सेवापूर्ती हा आयुष्यातील अनमोल योग -संतोष यादव..... श्री जे टी भोसलेसाहेब सेवापूर्ती सोहळा
अहमदनगर: मा श्री जे टी भोसले प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर हे त्याचे प्रदीर्घ सेवेतून दि 30 जून 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. श्री जे टी भोसलेसाहेब यांचा सेवापूर्ती सोहळा विभागीय डाक कार्यालय अहमदनगर येथे आयोजित केला होता. याप्रसंगी श्री संतोष यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सेवानिवृती हा जरी पाच अक्षराचा शब्द असलातरी सुखद सेवानिवृत्त होणेकरिता प्रत्येकाला सेवाकाळात अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागते.
आजच्या परिस्थितीत सुखद सेवानिवृत्ती हा अमूल्य योग आहे व असा अनमोल योग श्री भोसलेसाहेब यांना आला त्याबदल श्री भोसलेसाहेब याचे त्यानी अभिनंदन केले. श्री भोसलेसाहेब यांनी 1981 मध्ये पंढरपुर विभागात डाकसहायक म्हणून आपल्या सेवेस प्रारंभ केला, 1988 मध्ये उपविभागीय डाक निरीक्षक ही खाते अंतर्गत परीक्षा पास होऊन त्यानी आपल्या प्रशासकीय सेवेस कोल्हापूर येथुन सुरवात केली, पुढे गडहिंग्लज, सावंतवाडी, मिरज, सांगली,पणजी,सिंधुदुर्ग ,नागपूर येथे सेवा करून फेब्रुवारी 2018 पासून आज अखेर त्यानी अहमदनगर येथे प्रवर अधीक्षक डाकघर अहमदनगर येथे काम करत सेवानिवृत्त झाले.
तब्बल 35 वर्ष प्रशासकीय सेवेत कामकाज करत असताना एक कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्याची राज्यभर ओळख होती. सेवापूर्ती सोहळयात संघटनेच्या व विभागीय कार्यालय व प्रधान डाकघरच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री संदीप कोकाटे, श्री सतीष येवले, श्रीमती चिंतामणी, श्रीमती कुलांगे, श्रीमती पोळ, श्री संजय परभने, श्री बाळासाहेब बनकर, श्री संदीप हदगल, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद भोंगले, तर आभार प्रदर्शन प्रकाश कदम यांनी केले. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी व टपाल कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment