जगातील एकमेव समवशरण जैन मंदिराची निर्मिती चे काम सुरू देवनंदीजी महाराजांची माहिती


कोपरगाव प्रतिनिधी

प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य श्री देवनंदीजी


यांच्या संकल्पनेतून मालसाने

(चांदवड जिल्हा नाशिक)येथे तीस एकर क्षेत्रावर भव्यदिव्य जैन नॉलेज सिटी णमोकार तीर्थ साकारत असून जैन धर्माची सर्वव्यापी शिक्षा, णमोकर महामंत्र आराधना, दीक्षा,जैन ग्रंथालय व व्यसनमुक्ती केंद्र, शाळा, महाविद्यालय आदी उपक्रम येथे

राबविण्यात येणार असून  पुढील दोन वर्षात हे काम पूर्णत्वास जाणार आहे.न भूतो न भविष्ययती असे जगातील एकमेव एकशे आठ फुटी   आठ मजल्यांच समवशरण मंदिराची निर्मिती देखील केली जात असल्याची माहिती प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य श्री देवनंदीजी व साध्वी वैशाली पहाडे यांनी कोपरगाव येथे निवडक पत्रकारांशी बोलताना दिली. आतापर्यंत येथे आठ भव्य मुर्त्यांचे निर्माण झाले असून ही नववी मूर्ती आहे जगातील एकमेव मंदिर असल्याचा दावा त्यांनी करत जैन धर्मियांचे परम आराध्य तीर्थंकर चंद्रप्रभू

स्वामी यांचे भव्य विशाल जिनालय समवशरण च्या रूपात निर्माण केले जात आहे या जिनालय मंदिरात 24 तीर्थ कारांची रत्न प्रतिमा येथे स्थापित केल्या जाणार आहेत त्यात प्रामुख्याने गणधर देव शासन देवी जिनवाणी मा सरस्वती देवी यांच्या प्रतिमा शास्त्रीय पद्धतीने स्थापन  करण्यात येणार आहेत नमो तीर्थकार मध्ये या मंदिराची अद्भुत व

अतुलनीय निर्मिती रचना केली जात असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला मनःशांती मिळावी म्हणून मूर्तींकडे पाहिल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या म्युझिक वॉकीटॉकी द्वारे आपण जणू मूर्तीशी बोलत आहोत असा भास होणार आहे. सुमारे पाच एकरामध्ये हे समवशरण मंदिर गेल्या दोन वर्षापासून उभारण्यात येत आहे मंदिराच्या परिसरात बाग बगीच्या तसेच मंदिर प्रदक्षणा ही बोटीतून करता येऊ शकणार आहे पंचपरमेश्‍वर त्याचे प्रतीक म्हणून पाच विशाल 63 फूटी मूर्ती येथे तयार करण्याचे काम सुरू आहे अशा या अत्याधुनिक वास्तूत शिल्पशैली चे नमुने विश्व कल्याणकारी ज्ञान कुंभ नमोकार टावर विषाल त्यागी निवास आहार भवन भोजन शाळा या परिसरात आधुनिक शिक्षा व चिकित्सा केंद्र गौशाला व पशु सेवा केंद्र मानव चल चिकित्सालय रथ पशु पक्षी चिकित्सालय रथ भाविकांसाठी अत्याधुनिक यात्री निवास जैन धर्माचे भगवान पार्श्वनाथ यांची सहस्र फंणी आधार आयुक्त भव्य मूर्ती मा पद्मावती ची एकोणीस फूट उत्तुंग प्रतिमा तसेच नयन  रम्य तीर्थंकर वाटिका

सर्व रोग चिकित्सा निवारक नक्षत्र उपवन आदी येथे कामे सुरू आहेत. त्यासाठी राजस्थानातील तसेच मध्य प्रदेश उत्तर प्रदेश परिसरातील कारागीर येथे सतत कार्यरत आहे आत्तापर्यंत 60 फुटी रोड पाच भव्य मूर्ती चे कार्य पूर्ण 70 खोल्या सहा सुट्स दहा हजार स्क्वेअर फुटाचा विशाल सभामंडप नमोकार तीर्थ महाद्वार कमान समावशरण चतुर्मुखी 4 विशाल प्रतिमा हे निर्माण पंधरा हजार स्क्वेअर फुटाचे  त्री मंजीला गुरू मंदिर तीन मजली त्यागी आहार भवन चोवीस हजार स्क्वेअर फुटाचा 70 रूम ची धर्मशाळा 2 लाख वीस हजार स्क्वेअर फुटाचा बहात्तर फूट उंची असलेला बोलणारा भव्य समचरण कार्याचा शुभारंभ एकतीस फूट उंचीची भगवान नेमिनाथ मूर्ती महावीर स्वामी यांची मूर्ती भगवान चंद्रप्रभू ची पद्मासन मूर्ती सहा हजार स्क्वेअर फुटाचे ध्यानमंदिर आदी कामे दोन वर्षात पूर्णत्वाकडे आहेत. राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने मालसाने तालुका चांदवड येथे साकारण्यात येणाऱ्या नमोकार तीर्थावर अरिहंत भगवान यांची भव्य मूर्ती उभारण्यात येत आहे त्यासाठी कर्नाटक राज्यातील देवनहळ्ळी बंगळूरु येथून ६० फूट उंच अकरा फूट रुंद आठ फूट जाड आणि एकूण ३५१ टन वजनाची अखंड पांढऱ्या ग्रॅनाईट ची शिळा 170 चाकांच्या ट्रक मधून नमोकार तीर्थ येथे आणण्यात आली २०१४ पासून या शिळेचेे काम सुरू करण्यात आले होते ह्याकामी प्रितम पळसदेवकर पुणे, दिनेश शेठी चेन्नई,   प्रदीप गँगवाल  ,एच सुंदरराजू,      कर्नाटक राज्य व केंद्र सरकार यांचे योगदान व सहकार्य लाभले अशी माहिती नमोकार ट्रस्ट अध्यक्ष नीलम अजमेरा यांनी दिली.   नमोकार तीर्थ प्रणेता ,राष्ट्रीय संत  आचार्य देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने  मालसाने तालुका चांदवड येथे नमोकार पन्नास एकर जागे मध्ये तीर्थ साकारण्यात येत आहे  येथे अरिहंत ,सिद्ध ,आचार्य, उपाध्याय ,साधू यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना सन 2022साली राष्ट्रसंत श्री देवनंद जी महाराज पालकमंत्री छगन भुजबळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे   अरिहंत भगवान यांची श्रवणबेळगोळ येथील विश्व प्रसिद्ध भगवान यांच्या मूर्ती समान ४६फूट भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे     या अखंड पाषाणातून मूर्ती साकारेल  असे  पूर्वाश्रमीच्या कोपरगावच्या वैशालिदीदी पहाडे यांनी सांगितले.

सेन्सर द्वारे मूर्ती प्रत्येक भाविकांशी बोलणार समावशरण मंदिरात  उभारल्या जाणाऱ्या मूर्त्यांना सेन्सर बसवले जाणार असून त्याद्वारे मूर्तीच्या पुढे बसल्यानंतर देण्यात येणाऱ्या म्युझिक walkie-talkie द्वारे भगवान महावीर महावीरांच्या मुर्त्या प्रत्यक्ष भाविकांशी बोलण्याचा भास होणार आहे मंदिरावर तसेच मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई ही केली जाणार आहे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिक व चांदवड च्या मध्यावर हे मंदिर भाविकांचे आशास्थान व पर्यटन स्थळ हे होणार आहे. अशी माहिती ती वैशाली दिदी पहाडे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा