कोरोना काळात कोपरगावच्या क्रेडाई संघटने च्या रक्तदान शिबिरात 141 जणांचे रक्तदान


कोपरगाव प्रतिनिधी

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव क्रेडाई संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात 141 जणांनी रक्तदान केले .  रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे नागरीकांना जीवदान देण्याचे महान कार्य क्रेडाई संघटना करीत आहे. असे प्रतिपादन  जिल्हा सञ न्यायाधीश सयाजी को-हाळे यांनी  केले.

कोपरगाव व शिर्डी येथील बांधकाम व्यवसायीकांची संघटना असलेल्या क्रेडाई या संघटनेच्या वतीने  येथील लायन्स पार्क येथे  रक्तदान महायज्ञ शिबीराचे आयोजन  केले होते कोपरगाव संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक , दिनार कुदळे,  राजेश ठोळे,उपाध्यक्ष विलास खोंड सचिव चंद्रकांत कौले खजिनदार हिरेन पापडेजा आदी सदस्य यावेळी उपस्थित होते . या शिबीराचे उद्घाटन जिल्हा व सञ  न्यायालयाचे न्यायाधीश सयाजी को-हाळे, न्यायाधीश  पराग बोधनकर,प्रथम वर्ग न्यायाधीश अभिजीत डोईफोडे, न्यायाधीश विकास मिसाळ, न्यायाधीश रफिक शेख, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.जयंत जोशी, ॲड शंतनु धोर्डे, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण पोलिस ठण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तहसीलदार योगेश चंद्रे, सचिन बोरावके, मनिष फुलफगर,संदीप राहतेकर,अमोल अजमेरे, राजेंद्र शिरोडे,प्रदिप मुंदडा,सिध्देश कपिले,प्रदिप साखरे,अक्षय जोशी,याकुब शेख,किसनराव आसने,राहुल भारती,आनंद आजमेरे,यश लोहाडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी  न्यायाधीश सयाजी को-हाळे पुढे म्हणाले की कोरोना चे संकट मोठे आहे सर्वसामान्यांना उपचारासाठी आर्थिक नियोजन नसल्याने  रुग्णांवर दुहेरी संकट उभे ठाकले आहे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू ठेवून क्रेडाई संघटना व त्यांच्या सदस्यांनी पुढाकार घेतला त्यांचे हे मोलाचे योगदान आहे.
 त्यांचा इतर संघटनांनी आदर्श घेऊन रक्तदान शिबिरे घ्यावीत असे आवाहन न्यायाधीश को-हाळे यांनी केले.
यावेळी न्यायाधीश पराग बोधनकर म्हणाले की, क्रेडाइच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गरजू नागरीकांना  फायदा होऊन त्यांचे जीव वाचणार आहेत .  या शिबीराबद्दल  माहीती देताना क्रेडाइचे अध्यक्ष  प्रसाद नाईक म्हणाले की, समाजाला योग्य न्याय देणाऱ्या न्यायमंदीरातील न्यायाधीशांनी या रक्तदान शिबीरात  रक्तदान केल्याने सर्वांपुढे त्यांनी आदर्श ठेवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वञ रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने गरजू रुग्णांचे रक्तासाठी हाल होत आहे. आपल्या एका रक्ताच्या थेंबाने एखाद्या व्यक्तीचे जगण्याचे जीवन ठरत असेल तर आपण या पवित्र कार्याची  सुरुवात त्वरीत करावी या शुध्द हेतूने  क्रेडाइ संघटनेच्या वतीने महायज्ञ रक्तदान शिबीराचे आयोजन केले. कमी कालावधीत उत्तम प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला..कोपरगाव -शिर्डी क्रेडाइच्या वतीने आत्तापर्यंत अनेक सामाजीक उपक्रम राबवून माणुसकी जपली आहे. यापुढेही समाजोपयोगी कार्य करीत वृक्षारोपण, शहर सुशोभीकरण आदी उपक्रम राबवणार असल्याची संकल्पना व्यक्त करीत सर्व रक्तदान करणाऱ्या दानशुरांचे अभिनंदन केले. 
  शिबीर यशस्वी करण्यासाठी बांधकाम व्यवसायाशी निगडीत सर्व अभियंते , बांधकाम व्यवसायीक, कर्मचारी, बांधकाम कामगार  आदींनी परिश्रम घेतले.
या रक्तदान शिबीरात न्यायाधीश विकास मिसाळ व अभिजीत डोईफोडे यांनी  व इतर न्यायालयीन १४ कर्मचारी यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श घालुन दिला.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा