गावाला त्रास करणाऱ्या अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही... पोलीस निरीक्षक देवरे

पोहेगांव दूरक्षेत्र पाच पोलिस कर्मचार्‍यांसह कायम सुरू ठेवण्याच्या आश्वासनानंतर सरपंच औताडे यांचे उपोषण मागे


कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत पोहेगांव दूरक्षेत्र आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षापासून हे दूरक्षेत्र कायमस्वरूपी बंद असल्याने पोहेगाव परिसरात अवैध धंद्यासह चोऱ्यामाऱ्या वाढले होत्या. हे सर्व थांबण्यासाठी काल सरपंच अमोल औताडे ग्रामस्थांसह पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीत असतानाच शिर्डी पोलीस ठाण्याचे नुकतेच पोलीस निरीक्षकपदी नेमणूक झालेले पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आपल्या फौजफाट्यासह पोहेगाव गाठत सरपंच अमोल औताडे यांची समजूत काढत पंधरा दिवसाचा अवधी द्या अवैध धंदे व चोऱ्यामाऱ्यानां पोलिसी खाक्या दाखवु गावाला त्रास देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही. पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह पोहेगाव दूरक्षेत्र कायमस्वरूपी सुरू राहील   असे आश्वासन  ग्रामस्था समोर पोलीस निरीक्षक देवरे यांनी दिल्यानंतर सरपंच अमोल औताडे यांनी उपोषण तूर्त मागे घेतले.यावेळी शिवसेना नेते नितीनराव औताडे,उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रा.प.सदस्य राजेंद्र औताडे,ज्ञानेश्वर गांगुर्डे,संदिप औताडे,निवृत्ती औताडे,विनायक मुजगुले,वसंत औताडे,रमेश झांबरे,चांगदेव शिंदे,प्रकाश औताडे,प्रकाश रोहमारे,रविंद्र भालेराव,प्रमोद भालेराव,राजेंद्र कोल्हे, पोलीस कर्मचारी पी एन मकासरे, श्री औताडे,श्री फड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी  पोहेगांव परिसराच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा देत  ग्रामस्थांना बरोबर घेत पंचवीस वर्षांपासून अवैध धंद्यावाल्या विरोधात आम्ही लढा दिला आहे. उपोषण आणि आंदोलनाची आम्हाला हौस नाही. मात्र खुलेआम दारू विक्री, मटका जुगार, चोऱ्यामाऱ्या यामुळे गावचे वातावरण दूषित होते. साडेचारशे लहान-मोठे दुकानदार पोलिस स्टेशन व गावच्या ग्रामपंचायतवर विश्वास ठेवून व्यवसाय करतात. मात्र पोलीस आउट पोस्ट सुरू नसल्याचे चोऱ्यामाऱ्या व अवैध धंदे करणाऱ्यांचे फावले जाते.गावात व्यापारी असोसिएशनने दीड वर्ष रात्रीचा पहारा देत गावची सुरक्षा केली. मात्र पोलीस स्टेशनने कुठलेच सहकार्य  न केल्यामुळे रात्रीचा पहारा बंद झाला.आणि त्यानंतर लगेच एटीएम फोडून चोरट्यानी आठ लाख रुपये लांबवले.आमचा उठाव अवैद्य धंदेवाल्या विरोधात कायमच राहील ते आमचे तत्वच आहे. पोलीस स्टेशनने चांगल्या प्रकारे सहकार्य केले तर गावात कायदा सुव्यवस्था आबाधित राहिल असेही औताडे यांनी सांगितले.पोलीस आऊट पोस्ट बंद आहे मात्र वेळच्या वेळी हप्ता घेण्यासाठी पोलिस कर्मचारी येत असल्याचेही ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक देवरे यांच्या लक्षात आणून दिले.ग्रामस्थां समोर लेखी पत्र देत देवरे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पोलीस स्टेशन मार्फत पूर्ण करण्यात येईल असा शब्द दिला.शेवटी सरपंच अमोल औताडे यांनी आभार मानले. .चौकट. पोहेगाव येथील पोलीस चौकी गेल्या पाच वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या बळ कमी असल्याचे कारण  अभावी बंद असून ही चौकी सुरू व्हावी म्हणून शिवसेना नेते नितीन राव औताडे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा