कोपरगाव मतदार संघातील विज रोहित्रांचा पुरवठा खंडित करू नये_ स्नेहलता कोल्हे


कोरोना महामारीचा कहर अजूनही संपलेला नाही, अशा परिस्थितीत प्रत्येक जण हवालदिल झालेला आहे, शेतकरी वर्गही त्यातून सुटलेला  नाही, थकीत वीज बिले भरणेबाबत प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यातच पावसाने ओढ दिली, खरीप पिके पाण्यावर आहेत तेव्हा वीज वितरण कंपनीने थकीत बिलांसाठी कुठलेही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये अन्यथा त्या विरुद्ध  रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल असा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

           सौ स्नेहलता कोल्हे यांनी  यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यराजा कोपरगाववर काहीसा रूसलेला आहे.   जुलै महिना संपत आला तरी पाऊस नाही, परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण तयार झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीच्या पाण्याचा स्त्रोत आहे, त्यांनी कडवळ, हिरवा चारा पिके घेतली आहेत.   काहीनीं अल्पशा पावसावर खरीप पिकांची पेरणी केली आहे, ती पिके आता पाण्यावर आली आहेत.   मात्र थकित वीज बिलामुळे वितरण कंपनीने रोहित्र खंडित करण्याचा सपाटा लावला आहे.   परिणामी शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे.   पाणी असूनही ते पिकांना वेळेवर देता येत नाही त्याबाबत असंख्य शेतकऱ्यांनी आपल्याकडे वीज प्रश्ननी लक्ष घालून पुरवठा सुरळीत करणे बाबत मागणी केली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील या प्रश्नाबरोबरच उर्वरित विजेच्या समस्याबाबत आपण नाशिक येथील मुख्य अभियंता, संगमनेरचे कार्यकारी अभियंता व कोपरगाव उपअभियंता यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी करून ह्या समस्या त्यांच्या कानी घातल्या आहेत.   तेव्हा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कुठल्याही  वीज रोहित्रांचI पुरवठा खंडित न करणेबाबत संबंधितांना तात्काळ सूचना कराव्यात अन्यथा येथील नागरिक व शेतकरी रस्त्यावर उतरतील असेही शेवटी त्या म्हणाल्या.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा