटकांनी, संजीवनी उद्योग समूह- संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत चीपळूनपूरग्रस्तांसाठी जी सामग्री दिली त्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानने आणखी भर घालत हे साहित्य थेट चिपळूनपूरग्रस्तiपर्यंत दोन ट्रकच्या सहाय्याने शुक्रवारी थेट रवाना करण्यात आले, त्याचे विवेक कोल्हे यांनी विधीवत पूजन करून  झेंडा दाखविला त्याप्रसंगी ते बोलत होते.
           प्रारंभी सिद्धार्थ साठे, श्री आढाव, वासुदेव शिंदे, रवी रोहमारे यांनी प्रास्ताविक केले.   याप्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, रोहित कनगरे, तळेगाव मळे येथील शनेश्वर मित्र मंडळाचे गोरख बबन टूपके व गोरख पंढरीनाथ टूपके त्यांचे सहकारी, गौरव येवले, धनंजय नवले, सागर राऊत, नंदू केकान, सागर कोळपे, अजय शार्दुल, विशाल चोरगे, अनुरांग येवले, महेंद्र नाईकवाडे, प्रशांत संत, विशाल गोरडे, आदी उपस्थित होते.  पिण्याचे पाणी, विविध खाद्यपदार्थ, ब्लॅंकेट, महिलांसाठी साड्या, गरजेची वस्र, पुरुषांसाठी पोषाख, स्वेटर, मूखपट्ट्या,  आदीं  साहित्य चिपळून पूरग्रस्तांना पर्यंत दिले जाणार आहे.   विवेक कोल्हे स्वतः संजीवनी  युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांच्या मदतीने त्याचे पूरग्रस्त भागात वितरण करत आहेत.
           श्री.  विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, आपत्ती आणि संजीवनी उद्योग समूह, कोल्हे कुटुंबीयांची मदत हे एक समीकरण तयार झालेले आहे.   माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक संकटात  सर्वप्रथम धावून येऊन आपत्तीग्रस्तांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला आहे.   तोच वसा आपण पुढे चालवत आहोत.  पंथ, प्रांत, जात, पात न मानता संकटात धावून जाणे हीच शिकवण संजीवनी युवा प्रतिष्ठानने जागवूया ज्योत माणुसकीच्या भावनेतून सर्वार्थाने पुढे नेली आहे.   चिपळूण सह अन्य पूरर्ग्रस्त भागात ज्यांची वाहने बंद पडली त्याच्या दुरुस्तीसाठी येथून प्रशिक्षित मेकॅनिक पाठवले जात आहेत.  त्याचबरोबर साथीच्या आजाराचे उच्चाटन व्हावे यासाठी डॉ.  शिंदे, आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत थेट पूरग्रस्तांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्या भागात कॅम्प  लावले जात आहेत.
किल्लारी, गुजरात, कोल्हापूर वासियांना मदत. किल्लारी, गुजरातच्या भूकंपात अतोनात हानी झाली. त्यांच्यापर्यंत युवानेते बिपिनदादा कोल्हे यांनी जीवनावश्यक वस्तूंची थेट मदत दिली.  मागील वर्षी कोल्हापूर पूरग्रस्तांना संजीवनी युवा प्रतिष्ठानने मदत केली आणि चिपळून पूरग्रस्तांना आता थेट त्यांच्यापर्यंत मदत करत असल्याचे विवेक कोल्हे  यांनी सांगितले, अशी आपत्ती परमेश्वराने कुणावरही आणू नये अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा