कर्तव्यदक्ष तत्कालीन महिला अधिकारी व लोकप्रतिनिधींबद्दल तिरस्काराची भाषा वापरणाऱ्या विक्षिप्त नगराध्यक्षांचा जाहिर निषेध - वैशाली आढाव.
कोपरगाव शहराच्या इतिहासात प्रथमच दिड कोटी रुपयाचे बक्षीस मिळवून देणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला तत्कालीन मुख्याधिकारी व कोपरगाव मतदार संघाला कोट्यावधी रूपयांचा निधी मिळवून देत विकास करणाऱ्या माजी महिला लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल कोपरगाव नगरपालेकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात महिलाबद्दल तिरस्काराची भाषा वापरुन खिल्ली उडवल्याबद्दल विजय वहाडणे यांचा समस्त महिलांच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव भाजपच्या शहर अध्यक्षा वैशाली विजयराव आढाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.
त्यांनी आपल्या पञकात पुढे म्हणाल्या कि, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या बदलीमुळे माझे वैयक्तीक मोठे नुकसान झाले असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांनी जाता जाता किमान एखादा. चांगला पुरुष अधिकारी कोपरगाव नगरपालिकेत पाठवावा, पण महिला अधिकारी आता नको. कारण यापुर्वीच्या महीला मुख्याधिकारी व माजी महीला लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल मला खुप वाईट अनुभव आला आहे. तेव्हा काहीही झाले तरी आता महिला नको असेही म्हणत महिलांची खिल्ली उडवून समस्त महिलावर्गाचा व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान केला आहे. वहाडणे व्यक्तीगत राजकीय फायद्यासाठी स्वहीताची भुमिका बजावणारे आहे. कर्तव्यदक्ष महिला अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना मानसिक ञास देवून त्यांचा अपमान नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला, आणि आता पुन्हा जाहीरपणे त्या महीलांबद्दल विक्षिप्त वक्तव्य करुन समस्त महिलांचा अवमान केल्याबद्दल वहाडणे यांचा तमाम महीलांच्यावतीने वतीने मी जाहीर निषेध करते.
ज्या तत्कालीन महिला अधिकाऱ्याने कोपरगाव शहराचा चेहरामोहरा बदलला.स्वच्छ सर्वेक्षणात देशाच्या यादीत उच्च क्रमांकावर नेवून ठेवले. कर्जबाजारीत असलेली कोपरगाव पालिका कर्जमुक्त करुन कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बॅंकेत बचत करून ठेवल्या. बेकायदा काम करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून प्रसंगी दुर्गेचे रुप धारण करुन अनेकांना वठणीवर आणले. पुरासह अनेक संकटात राञंदिवस या दोन्ही महिला देवी समान धावून नागरीकांना संकटातुनं मुक्त केल. माजी आमदार महिला असुनही शहराच्या विकासासाठी जीवाचं रान करीत विकासाची गंगा आपल्यापर्यंत पोहचवली. अशा दोन महिलांच्या अथक प्रयत्नानंतर नगराध्यक्षांना विकास कामांना निधी मिळाला.
मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षणबद्दल दीड कोटी रुपये मिळवून दिले तर सौ कोल्हे यांनी शहरासाठी सुमारे 40 कोटी रुपये उपलब्ध करून दिले त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे निश्चितच योग्य नाही. मात्र त्या पैशाची बिले काढण्यासाठी सुत जुळलेल्या मुख्यधिकारी चांगला वाटला. त्यांच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष यांनी मुक्ताफळे उधळून अकलेचे तारे तोडले आहे. दोन्हीही महिला विकासकामे करीत असताना उलट नगराध्यक्ष वहाडणे यांनी त्यात खोडा घालण्याचे काम केले. त्यांना मानसिक ञास देवून त्यांचे खच्चीकरण केले. व्यक्तीगत फायद्यासाठी महिलांचा अवमान करणे योग्य नाही. सुसंस्कारितआदर्श शिक्षिकेच्या पोटी वहाडणे जन्मलेले आहे. त्या माऊलीचे विचारधन आपल्याला घेता आले नाही.
महीलांप्रति आदर असायला हवा माञ कायम नकारात्मक भूमिका बजावत राजकीय द्वेषापोटी आणि वैयक्तिक लाभासाठी नगराध्यक्ष वहाडणे यांनी अकलेचे तारे तोडून महिलांचा अवमान करणे म्हणजे संपुर्ण महिलांचा अपमान केल्यासारखा आहे. दोन कर्तव्यदक्ष महिलांबद्दल नगराध्यक्ष वहाडणे यांनी केलेल्या विकृत वक्तव्याचा जाहीर निषेध वैशाली आढाव यांनी केला आहे.
Comments
Post a Comment