कोपरगांव तालुक्यात रविवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस
तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी परिसरातील चासनळी, धामोरी, हांडेवाडी, कारवाडी, मोर्विस या पाच गावात रविवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाच्यi प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, चालू हंगामातील हा पहिलाच पाऊस आहे. मात्र तो ढग फुटी सदृश्य पडून शेतीचे बांध, जनावरांसाठी चारा पिके, ऊस पिके, चाळीत साठवलेला कांदा, फळबागा, शेड, तात्पुरते झाप यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोरोणा महामारीमुळे अनेक जण अडचणीत आलेले आहेत. त्यात ढगफुटीचे संकट या पाच गावातील रहिवासी व शेतकऱ्यांवर ओढवलेले आहे. त्यामुळे त्यांचे नुकसानीचे पंचनामे शासनाने तात्काळ करावेत, तहसीलदारांनी त्याची पाहणी करून योग्य स्वरूपाचा अहवाल तयार करावा व त्यांना मदत द्यावी. त्याचप्रमाणे मागिल हंगामाचा पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो देखील तात्काळ द्यावा अशी मागणी सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी केली आहे. तालुक्याच्या अन्य भागात अजून मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही तेव्हा शेतकऱ्यांनी पीक पेरणीची घाई करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोपरगाव पाटबंधारे विभागात 29 मिलिमीटर जेऊर कुंभारी हवामान केंद्रात 41.3 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे .नांदूर मधमेश्वर 12 एकूण 68 देवगाव 35 एकूण 109 ब्राह्मणगाव, 20 एकूण 80 पढेगाव पाच एकूण 40 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
Comments
Post a Comment