शिवसेनेच्या अकार्यक्षम तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरेंना हटवून संघटना मजबूत करणाऱ्या शिवसैनिकाला संधी द्यावी..शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे यांची मागणी


कोपरगाव:
सलग 20 वर्षापासुन कोपरगाव तालुका शिवसेना अध्यक्ष या पदावर असताना कोपरगाव तालुक्यात पक्षाची राजकीय स्थिती अत्यंत दयनीय करण्यात तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे जबाबदार असुन त्यांना त्वरीत या पदावरून हटविण्यात यावे व नव्या जुन्यांचा मेळ घालुन मजबुत संघटना बांधणी करणाऱ्या शिवसैनिकाला शिवसेनेच्या तालुका अध्यक्षपदी संधी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेना नेते खा.अनिल देसाई यांनाही माहीतीसाठी निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात रहाणे यांनी म्हटले आहे की मी शिवसेनेचा गेल्या 30 वर्षापासुन एकनिष्ठेने काम करणारा कार्यकर्ता असुन मी कोपरगाव तालुक्यातील माझ्या गावच्या ग्रामपंचायतीचा शिवसेनेचा प्रथम सरपंच म्हणुन निवडुन आलेलो होतो. सध्या कोपरगाव पंचायत समितीच्या 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवुन पंचायत समिती सदस्य म्हणुन काम करत आहे.

 मी पक्ष वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असुन कोपरगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ताना पक्षामध्ये घेवुन पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
 गेल्या 20 वर्षापासुन तालुका प्रमुख पदावर शिवाजी ठाकरे कार्यरत असुन त्यांनी अद्यापपर्यंत कोपरगाव तालुका शिवसेनेचे स्वतंत्र कार्यालय केलेले नाही. तालुक्यातील शिवसैनिकांचे प्रश्न  सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नसुन तालुक्यातील संघटना खिळखीळी झालेली आहे. पक्षाच्या आदेशानुसार जे जे आंदोलन किंवा मोर्चे काढावयाचे असताना त्यासाठी 8 ते 10 लोक जमा करून फक्त फोटो काढले जातात. संघटना वाढविण्यासाठी गेल्या 20 वर्षात कुठलेही ठोस पावले उचलेले नसुन पदाधिकाऱ्यांच्या कधिही बैठका घेतल्या जात नाहीत. बुथ कमिटीच्या स्थापना करताना फक्त सरकारी कामकाजाप्रमाणे नावे भरून दिली गेलीत. त्यातील अनेक कार्यकर्ते इतर पक्षात काम करतात. पक्षामध्ये गेल्या जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी आलेल्या कार्यकत्र्यांना विश्वासात घेतलेे गेेले नाही. तसेच सदर तालुका प्रमुखांच्या कालावधीत शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये गटबाजीचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात गटबाजी वाढुन पक्ष संघटना मोडकळीस आलेली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेषान्वये दि.12जुलै पासुन सुरु झालेल्या संपर्क अभियानामध्ये दि.13जुलै रोजी कोपरगाव येथे झालेल्या बैठकीस मला व इतर असंख्य नेते व कार्यकत्र्यांना जाणिपुर्वक डावलण्यात आलेले आहे.कोपरगाव तालुक्याची पक्ष संघटना ही संघटना राहीलेली नसुन काही ठराविक लोकांचा स्वतःच्या स्वार्थासाठी व उपजिवीकेसाठी अड्डा बनलेली आहे.पक्षात बाहेरुन आलेले कार्यकर्ते निष्ठेने काम करत असुन स्वतःला निष्ठावान म्हणवुन घेणारांनी  खासदार निधीची कामे घेवुन ती इतरांना टक्केवारीवर वाटुन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेतल्याचे सर्व निवसैनिक जाणुन आहेत.स्वतःच्या स्वार्थासाठी कधी संजीवनी तर कधी कोळपेवाडी वारी करणारे पक्ष संघटना वाढविण्याऐवजी खुजी ठेवण्यातच धन्यता मानतात असे निवेदनात म्हणत  शिवसेनेच्या  अकार्यक्षम तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांना हटवून संघटना मजबूत करणाऱ्या शिवसैनिकाला तालुकाध्यक्ष पदावर काम करण्याचे संधी द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा