सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम
शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या सुरक्षा कर्मचा-यांना मंदिर सुरक्षा म्हणुन बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमास संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, राजेंद्र जगताप, मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, शिर्डी वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, संरक्षण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब परदेशी, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश घोळवे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दातरे, राहता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कंदाळे, शिर्डी नगरपंचायतचे अग्निशमन अधिकारी विलास लासुरे, फायर विभाग प्रमुख प्रताप कोते, शिघ्र कृती दलाचे रक्षक, संस्थान सुरक्षा रक्षक कर्मचारी व अग्निशमक कर्मचारी उपस्थित होते.
दिनाक ०७ जुन २०२१ रोजी श्री साई मंदिर सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार मंदिर सुरक्षाकामी संस्थान सुरक्षा कर्मचा-यांना प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावे असा निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने आज दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता हनुमान मंदिराच्या शेजारील मैदानात बॉम्ब शोधक व नाशक पथक, शिर्डी यांच्यामार्फत श्री साईबाबा समाधी मंदिर सुरक्षा म्हणुन संस्थान सुरक्षा कर्मचारी यांना प्रशिक्षण कार्यक्रम संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथक, शिर्डी यांच्यामार्फत विविध प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. विविध साहित्यांसह श्वानाव्दारे बॉम्ब कसा शोधायचा तसेच अशा परिस्थितीत कोणकोणती सुरक्षा घ्यावायची याबाबत माहिती देण्यात आली. याच बरोबर बॉम्ब शोधल्यानंतर त्याचा नाश कसा करायाचा याबाबत सर्व कर्मचा-यांना प्रात्याक्षिक दाखवुन याकरीता आवश्यक साहित्यांची माहिती ही दिली.
Comments
Post a Comment