काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र या इमारतीचे नागपूरमध्ये मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार लोकार्पण
कोपरगाव प्रतिनिधी
नंदनवन नागपूर येथे "काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र" या नावाने एका ईमारतीचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 27 रोजी दुपारी बारा वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली . त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते होत आहे अशी माहिती नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली.. काकासाहेब कोयटे लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे मुख्य समन्वयक असून - सहकार व पतसंस्था चळवळीच्या क्षेत्रात आदराने उल्लेख केल्या जाणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे काकासाहेब कोयटे . कोपरगाव तालुक्यातून आपल्या जिवनाची सुरूवात करणारे काका कोयटे यांचे संपूर्ण आयुष्य सहकारातून अनेकांना रोजगार, व्यवसायाकरिता प्रेरित करण्यात जात आहे. काकासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सहकारी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल 1000 कोटीची आहे. सहकार क्षेत्रात लाखो व्यक्तींना प्रशिक्षित करून रोजगाराची दिशा दाखवली. काकासाहेब आज महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. राजकारणात त्यांचा आदरयुक्त, सन्मानाने स्वागत होते.
काका कोयटे यांचे मुळे कोपरगाव चे नाव निश्चितच उंचावले गेले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment