नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन सोडा_स्नेहलता कोल्हे
नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे गावतळे, बंधारे भरून द्यावे अशी मागणी भाजपाच्यi प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापूर यांच्याकडे केली आहे.
त्या म्हणाल्या की, गेल्या दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांचे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पांतर्गत भावली धरण पूर्णपणे भरलेले आहे. एक व दोन वितरीका वरील पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, शेतकरी आदींनी पाण्याचे आवर्तन सोडवे म्हणून मागणी केली आहे. या भागातील विहिरी, बंधारे, गावतळे कोरडी पडली आहेत. त्यात पाणी सोडल्यास त्याचा फायदा आसपासच्या परिसरास होणार आहे व पिण्याच्या पाण्याचे संकट कमी होईल. तरी जलसंपदा खात्याने तातडीने पावले उचलून नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून आवर्तन सोडून शेतकरीवगार्गसह सर्वांना दिलासा द्यावा.
Comments
Post a Comment