गंगापूर धरणातून ५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग छायाचित्र महेश जोशी

कोपरगाव प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे त्यामुळे गंगापूर धरणातील साठाही ८० टक्क्यांपर्यंत गेला आहे, या धरणातून आज (ता.२९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. अशी माहिती विभागाने दिली आहे नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम पाऊस पडत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात पाऊस अखंडितपणे सुरू आहे.गंगापूर धरण पाठोपाठ भावली, वालदेवी धरणेही काठोकाठ भरली आहेत .धरणातून विसर्ग दुपारी ४ पर्यंत टप्याटप्याने ३००० क्यूसेक्स सोडण्यात येणार आहे.नदी किनारी राहाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आला आहे.                                           घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला संततधार पाऊस सुरू असून  दारणा, गंगापूर, भावली धरण समूहातून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात २६२३ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.    गंगापूरचा डिस्चार्ज आणखी वाढवला जाऊ शकतो.       बुधवारी पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये तर कंसातील आकडेवारी आज पर्यंत आहे. जायकवाडीत आज ५७ टि.एम. सी पाणी साठा उपलब्ध आहे. कोपरगाव तालुका परिसरात मात्र पाऊस बिलकुल नाही त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे सतत ढगाळ वातावरण ऊन सावलीचा खेळ सुरू आहे.
         दारणा १७ (४६८) गंगापूर ६० (१००३), मुकणे १९(५३६), कडवा १५ (३०३)  काश्यपी २१ (६९५)  भावली ७० (२१८३) वालदेवी ५ (२३७), गौतमी ३५ (७५७), वाकी  ३९ (८५४),  नांदूर मधमेश्वर ० (१२५) नाशिक ६ (३५६),  त्र्यंबकेश्वर ३५ (१०१३), घोटी ४५ (१०७२), इगतपुरी ६० (१८६०), देवगाव ० (२२९),  महालखडे ००, ब्राह्मणगाव ० (२७७), कोपरगाव ० (२२७), पढेगाव ० (८२), सोमठiनI  ० (१२३), कोळगाव ० (१४१), शिर्डी ० (२५८), सोनेवाडी  ० ( १७६), रांजनगाव ००  (२५०), चितली ० (१८२), राहता ० (१८३),  तर दारणा ५५८६, गंगापूर ४४२२, मुकणे ३३९७, कडवा ८९०, काशपी  ८२८,  भावली १४३४, वालदेवी ११३३, गौतमी ९५६, वाकी  धरणात ९८३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.   कोपरगाव विधानसभा मतदार संघात पाऊस नसल्याने सोयाबीन, मका, कापूस, ऊस  आदी खरीप पीक उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत आहेत. गोदावरी  कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने आसपासच्या पिकांना व विहिरींना त्याचा फायदा होत आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा