भाजी बाजार भरला दुर्गंधीयुक्त शौचालयाच्या समोरच शोकांतिका भाजी बाजारची__


कोपरगाव प्रतिनिधी
सध्या कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना कोपरगावला नगरपालिकेत समोरच असलेल्या शौचालया समोरच दुर्गंधीयुक्त वातावरणात आठवडे बाजार भरवण्यात आला याकडे ना संबंधित विभागाचे लक्ष ना कारवाई अथवा ना भाजी विक्रेत्यांना समज त्या बाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे शहरात रोजचा भाजी मंडईत भाजीपाला येत असतो मुळ भाजी मंडई गुरुद्वारा रोड बँक रोड परिसरात आहे परंतु गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना तिथे न बसु देता तहसील कार्यालय जवळ पोस्ट कार्यालय लगत विक्रीसाठी जागा दिली आहे दुर्दैवाने काही भाजी व्यापारी सुद्धा येथे दुकान लावतात शनिवार रविवार संचारबंदी असते त्यामुळे सोमवारी या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात नागरिक महिला भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करतात काही महिन्यांपूर्वी मोजक्या प्रमाणात असणारे ही तात्पुरती भाजी मंडई चे मोठे स्वरूप झाले आहे मोकळे मैदान सोडून काही भाजी विक्रेते शेतकरी रस्त्यावर दुतर्फा येऊन दुकाने लावतात भाजीबाजारात अनेक जण विना मास्क चे ही फिरत होते तर काहींनी नावापुरता तो गळ्यात पाठवला होता असे चित्र दिसत होते.
आज सोमवार दि २६/७ रोजी कहर च झाला नगरपालिकेच्या समोरच येथे असलेल्या शौचालयाच्या दारात च भाजीपाला विक्री केला जात होता  परीसरात शौचालयाची दुर्गंधी असुनही मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यातच अजुन विशेष म्हणजे येथे वीज वितरण कंपनीची डीपी ही अतिशय खाली आहे यदाकदाचित दुर्दैवाने काही अनर्थ झाल्यास त्यास जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित होत आहेत.त्यालगत अहि काहीजण भाजी बाजार लावून बसले होते असे चालले तर आरोग्य कसे सुरक्षित राहणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे नगरपालिका शासन प्रशासन विभागाचे याकडे लक्ष का नाही  शहराच्या आरोग्यासाठी कोण काळजी घेणार? शौचालय लगत बसलेल्या विक्रेते यांना कोण लगाम लावणार? आज कोरोना महामारी संपलेली नाही रूग्ण प्रमाण कमी जास्त होते आहे शहराला नियंत्रणात ठेवण्यासाठी गर्दी कमी करण्यासाठी पुन्हा एकदा पावले ऊचलणे गरजेचे आहे
आणि सर्वात महत्त्वाचे प्रत्येक माणसाने आपल्या परीवाराची स्वतः ची  घराची गावाची सुरक्षा राखण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करणे आवश्यक आहे अन्यथा पैश्यापरी पैसा जातो आणि जवळचा माणूस डोळ्यासमोर मरताना बघायची वेळ येते दुःख टाळण्यासाठी गर्दी टाळा
स्वच्छता राखा मुखपटटी वापरा सोशल डिसटंस राखा 
शासन प्रशासनाने दिलेल्या सुचना पाळा शासनाला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करायला शिक ले पाहिजे अशी चर्चा शहरात त्यानिमित्ताने झडत होती

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा