पूरग्रस्त भागात सेवाकार्य....! एक पाऊल मदतीचे..... एक पाऊल माणूसकीचे...

कोपरगाव प्रतिनिधी

पर्यटनासाठी तर आपण बाहेर जातोच मात्र सध्या आपला महाराष्ट्र पूरस्थितीच्या अतीशय कठीण वेळेतून जात आहे,त्यामुळे गरज आहे ती पूरग्रस्तांना मदतीला जाण्याची.हा विचार करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष *युवानेते विवेकभैय्या कोल्हे* यांच्या मार्गदर्शनाखाली *चिपळूण* येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक जागवूया ज्योत माणूसकीची या सामाजिक भावनेतून पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी जाणार आहेत..!!


ज्यांना पूरग्रस्तांना- पाणी बॉटल,फरसाण/बिस्कीट,चटई,ब्लँकेट,सतरंजी अशा प्रकारची मदत देण्याची भावना असेल त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या हाकेला साथ देवून या मोहिमेत सहभागी व्हावे ही विनंती..


*मदत जमा करण्याची वेळ -*
दिनांक - बुधवार दिनांक २८/०७/२०२१ ते गुरुवार २९/०७/२०२१ रोजी ठीक २.०० वाजे पर्यंत..!!

*ठिकाण -* संजीवनी युवा प्रतिष्ठान कार्यालय,खंदकनाला नजीक,कोपरगाव..!

*मदत साहित्य देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा..*
-8181909090
-9970649649
-8657209090
-9028880005
-7387886565

"मी नाही तर आपण या भावनेने आपल्या बांधवांवर आलेल्या संकटात उभे राहूया..!"

*अश्रू पुसून पीडितांचे त्यांना आपण सावरू शकतो..,*
*मदत करून मनापासून जखमा माणूसकीने भरू शकतो..!*

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा