केशर आंबा वृक्ष लागवड
शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने मौजे को-हाळे येथील सुमारे ०४ एकर क्षेत्रात केशर आंब्यांचे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या शुभहस्ते केशर आंबा वृक्ष लागवड करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, राजेंद्र जगताप, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व कर्मचारी उपस्थित होते.
आज दिनांक २८ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थानच्या मौजे को-हाळे (केलवड रोड) येथील सर्व्हे नंबर ९७ मधील सुमारे ०४ एकर (०१ हेक्टर ६२ आर) क्षेत्रात केशर आंब्यांचे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संपुर्ण क्षेत्रात केशर या वाणाचे सुमारे ८०० आंब्यांचे वृक्ष लागवड करण्यात येणार असून यास “साई केशर आंबा बाग” असे नामकरण करण्यात आले.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते केशर आंबा वृक्षाचे लागवड करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तर संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, राजेंद्र जगताप, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे व मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदींनी प्रत्येकी एका केशर आंबा वृक्षाची लागवड करुन या कार्यक्रमात सहभाग घेतला.
Comments
Post a Comment