सहकार उद्यमीचा मोफत शिवण कला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ..... फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी यांचे हस्ते संपन्न
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी आयोजित मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी यांच्या हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात औरंगाबादच्या प्रशिक्षक सौ.रिना जाधव, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या प्रमुख विविध महिला बचत गटांच्या महिलांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या
प्रसंगी अध्यक्षा सौ.सुहासिनि कोयटे म्हणाल्या ,‘महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आजच्या धावपळीच्या युगात सक्षम बनविण्याचा प्रयत्न महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षा अॅड.सौ.अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रात करत आहोत. महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर विविध व्यवसायाचे ज्ञान असणे देखील तितकेच महत्वाचे असल्यामुळे शिवण कला क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान बचत गटातील महिलांना अवगत व्हावे यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिवसभर केले होते महिलांनी याविषयी परिपूर्ण ज्ञान अवगत करावे. सौ सिमरन खुबाणी या कोपरगावातील महिलांनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व महिलांना आदर्श आहे. त्यांनी फॅशन डिझायनींग चा अत्याधुनिक व्यवसाय सुरु केलेला असून त्या फॅशन डिझायनींगच्या माध्यमातून महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.
शुभारंभ प्रसंगी फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी म्हणाल्या कि,‘महिलांचे सक्षमीकरण होणे हि आज काळाची गरज बनली आहे. काळाची गरज ओळखून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी अतिशय महत्वपूर्ण पाऊल उचलले असून त्यांच्या दूरदृष्टीकोनामुळे महिला बचत गटातील महिलांना निश्चितच फायदा होणार आहे. तालुक्यात कोयटे परिवार सतत सामाजिक, शैक्षणिक, सहकारात सतत प्रयत्नशील राहून प्रशंसनीय कार्य करीत आहे.
प्रसंगी औरंगाबाद येथील फॅशन डिझायनर व प्रशिक्षक सौ.रिना जाधव म्हणाल्या कि,‘महाराष्ट्रातील महिलांसाठी सहकार उद्यमीचा शिवण कला विषयी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून महिलांना प्रशिक्षित करीत असून महिलांना सक्षम बनविण्यासाठी सहकार उद्यमी विविध उपक्रम व रोजगाराच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आम्ही महिला देखील शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना घरोघरी जाऊन प्रशिक्षण दिले जाईल.
यावेळी सौ.सिमरन खुबाणी, प्रशिक्षिका सौ.रिना जाधव यांचा समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनि कोयटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला . सूत्रसंचालन परिचय कु.रेणुका मुन्शी यांनी केला. शिबीर यशस्वीतेसाठी सहकार उद्यमी आणि समता महिला बचत गटाचे कर्मचारी, समता महिला बचत गटाच्या महिला आदींनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरास शहरातील व ग्रामीण भागातील महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Comments
Post a Comment