साईबाबा कॉर्नरवर २६ जूनला ओबिसी आरक्षण साठी चक्का जाम आंदोलन
कोपरगांव :- महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यालयाने 26 जुन रोजी राज्यात ओबीसी आरक्षण कायम राहिलेच पाहिजे या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन आंयोजित केले असुन त्यानुसार कोपरगांव येथील साईबाबा
काॅर्नर येथे 26 जुन रोजी सकाळी 10 वाजता ओबीसी आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यांत आले असुन सर्व भाजपा पदाधिकारी व सर्व सेलच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी व ओबीसी समाजप्रमुख कार्यकर्त्यानी हजर रहावे असे आवाहन प्रदेश सचिव स्नेहलता केाल्हे यांनी केले आहे. सर्व कार्यकर्त्यानी हे चक्काजाम आंदोलन यशस्वी करून सरकारला जाग आणण्यांसाठी प्रयत्न करावे असेही सौ. कोल्हे म्हणांल्या.
Comments
Post a Comment