राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत अदिती जोरी प्रथम


कोपरगांव प्रतिनिधी
संजीवनी अ‍ॅकॅडमी,कोपरगांव येथील इ.6वीची विद्यार्थीनी कु.अदिती नितिन जोरी हिने राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील मंथन पब्लिसिटी लिमिटेड व पार्थ गारमेंट यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांमधील सभाधीटपणा, संवाद कौशल्यास वाव देण्यासाठी भव्य खुल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या या स्पर्धेसाठी अहमदनगर,सोलापूर,ठाणे,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा,जळगांव यांसह राज्यभरातून 330 पेक्षाही अधिक स्पर्धकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. कु.अदितीने इ6वी ते 8वी गटात टोपीशंकर या कथेचे प्रात्यक्षिकासह उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. कु.अदितीच्या यशाबद्दल संजीवनी अ‍ॅकॅडमी,कोपरगांवच्या संचालिका सौ.मनाली कोल्हे, प्राचार्या सौ.सुंदरी सुब्रमण्यम यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा