लायन्स क्लब ऑफ अध्यक्ष पदी रामदास थोरे उपाध्यक्षपदी परेश उदावंत सचिवपदी अक्षय गिरमे खजिनदार पदी सुमित भट्टड यांची निवड


कोपरगाव प्रतिनिधी

येथील लायन्स क्लब ऑफ

अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम तसेच कोविड काळात समाजोपयोगी कामे करत समाजाशी आजही घनिष्ट संबंध प्रस्थापित केले आहे. या वर्षी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ५१ व्या


वर्षात पदार्पण करीत असून २०२१-२२ या वर्षाकरिता लायन्स क्लब ऑफ चे अध्यक्ष पदी  रामदास थोरे, उपाध्यक्ष पदी  परेश उदावंत, सचिव  पदी .अक्षय गिरमे, खजिनदार पदी  सुमित भट्टड आदिंची  निवड झाल्याची माहिती ज्येष्ठ संचालक तुलसीदास खुबाणी यांनी दिली.

लायन्स क्लब च्या माध्यमातून मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विशेष करून गरजवंतांना अन्नधान्य वाटप, डायलिसीस सेंटर अशा महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश होता. तसेच जयपूर फुट कॅम्प, प्लास्टिक सर्जरी शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, बिझनेस एक्स्पो अशा प्रकारचे  समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.

अध्यक्षपदी निवड झालेले रामदास थोरे यांनी २०१७ साली सेक्रेटरी म्हणुन पद भूषवित असताना लायन्स क्लबचा ‘बेस्ट सेक्रेटरी’ या पुरस्काराने सन्मान झालेला आहे. तर २०१९-२० मध्ये   उपाध्यक्ष  पद भूषविले आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे या तिन्ही जिल्हे मिळून निघणाऱ्या  ‘सह्याद्री लायन’ मासिकाचे ‘सहसंपादक’ म्हणून काम पाहत आहे. या निवडीबद्दल लायन्स क्लबच्या  पदाधिकाऱ्याचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"