फळे देणाऱ्या झाडाप्रमाणे जीवन व्यतीत करून समाज कार्यासाठी शक्ती सत्कारणी लावावी.... सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे मुख्य लेखापाल एस.एन.पवार
आयुष्य प्रवाहात संस्थेचे योगदान मोलाचे असते, सेवानिवृत्तीनंतरही प्रत्येकाने फळे देणाऱ्या झाडाप्रमाणे जीवन व्यतीत करून समाज कार्यासाठी शक्ती सत्कारणी लावावी असे प्रतिपादन सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे मुख्य लेखापाल एस.एन. पवार यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या लेखा शाखेतील कर्मचारी अशोक चव्हाण बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, कामगार युनियनचे उपाध्यक्ष गणपत दवंगे, सहाय्यक लेखापाल देवराम देवकर, हौशीराम गोरडे यांच्यासह लेखा व रासायनिक विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी लक्ष्मण वर्पे प्रास्ताविकात म्हणाले की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे तसेच जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे कोरोना महामारीत संजीवनी उद्योग समुहाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान देत संस्थेबरोबर कामगारांच्या संसार प्रपंचाची अविरत काळजी घेत आहेत. उपमुख्य लेखापाल प्रवीण टेमगर यांनी अशोक चव्हाण यांच्या कार्याची माहिती दिली. वाल्मीक कळसकर, मच्छिंद्र भुसे, चांगदेव कदम यांनी चव्हाण यांच्या सेवाकाळातील घटनांना उजाळा दिला.
मुख्य लेखापाल श्री एस.एन. पवार पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी गीतेचं संपूर्ण सार ज्ञानेश्वरीतून संपूर्ण विश्वाला उलगडून दाखवले ते सार आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या समाजकार्याची शिकवण या दोन्ही गोष्टी सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यात अनमोल आहेत, कारण देव परिस्थिती नव्हे तर माणसाची मनस्थिती बदलण्यासाठी सतत प्रेरणा देत असतो. शेवटी लक्ष्मण वर्पे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment