Posts

Showing posts from July, 2021

श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पोशाख व शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीला व मूर्तीला शाल महावस्त्र दान देणाऱ्या बेंगलोर येथील भाविक ड्रेस डिजाइनर सविता चौधरी

Image
कोपरगाव प्रतिनिधी संपूर्ण विश्वाचे पालक पंढरपूर चे श्री विठ्ठल रुक्मिणी अख्या महाराष्ट्राचे दैवत शिर्डीचे साईबाबा आंतरराष्ट्रीय देवस्थान येथील दैवतांना बेंगलोर स्थित असलेल्या ड्रेस डिझायनर सविता चौधरी यांनी पोशाख महावस्त्र दान दिले आहेत माझी छोटीशी सेवा विठ्ठल-रुक्मिणी व साईबाबांनी त्यांच्या चरणी स्विकारली व हिंदुस्थानातील सर्व नागरिकांना निरोगी आरोग्य व मनःशांती मिळावी सर्वजण सुखा समाधानाने रहावे कोरोनाला कायमच हद्दपार करावं म्हणून त्यांनी महा वस्त्र अर्पण करतेवेळी या दैवतांना साकडे घातले .बंगलोर निवासी असलेल्या ड्रेस डिझायनर सविता चौधरी यांचे वडील विधिज्ञ श्रीशेल चौधरी व आई लक्ष्मी बाई चौधरी यांनी आत्तापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी ला वसंत पंचमी विवाह सोहळ्यात व गुरुपौर्णिमे च्या नंतर प्रक्षाळ पूजेला पिवर वेलवेट  सिल्क पगडी रेशमी  धोतर उपरणे अंगरखा बंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी  विठ्ठल जोशी यांचेकडेअर्पण केले. प्रक्षाळ पूजेच्या दिवशी देवाची पूजा करणारे डॉक्टर दिनेश कुमार कदम, देवगड दत्त देवस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज आदींच्या उपस्थितीत हे महावस्त्र पोशाख प

सेवेचे कर्म कर्तव्याच्या धर्मातून चिपळूनपूरग्रस्तांना मदत_ विवेक कोल्हे

Image
कोपरगाव शहर व परिसरातील प्रत्येक व्यक्ती, उद्योजक, कारखानदार, सामाजिक संस्था, छोट्या-मोठ्या घटकांनी, संजीवनी उद्योग समूह- संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत चीपळूनपूरग्रस्तांसाठी जी सामग्री दिली  मदत दोन ट्रकच्या सहाय्याने रवाना करण्यात आली त्याचे विधिवत पूजन करताना संजीवनी  युवा  प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे. आपत्तीत माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य देत त्या कामातूनच कर्तव्याचा धर्म मानून चिपळूनपूरग्रस्तांसाठी कोपरगाववासिय  पुढे आले, त्यांनी प्रत्यक्ष मदतीच्यi  आवाहनाला प्रतिसाद देत सामग्री दिली ती थेट पूरग्रस्तiपर्यंत पोहचून संजीवनी युवा प्रतिष्ठान त्या भागातील आपद्ग्रस्तांसाठी एक दिवस वैद्यकीय मदत कॅम्प घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.             कोपरगाव शहर व परिसरातील प्रत्येक व्यक्ती, उद्योजक, कारखानदार, सामाजिक संस्था, छोट्या-मोठ्या घटकांनी, संजीवनी उद्योग समूह- संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत चीपळूनपूरग्रस्तांसाठी जी सामग्री दिली त्यात संजीवनी युवा प्रतिष्ठान

सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मयूर फाळके यांनी मिळालेल्या संधीचा सदू पयोग करावा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

Image
कोपरगाव प्रतिनिधी येथील ब्राह्मण समाजाचे तरुण युवक कार्यकर्ते व वडिलोपार्जित फाळके मशिनरी स्पेअर पार्ट चे  व्यापारी  दुकानदार    मयुर  विनायकराव  फाळके      यांची  माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या  कोपरगाव शहर अध्यक्ष पदी  निवड झाल्याबद्धल त्याचा सत्कार माजी नगराध्यक्ष. मंगेश पाटील  सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी दुकानदार उमेशराव धुमाळ तसेच किराणा व्यापारी व समता पतसंस्था चे संचालक गुलशन  होडे यांनी केला..यावेळी मयुर फाळके यांना या मिळालेल्या शहर अध्यक्ष पदाच्या जबाबदारी च्या माध्यमातून सर्वसामान्य  लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोठी मदत कोपरगावरांना होणार आहे . यावेळी उपस्थितांच्या वतीने नूतन शहर अध्यक्ष याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कु. सिद्धी लोढा 96 गुणमिळवुन तालुक्यात प्रथम.... सी.बी.एस.ईबोर्ड 12 वी निकाल जाहीर.... संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलची 100: निकालाची गुणवत्ता कायम

Image
कोपरगाव प्रतिनिधी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये कोकमठाण कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलची कु. सिद्धी पंकज लोढा 96: गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच बरोबर विद्यालाने100ः निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.  इ. 12 वी ची दहावी बॅच उत्तीर्णझालीआहे.   इयत्ता 12 वी सायन्सची सलग दहावी बॅच असुन यामध्ये प्रथम क्रमांक -सिद्धी पंकज लोढा -96 द्वीतीय क्रमांक -श्र्रेयष संजय बानकर -90ः तृतीय क्रमांक - खुषी अजित पारख -83.02ः                       वैश्णवी नंदू पाठक -83.02ः इयत्ता 12 वी काॅमर्सची सलग दहावी बॅच असुन यामध्ये प्रथम क्रमांक -आदीती दिपक पवार -72.02ः यासह 21 विद्यार्थी इयत्ता 12 वी साठीपात्र होते सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. या सर्व गुणवंत विदयाथ्र्याचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष . मोहनराव चव्हाण  सर्व विश्वस्त प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेक्षिका सौ. जे.के.दरेकर, सर्व शिक्षक व सर्व पालकांनी अभिनंदनकेले या सर्व यशस्वी विद्याथ्र्याना विद्यालयाचे शिक्षक जयप्रकाश

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत अदिती जोरी प्रथम

Image
कोपरगांव प्रतिनिधी संजीवनी अ‍ॅकॅडमी,कोपरगांव येथील इ.6वीची विद्यार्थीनी कु.अदिती नितिन जोरी हिने राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील मंथन पब्लिसिटी लिमिटेड व पार्थ गारमेंट यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांमधील सभाधीटपणा, संवाद कौशल्यास वाव देण्यासाठी भव्य खुल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेसाठी अहमदनगर,सोलापूर,ठाणे,सिंधुदुर् ग, कोल्हापूर, सातारा,जळगांव यांसह राज्यभरातून 330 पेक्षाही अधिक स्पर्धकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. कु.अदितीने इ6वी ते 8वी गटात टोपीशंकर या कथेचे प्रात्यक्षिकासह उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. कु.अदितीच्या यशाबद्दल संजीवनी अ‍ॅकॅडमी,कोपरगांवच्या संचालिका सौ.मनाली कोल्हे, प्राचार्या सौ.सुंदरी सुब्रमण्यम यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

गंगापूर धरणातून ५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Image
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग छायाचित्र महेश जोशी कोपरगाव प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे त्यामुळे गंगापूर धरणातील साठाही ८० टक्क्यांपर्यंत गेला आहे, या धरणातून आज (ता.२९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. अशी माहिती विभागाने दिली आहे नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम पाऊस पडत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात पाऊस अखंडितपणे सुरू आहे.गंगापूर धरण पाठोपाठ भावली, वालदेवी धरणेही काठोकाठ भरली आहेत .धरणातून विसर्ग दुपारी ४ पर्यंत टप्याटप्याने ३००० क्यूसेक्स सोडण्यात येणार आहे.नदी किनारी राहाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आला आहे.                                           घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला संततधार पाऊस सुरू असून  दारणा, गंगापूर, भावली धरण समूहातून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात २६२३ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.    गंगापूरचा डिस्चार्ज आणखी वाढवला जाऊ शकतो.       बुधवारी पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये तर

ठोळे उद्योग समूहाची पुरग्रस्तांसाठी 51000/- रूपयांची मदत

Image
कोपरगाव प्रतिनिधी सामाजिक सेवाभावी कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या येथील ठोळे उद्योग समूहाची पुरग्रसतांसाठी 51 हजार रुपयांची मदत शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे सुपूर्द केली आहे.  पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी चिपळूण येथे आलेल्या महाभयंकर महापुरात अनेक संसार प्रपंच वाहून गेले प्रचंड हानी झाली पुरग्रसतांना सर्वतोपरी मदत गरजेची आहे ती जाणीव संवेदनशील मनाने जाणून ठोळे उद्योग समूहाचे राजेश ठोळे यांनी एकावन्न हजार रुपये मदतीचा धनादेश पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे सुपूर्द केला.कोपरगाव करांवर ज्या ज्या वेळी मोठी आपत्ती संकटे येतात त्या त्या वेळी कोणतीही प्रसिद्धी न करता  सढळ हाताने येथील ठोळे उद्योग समूह व सोना पाँली प्लास्ट  प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने मोठी आर्थिक मदत करीत असतात  याआधीही ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद  देत रॅपिड टेस्ट किट साठी उद्योग समूहाचे संचालक व उद्योजक कैलास चंद्र ठोळे व राजेश ठोळे यांनी 51 हजार रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्र

सहकार उद्यमीचा मोफत शिवण कला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ..... फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी यांचे हस्ते संपन्न

Image
कोपरगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी आयोजित मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ  फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी यांच्या  हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात औरंगाबादच्या प्रशिक्षक सौ.रिना जाधव, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या प्रमुख  विविध महिला बचत गटांच्या महिलांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षा सौ.सुहासिनि कोयटे म्हणाल्या ,‘महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आजच्या धावपळीच्या युगात सक्षम बनविण्याचा प्रयत्न महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षा अॅड.सौ.अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रात करत आहोत. महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर विविध व्यवसायाचे ज्ञान असणे देखील तितकेच महत्वाचे असल्यामुळे शिवण कला क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान बचत गटातील महिलांना अवगत व्हावे यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  दिवसभर केले होते  महिलांनी याविषयी परिपूर्ण ज्ञान अवगत करावे. सौ सिमरन खुबाणी या कोपरगावातील महिलांनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व महिलांना आदर्श आहे. त्यांनी फॅशन डिझायनींग चा

केशर आंबा वृक्ष लागवड

Image
शिर्डी -   श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था ,  शिर्डीच्‍या वतीने मौजे को-हाळे येथील सुमारे ०४ एकर क्षेत्रात केशर आंब्‍यांचे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असून संस्‍थानचे  मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या शुभहस्‍ते केशर आंबा वृक्ष लागवड करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला. या कार्यक्रमास संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे ,  मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे ,  प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे ,  राजेंद्र जगताप ,  बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे ,  मंदिर प्रमुख रमेश चौधरी व कर्मचारी उपस्थित होते. आज दिनांक २८ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता संस्‍थानच्‍या मौजे को-हाळे (केलवड रोड) येथील सर्व्‍हे नंबर ९७ मधील सुमारे ०४ एकर (०१ हेक्‍टर ६२ आर) क्षेत्रात केशर आंब्‍यांचे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. या संपुर्ण क्षेत्रात केशर या वाणाचे सुमारे ८०० आंब्‍यांचे वृक्ष लागवड करण्‍यात येणार असून यास “साई केशर आंबा बाग” असे नामकरण करण्‍यात आले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते केशर आंबा

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करा_स्नेहलता कोल्हे

Image
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शंभर टक्के उपस्थिती देत शेतकरीवर्गाकडील माल खरेदी करून  जीवनावश्यक मालाचा पुरवठा केला आहे. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना कोरो ना योद्धा घोषित करून त्यांचे लसीकरण तातडीने करावे अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.             त्या म्हणाल्या  की, कोरोणा काळात कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रत्येक कर्मचारी व हमाल आदी बांधवांनी बजावलेली सेवा  मैलाचा दगड ठरली आहे.   या सर्व बांधवांनी आपला जीव धोक्यात घालून सर्व नियमांचे पालन करत शेतमाल खरेदीत मोलाची भूमिका बजावली.   या बांधवांनी त्यांच्या जिवाचा विचार केला असता, तर राज्यात सर्वत्र अवघड स्थिती निर्माण होऊन शेतमाल तसाच खळ्यावर पडून राहिला असता,  त्यातून अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते.   परंतु तसे न करता त्यांनी शेतकरी वर्गास आवाहन करून त्यांच्याकडील शेतमाल बाजार समितीत आणून त्याचे नियोजन चांगल्या प्रकारे हाताळले आहे.   त्यामुळे त्यांची सेवा कौतुकास

नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन सोडा_स्नेहलता कोल्हे

Image
नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे गावतळे, बंधारे भरून द्यावे अशी मागणी भाजपाच्यi प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापूर यांच्याकडे केली आहे.              त्या म्हणाल्या की, गेल्या दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांचे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  या प्रकल्पांतर्गत भावली धरण पूर्णपणे भरलेले आहे.   एक व दोन वितरीका वरील पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, शेतकरी आदींनी पाण्याचे आवर्तन सोडवे  म्हणून मागणी केली आहे.   या भागातील विहिरी, बंधारे, गावतळे  कोरडी पडली आहेत.   त्यात पाणी सोडल्यास त्याचा फायदा आसपासच्या परिसरास होणार आहे व पिण्याच्या पाण्याचे संकट कमी होईल.  तरी जलसंपदा खात्याने तातडीने पावले उचलून नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून आवर्तन सोडून शेतकरीवगार्गसह सर्वांना दिलासा द्यावा.

आर्टिस्ट सुरेंद्र वरोडे यांचे निधन

Image
प्रख्यात आर्टिस्ट सुरेंद्र वरोडे(६०)  यांचे निधन झाले.   त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.            कै. सुरेंद्र वरोडे यांनी आपल्या कलेतून अल्पावधीत छाप पाडून विविध कलाकुसरीचे कामे बोर्ड पेंटिंगद्वारे केली.  चित्रकलेत ते निपुण होते.  डिजिटल जमाना अगोदर ते स्वतः ब्रशच्या  सहाय्याने कोपरगाव शहरातील सिनेमागृह बोर्ड तसेच नाटकांचे, विविध आंदोलनाचे, प्रसंगाणुरुप विविध बोर्ड रंगवत.  त्यांच्यI निधनाने या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. विश्वात्मक जंगली महाराजावर त्यांची अपार श्रद्धा होती.

सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम

Image
शिर्डी -  श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था ,  शिर्डीच्‍या सुरक्षा कर्मचा-यांना मंदिर सुरक्षा म्‍हणुन बॉम्‍ब शोधक व नाशक पथकामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या उपस्थितीत पार पडला.         या कार्यक्रमास संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे ,  मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे ,  प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे ,  राजेंद्र जगताप ,  मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी ,  शिर्डी वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक नारायण न्‍याहाळदे ,  संरक्षण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आण्‍णासाहेब परदेशी ,  बॉम्‍ब शोधक व नाशक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश घोळवे ,  शिर्डी पोलीस स्‍टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे ,  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दातरे ,  राहता पोलीस स्‍टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कंदाळे ,  शिर्डी नगरपंचायतचे अग्निशमन अधिकारी विलास लासुरे ,   फायर विभाग प्रमुख प्रताप कोते ,  शिघ्र कृती दलाचे रक्षक ,  संस्‍थान सुरक्षा रक्षक कर्मचारी व अग्निशमक कर्मचारी उपस्थित होते. दिनाक ०७ जुन २०२१ रोजी श्री साई मंदिर स

पूरग्रस्त भागात सेवाकार्य....! एक पाऊल मदतीचे..... एक पाऊल माणूसकीचे...

Image
कोपरगाव प्रतिनिधी पर्यटनासाठी तर आपण बाहेर जातोच मात्र सध्या आपला महाराष्ट्र पूरस्थितीच्या अतीशय कठीण वेळेतून जात आहे,त्यामुळे गरज आहे ती पूरग्रस्तांना मदतीला जाण्याची.हा विचार करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष *युवानेते विवेकभैय्या कोल्हे* यांच्या मार्गदर्शनाखाली *चिपळूण* येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक जागवूया ज्योत माणूसकीची या सामाजिक भावनेतून पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी जाणार आहेत..!! ज्यांना पूरग्रस्तांना- पाणी बॉटल,फरसाण/बिस्कीट,चटई,ब्लँके ट,सतरंजी अशा प्रकारची मदत देण्याची भावना असेल त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या हाकेला साथ देवून या मोहिमेत सहभागी व्हावे ही विनंती.. *मदत जमा करण्याची वेळ -* दिनांक - बुधवार दिनांक २८/०७/२०२१ ते गुरुवार २९/०७/२०२१ रोजी ठीक २.०० वाजे पर्यंत..!! *ठिकाण -* संजीवनी युवा प्रतिष्ठान कार्यालय,खंदकनाला नजीक,कोपरगाव..! *मदत साहित्य देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा..* -8181909090 -9970649649 -8657209090 -9028880005 -7387886565 "मी नाही तर आपण या भावनेने आपल्या बांधवांवर आलेल्या संकटात उभे राहूया..!" *अश्रू पुसून पीडित

शहरात भुरट्या चोऱ्या वाढल्या..... नागरिकात घबराट.....

Image
कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या होऊनही त्याचा तपास लागत नसल्याने चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे एकीकडे शहरात कल्याण मुंबई मटका अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून त्याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष आहे शहरातील गांधी चौक कापड बाजार गोकर्ण गणेश मंदिर लगत तसेच पांडे गल्ली सराफ बाजार येथेच अनेकांच्या घरांची कुलपे तोडून घरातील सामानाची उचकापाचक करण्यात आली चोरट्यांनी काही रोख रक्कम एक सायकल व काही वस्तू चोरून नेले आहे असे चोरी झालेल्या नागरिकांनी सांगितले ब्राह्मण गल्लीतील विशाल कानडे हे पुणे येथे राहतात त्यांचे घराची कुलूप चोरट्यांनी तोडली मात्र घरात काहीच सापडले नाही सामानाची उचकापाचक केली गोकर्ण गणेश मंदिरा शेजारी प्रशांत खैरनार यांच्या घराचीही कुलूप तोडण्यात आले राहुल जंगम यांची एक सायकल चोरून नेली त्याच्यापुढे श्रीराम मेडिकल हेमंत चव्हाण यांचे घर फोडून सामानाची उचकापाचक करण्यात आली सराफ बाजारात शोभा पांडे यांच्या घरीही किरकोळ हजार एक रुपयाची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली दिनांक 23 रोजी वृत्तप

गणपती मंदिरे कोरोनामुळे पडली ओस

Image
कोपरगाव प्रतिनिधी मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी होती मात्र कोरोना महामारी मुळे तालुक्यातील पोहेगाव येथील मयुरेश्वर गणपती मंदिर संवत्सर येथील चिंतामणी गणपती मंदिर बेट भागातील श्री गणेश शहरातील गोकर्ण गणेश रस्त्यावरील श्री विघ्नेश्वर मंदिर आदी ठिकाणी मंदिरे बंद असल्याने भाविकांचा हिरमोड झाला अनेकांनी दूर वरूनच दर्शन घेण्यात धन्यता मानली. त्यामुळे मंदिरा लगत बसणाऱ्या छोट्यामोठ्या व्यावसायिकांची चांगलीच परवड झाली मंदिरापासून दूरवर लांब त्यांनी दुकाने लावली होती कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद आहे नागरिक महिलांना गेल्या सतरा अठरा महिन्यापासून कुठेही बाहेर  फिरण्यास पडता येत नाही त्यामुळे अनेक जण नाखूष आहेत  कोरोना ची महामारी कधी जाईल पहिल्यासारखे दिवस कधी  येतील असे नागरिकांना झाले आहे विघ्नहर्त्या गणरायाला अनेकांनी मनोमन प्रार्थना केली.

थकित वीज बिले तीन टप्प्यात घ्यावी_ स्नेहलता कोल्हे

Image
 कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सर्वच दैनंदिन जीवन बदलले असून सर्वसामान्यांबरोबरच, मध्यमवर्ग, शेतकरी, उच्चवर्ग आदीं समोर आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत अशा परिस्थितीत थकित वीज बिलांचा भरणा करण्यासाठी तीन टप्प्यांची सवलत  मिळावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री नितीन राऊत,  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.           त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचा प्रत्येक जण आपापल्या परीने मुकाबला करीत आहे.  लॉकडाऊन मुळे दैनंदिन व्यवहार, नोकरी, रोजगार, स्वयं रोजगार, हातावर प्रपंच असणाऱ्या  वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.   आर्थिक अडचणींचा प्रत्येकाला सामना करावा लागत आहे, त्यातच पर्जन्यमान कमी अधिक प्रमाणात होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे,.  वीजबिल आकारणी प्रचंड प्रमाणात झालेले आहे.  ही वीज बिले माफ व्हावी म्हणून आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे.   वीज बिल भरणा करण

भाजी बाजार भरला दुर्गंधीयुक्त शौचालयाच्या समोरच शोकांतिका भाजी बाजारची__

Image
कोपरगाव प्रतिनिधी सध्या कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना कोपरगावला नगरपालिकेत समोरच असलेल्या शौचालया समोरच दुर्गंधीयुक्त वातावरणात आठवडे बाजार भरवण्यात आला याकडे ना संबंधित विभागाचे लक्ष ना कारवाई अथवा ना भाजी विक्रेत्यांना समज त्या बाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे शहरात रोजचा भाजी मंडईत भाजीपाला येत असतो मुळ भाजी मंडई गुरुद्वारा रोड बँक रोड परिसरात आहे परंतु गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना तिथे न बसु देता तहसील कार्यालय जवळ पोस्ट कार्यालय लगत विक्रीसाठी जागा दिली आहे दुर्दैवाने काही भाजी व्यापारी सुद्धा येथे दुकान लावतात शनिवार रविवार संचारबंदी असते त्यामुळे सोमवारी या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात नागरिक महिला भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करतात काही महिन्यांपूर्वी मोजक्या प्रमाणात असणारे ही तात्पुरती भाजी मंडई चे मोठे स्वरूप झाले आहे मोकळे मैदान सोडून काही भाजी विक्रेते शेतकरी रस्त्यावर दुतर्फा येऊन दुकाने लावतात भाजीबाजारात अनेक जण विना मास्क चे ही फिरत होते तर काहींनी नावापुरता तो गळ्यात पाठवला होता असे चित्र दिसत होते. आज सोमवार दि २६/७ रोजी कहर च झाला नगरपालिके

रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू आवर्तनात भरून घेऊन तात्काळ कार्यान्वित करावी_स्नेहलता कोल्हे.

Image
तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगांव  देशमुख व ७ गावच्यi प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील किरकोळ त्रुटी दूर करून ही योजना चालू पाटपाण्याच्यi आवर्तनात पूर्णपणे भरून घ्यावी तसेच त्याचा ्याची वीज जोडणी तात्काळ करावी व १७५ अश्‍वशक्तीच्या दोन विद्युत मोटारींची  तात्काळ दुरुस्ती करून ही योजना कार्यान्वित करावी अशी मागणी भाजपाच्यi  प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.   याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी देखील बोलणे झाले आहे.             सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाले की, रांजणगाव देशमुख, बहादरपूर, वेस, सोयगाव, अंजनापुर, मनेगाव, व धोंडेवाडी या सात गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असून तिच्या स्वतंत्र फिडरचा प्रश्न तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात मार्गी लावून ती कार्यान्वित केली होती.   गेल्या दोन महिन्यापासून या भागात पर्जन्यमान नसल्यामुळे नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.   ही योजना गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे.   

गावाला त्रास करणाऱ्या अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही... पोलीस निरीक्षक देवरे

Image
पोहेगांव दूरक्षेत्र पाच पोलिस कर्मचार्‍यांसह कायम सुरू ठेवण्याच्या आश्वासनानंतर सरपंच औताडे यांचे उपोषण मागे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत पोहेगांव दूरक्षेत्र आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षापासून हे दूरक्षेत्र कायमस्वरूपी बंद असल्याने पोहेगाव परिसरात अवैध धंद्यासह चोऱ्यामाऱ्या वाढले होत्या. हे सर्व थांबण्यासाठी काल सरपंच अमोल औताडे ग्रामस्थांसह पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीत असतानाच शिर्डी पोलीस ठाण्याचे नुकतेच पोलीस निरीक्षकपदी नेमणूक झालेले पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आपल्या फौजफाट्यासह पोहेगाव गाठत सरपंच अमोल औताडे यांची समजूत काढत पंधरा दिवसाचा अवधी द्या अवैध धंदे व चोऱ्यामाऱ्यानां पोलिसी खाक्या दाखवु गावाला त्रास देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही. पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह पोहेगाव दूरक्षेत्र कायमस्वरूपी सुरू राहील   असे आश्वासन  ग्रामस्था समोर पोलीस निरीक्षक देवरे यांनी दिल्यानंतर सरपंच अमोल औताडे यांनी उपोषण तूर्त मागे घेतले.यावेळी शिवसेना नेते नितीनराव औताडे,उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रा.प.सदस्य

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची इन्फोसिस, स्नॅयडर, एल अँड टी, केपीआयटी, मित्तल स्टील व फिलीप्स कंपन्यांमध्ये निवड - अमित कोल्हे....ग्रामिण विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यात संजीवनी आघाडीवर

Image
कोपरगांव प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाला अथवा मुलीला  शिकून  नोकरी मिळावी, असे स्वप्न  डोळ्यात  साठवित आपल्या पाल्यांबाबत सुखाचे मनसुबे उराशी  बाळगत असतात. पालकांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे काम संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अखंडपणे चालु आहे. अलिकडेच सहा कंपन्यांनी संजीवनीच्या मेकॅॅनिकल, इलेक्ट्रिकल, काॅम्प्युटर व इलेक्ट्रिाॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची ऑनलाईन  पध्दतीने मुलाखती घेवुन त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच नोकऱ्यांसाठी  निवड केली, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली .         श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की चालु शैक्षणिक वर्षात  संजीवनी पाॅलीटेक्निकने  गरजु ३०४ विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  देवुन एक नवा आयाम प्रस्थापित केला आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांनी  उच्च शिक्षण घेण्याचे पसंद केले. अलिकडेच निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी   स्नॅयडर इलेक्ट्रिक

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे गोदावरी नदीपात्रात हजारो मासे मृत नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवासावर होणार परीणाम

Image
कोपरगाव प्रतिनिधी गोदावरी नदीला आलेल्या पावसाच्या पुराच्या पाण्यात केमिकलयुक्त पाणी मिसळल्यामुळे कोठुरे ता निफाड जवळ गोदावरी नदीत हजारो मासे मृत झाल्याचे  समोर आले आहे. यामुळे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात असणाऱ्या पक्षांचा अधिवास धोक्यात आला आहे. कोठुरे लगत नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य असून केमिकलयुक्त दूषित पाण्याने पक्षी अधिवास धोक्यात आला आहे,मासे मृत झाल्याच्या ठिकाणी ग्लोसी आयबीज हा पक्षी देखील मृत अवस्थेत आढळला आहे.      याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी कोठुरे जवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये  हजारो मासे पाण्यावर तरंगताना दिसले परिसरातील नागरिक व मासेमारी करणार्यानी मासे जवळ जाऊन पाहिले तेव्हा ते मृत अवस्थेत आढळले त्यावेळी पाण्यावर  केमिकल युक्त तवंग दिसला  त्यात हे मासे मृत झाल्याचे समोर आले.      विशेष म्हणजे पाण्यावर तरंगणारे हे मासे परिसरातील काही लोकांनी गोण्या भरून घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे, साधारण पाहून ते एक किलोचा एक एक मासा होता ,दूषित पाण्याने मृत झालेले हे मासे जर चुकून खाण्यात आले आणि त्याचा यदाकदाचित आरोग्यावर परिणाम झाला तर त्यास जबाबदार कोण असा प

कोपरगाव मतदार संघातील विज रोहित्रांचा पुरवठा खंडित करू नये_ स्नेहलता कोल्हे

Image
कोरोना महामारीचा कहर अजूनही संपलेला नाही, अशा परिस्थितीत प्रत्येक जण हवालदिल झालेला आहे, शेतकरी वर्गही त्यातून सुटलेला  नाही, थकीत वीज बिले भरणेबाबत प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यातच पावसाने ओढ दिली, खरीप पिके पाण्यावर आहेत तेव्हा वीज वितरण कंपनीने थकीत बिलांसाठी कुठलेही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये अन्यथा त्या विरुद्ध  रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल असा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.            सौ स्नेहलता कोल्हे यांनी  यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यराजा कोपरगाववर काहीसा रूसलेला आहे.   जुलै महिना संपत आला तरी पाऊस नाही, परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण तयार झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीच्या पाण्याचा स्त्रोत आहे, त्यांनी कडवळ, हिरवा चारा पिके घेतली आहेत.   काहीनीं अल्पशा पावसावर खरीप पिकांची पेरणी केली आहे, ती पिके आता पाण्यावर आली आहेत.   मात्र थकि

शिवसेनेच्या अकार्यक्षम तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरेंना हटवून संघटना मजबूत करणाऱ्या शिवसैनिकाला संधी द्यावी..शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे यांची मागणी

Image
कोपरगाव: सलग 20 वर्षापासुन कोपरगाव तालुका शिवसेना अध्यक्ष या पदावर असताना कोपरगाव तालुक्यात पक्षाची राजकीय स्थिती अत्यंत दयनीय करण्यात तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे जबाबदार असुन त्यांना त्वरीत या पदावरून हटविण्यात यावे व नव्या जुन्यांचा मेळ घालुन मजबुत संघटना बांधणी करणाऱ्या शिवसैनिकाला शिवसेनेच्या तालुका अध्यक्षपदी संधी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेना नेते खा.अनिल देसाई यांनाही माहीतीसाठी निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात रहाणे यांनी म्हटले आहे की  मी शिवसेनेचा गेल्या 30 वर्षापासुन एकनिष्ठेने काम करणारा कार्यकर्ता असुन मी कोपरगाव तालुक्यातील माझ्या गावच्या ग्रामपंचायतीचा शिवसेनेचा प्रथम सरपंच म्हणुन निवडुन आलेलो होतो. सध्या कोपरगाव पंचायत समितीच्या 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवुन पंचायत समिती सदस्य म्हणुन काम करत आहे.  मी पक्ष वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असुन कोपरगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ताना पक्षामध्ये घेवुन पक्