Posts

Showing posts from June, 2021

सेवापूर्ती हा आयुष्यातील अनमोल योग -संतोष यादव..... श्री जे टी भोसलेसाहेब सेवापूर्ती सोहळा

Image
नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर च्या वतीने श्री भोसलेसाहेब प्रवर अधिक्षक डाकघर यांचा सत्कार करताना संघटनेचे जेष्ठ नेते संतोष यादव,समवेत संदीप कोकाटे,श्री संदीप हदगल,श्री दिपक नागपुरे, श्रीमती भुजबळ,श्रीमती चिंतामणी इ. अहमदनगर: मा श्री जे टी भोसले  प्रवर अधिक्षक  डाकघर अहमदनगर हे त्याचे प्रदीर्घ सेवेतून दि 30 जून 2021 रोजी सेवानिवृत्त झाले.  श्री जे टी भोसलेसाहेब यांचा सेवापूर्ती सोहळा विभागीय डाक  कार्यालय अहमदनगर येथे आयोजित केला होता.  याप्रसंगी श्री संतोष यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सेवानिवृती हा जरी पाच अक्षराचा शब्द असलातरी सुखद सेवानिवृत्त होणेकरिता प्रत्येकाला सेवाकाळात अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागते. आजच्या परिस्थितीत सुखद सेवानिवृत्ती हा अमूल्य योग आहे व असा  अनमोल योग श्री भोसलेसाहेब यांना आला त्याबदल श्री भोसलेसाहेब याचे त्यानी अभिनंदन केले.  श्री भोसलेसाहेब यांनी 1981 मध्ये पंढरपुर विभागात डाकसहायक म्हणून आपल्या  सेवेस प्रारंभ  केला, 1988 मध्ये उपविभागीय डाक निरीक्षक ही खाते अंतर्गत परीक्षा पास होऊन त्यानी आपल्या प्रशासकीय सेवेस कोल्हापूर

फळे देणाऱ्या झाडाप्रमाणे जीवन व्यतीत करून समाज कार्यासाठी शक्ती सत्कारणी लावावी.... सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे मुख्य लेखापाल एस.एन.पवार

Image
  आयुष्य प्रवाहात संस्थेचे योगदान मोलाचे असते, सेवानिवृत्तीनंतरही प्रत्येकाने फळे देणाऱ्या झाडाप्रमाणे जीवन व्यतीत करून समाज कार्यासाठी शक्ती सत्कारणी लावावी असे प्रतिपादन सहकारमहर्षी कोल्हे  कारखान्याचे मुख्य लेखापाल एस.एन. पवार यांनी केले.            सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या लेखा शाखेतील कर्मचारी अशोक चव्हाण बुधवारी सेवानिवृत्त झाले.   त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, कामगार युनियनचे उपाध्यक्ष गणपत दवंगे,  सहाय्यक लेखापाल देवराम देवकर, हौशीराम गोरडे यांच्यासह लेखा व रासायनिक विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.           प्रारंभी लक्ष्मण  वर्पे  प्रास्ताविकात म्हणाले की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे तसेच जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे  कोरोना महामारीत संजीवनी उद्योग समुहाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान देत संस्थेबरोबर कामगारांच्या संसार प्रपंचाची अविरत काळजी घेत आहेत.   उपमुख्य लेखापाल प्रवीण टेमगर यांनी अशोक चव्हाण या

संजीवनी पाॅलिटेक्निक मध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरू.... महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र

Image
कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निक मधिल  अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशा  क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित  व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग, इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षणालय, मुंबई (डी.टी.ई.) च्या वतीने संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकमध्ये २०२१-२२ च्या प्रथम  वर्ष  पाॅलिटेक्निक  प्रवेशासाठी दि. ३० जुन पासुन प्रथम वर्ष ऑनलाईन  प्रवेश  सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू झाले असुन विद्यार्थांनी  दि.२३ जुलै पर्यंत ऑनलाईन  रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, अशी  माहिती प्राचार्य ए.आर. मिरीकर  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.    पत्रकात प्रा मिरीकर यांनी सांगीतले आहे की भारतीय नागरीकत्व असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र  राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात येणाऱ्या  अंतर्गत गुण मुल्यमापनाच्या आधारे प्रवेश  मिळणार आहे. सध्या इ. १०  वीचे निकाल अद्याप जाहीर झाले नाही. याबाबत ऑनलाईन  नोदणी करते वेळेस फक्त इ. १०  वी बोर्डाकडून प्राप्त झालेला आसन क्रमांक द्यायचा . शासनाने इ. ११ वी प्रवेशासाठी सीईटी (सामुहीक प्रवेश

जगातील एकमेव समवशरण जैन मंदिराची निर्मिती चे काम सुरू देवनंदीजी महाराजांची माहिती

Image
कोपरगाव प्रतिनिधी प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य श्री देवनंदीजी यांच्या संकल्पनेतून मालसाने (चांदवड जिल्हा नाशिक)येथे तीस एकर क्षेत्रावर भव्यदिव्य जैन नॉलेज सिटी णमोकार तीर्थ साकारत असून जैन धर्माची सर्वव्यापी शिक्षा, णमोकर महामंत्र आराधना, दीक्षा,जैन ग्रंथालय व व्यसनमुक्ती केंद्र, शाळा, महाविद्यालय आदी उपक्रम येथे राबविण्यात येणार असून  पुढील दोन वर्षात हे काम पूर्णत्वास जाणार आहे.न भूतो न भविष्ययती असे जगातील एकमेव एकशे आठ फुटी   आठ मजल्यांच समवशरण मंदिराची निर्मिती देखील केली जात असल्याची माहिती प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य श्री देवनंदीजी व साध्वी वैशाली पहाडे यांनी कोपरगाव येथे निवडक पत्रकारांशी बोलताना दिली. आतापर्यंत येथे आठ भव्य मुर्त्यांचे निर्माण झाले असून ही नववी मूर्ती आहे जगातील एकमेव मंदिर असल्याचा दावा त्यांनी करत जैन धर्मियांचे परम आराध्य तीर्थंकर चंद्रप्रभू स्वामी यांचे भव्य विशाल जिनालय समवशरण च्या रूपात निर्माण केले जात आहे या जिनालय मंदिरात 24 तीर्थ कारांची रत्न प्रतिमा येथे स्थापित केल्या जाणार आहेत त्यात प्रामुख्याने गणधर देव शासन देवी जिनवाणी मा सरस्वती देवी यांच्या

डाउच बुद्रुकच्या सरपंचपदी कोल्हे गटाच्या शोभा माळी यांची निवड

Image
डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाच्या श्रीमती शोभा मच्छिंद्र माळी यांची नुकतीच निवड झाली त्याबददल त्यांचा जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यांत आला. कोपरगाव प्रतिनिधी तालुक्यातील डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाच्या श्रीमती शोभा मच्छिंद्र माळी यांची नुकतीच निवड झाली त्याबददल त्यांचा जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रिपाईचे दिपक गायकवाड, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, कैलास धट आदि उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. जेडगुले होते.                श्रीमती शोभा माळी यांच्या नावाची सुचना दत्तात्रय किसन दहे यांनी केली तर त्यास बाबा दहे यांनी अनुमोदन दिले.या निवडी प्रसंगी सर्वश्री अमोल भगवान होन, धर्मा भागवत दहे, धर्मा गणपत दहे, भाउसाहेब विश्वनाथ दहे, एकनाथ भिकाजी बढे, बबन मोहन माळी, मच्छिंद्र धर्मा दहे, मच्छिंद्र गोपिनाथ माळी, एकनाथ माळी, अंकुष भिमराज गायकवाड, सतिश माळी, भास्कर मा

कोपरगांव तालुक्यात रविवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस

Image
  तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी परिसरातील चासनळी, धामोरी, हांडेवाडी, कारवाडी, मोर्विस या पाच गावात रविवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाच्यi प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.           त्यांनी पुढे म्हटले आहे की, चालू हंगामातील हा पहिलाच पाऊस आहे.   मात्र तो ढग फुटी सदृश्य पडून शेतीचे बांध, जनावरांसाठी चारा पिके, ऊस पिके, चाळीत साठवलेला कांदा, फळबागा, शेड, तात्पुरते झाप यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  आधीच कोरोणा महामारीमुळे अनेक जण अडचणीत आलेले आहेत.   त्यात ढगफुटीचे संकट या पाच गावातील रहिवासी व शेतकऱ्यांवर ओढवलेले आहे.  त्यामुळे त्यांचे नुकसानीचे पंचनामे शासनाने तात्काळ करावेत, तहसीलदारांनी त्याची पाहणी करून योग्य स्वरूपाचा अहवाल तयार करावा व त्यांना मदत द्यावी.   त्याचप्रमाणे मागिल हंगामाचा  पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो देखील तात्काळ द्यावा अशी मागण

मायक्रोबायोलॉजी विषयाच्या तीन संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन

Image
मायक्रोबायोलॉजी विषयाचे  एकाच वेळी तीन ग्रंथ प्रकाशित झाल्याबद्दल प्रा. पवार व डॉ. चौधरी यांचा सत्कार करताना  प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, लेखकद्वय,विज्ञान शाखाप्रमुख डॉ. बी.बी. भोसले, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. काळे आदी कोपरगाव प्रतिनिधी स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. आकाश पवार व त्यांचे सहकारी डॉ. योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात मायक्रोबायोलॉजी विभागातील प्रा. पूजा गख्खड, प्रा. प्रगती शेटे, प्रा.  वृषाली आहेर व  प्रा. प्रियंका शिरसाठ अशा सहा प्राध्यापकांनी मिळून मायक्रोबायोलॉजी विषयाचे तीन संदर्भ ग्रंथांचे लेखन केले असून त्यांचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.  बी. एस. यादव यांनी येथे दिली. प्रा. आकाश पवार व त्यांच्या पाचही सहकार्यांचे कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे व सचिव ऍड. संजीव कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.                     डॉ. यादव पुढे म्हणाले की, या ग्रंथांमध्ये एफ. वाय. बी. एस्सी. च्या अभ्यासक्रमावर आधारित 'बेसिक टेक्निक्स इन मायक्रोबायोलॉजी', एस.वाय. बी. एस्सी

कर्तव्यदक्ष तत्कालीन महिला अधिकारी व लोकप्रतिनिधींबद्दल तिरस्काराची भाषा वापरणाऱ्या विक्षिप्त नगराध्यक्षांचा जाहिर निषेध - वैशाली आढाव.

Image
कोपरगाव शहराच्या इतिहासात प्रथमच दिड कोटी रुपयाचे बक्षीस मिळवून देणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला तत्कालीन  मुख्याधिकारी व कोपरगाव मतदार संघाला कोट्यावधी रूपयांचा निधी मिळवून देत विकास करणाऱ्या माजी महिला लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल कोपरगाव नगरपालेकेचे  नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका  कार्यक्रमात  महिलाबद्दल तिरस्काराची भाषा वापरुन खिल्ली उडवल्याबद्दल विजय वहाडणे यांचा समस्त महिलांच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव भाजपच्या शहर अध्यक्षा  वैशाली विजयराव आढाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.             त्यांनी आपल्या पञकात पुढे म्हणाल्या कि, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात  मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या बदलीमुळे माझे वैयक्तीक मोठे नुकसान झाले असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांनी जाता जाता किमान एखादा. चांगला पुरुष अधिकारी कोपरगाव नगरपालिकेत पाठवावा, पण महिला अधिकारी आता नको. कारण यापुर्वीच्या महीला मुख्याधिकारी व माजी महीला लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल मला खुप वाईट अनुभव आला आहे. तेव्हा काहीही झाले तरी आता महिला नको असेही म्हणत महिला

माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश. ग्रामीण रूग्णालयाची उपजिल्हा रूग्णलयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता.

Image
कोपरगाव :-  शहरात  असलेले ग्रामीण रूग्णालय हे 30 खाटांचे असुन त्यासाठीची अदययावत इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधकाम पूर्ण असून या रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रूग्णालय करण्यात यावे, या माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाली आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री डाॅ दिपक सावंत यांचेकडे पत्रव्यवहार करून कोपरगाव शहरातील ग्रामीण रूग्णालयची श्रेणी वाढ करून त्याचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यात यावे म्हणून माजी आमदार   कोल्हे यांनी पत्रव्यवहार केला. शहरातील महाराप्ट्र शासनाच्या 6 एकर जमीनीवर 30 खाटांचे शासकीय ग्रामीण रूग्णालय सुरू असुन यासाठी अदयावत इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधून पुर्ण झालेले आहे. परंतु दिवसेदिवस लोकसंख्या वाढीमुळे सदर रूग्णालय कमी पडत असुन रूग्णाची संख्या मोठी असल्याने वैदयकिय सुविधा कमी पडतात, यासाठी या रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात यावे अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली होती. सन 2015 पासुन या कामाचा पाठपुरावा सुरू होता, या पाठपुराव्यादरम्यान सन 2018 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये

कोरोना काळात कोपरगावच्या क्रेडाई संघटने च्या रक्तदान शिबिरात 141 जणांचे रक्तदान

Image
कोपरगाव प्रतिनिधी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव क्रेडाई संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात 141 जणांनी रक्तदान केले .  रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे नागरीकांना जीवदान देण्याचे महान कार्य क्रेडाई संघटना करीत आहे. असे प्रतिपादन  जिल्हा सञ न्यायाधीश सयाजी को-हाळे यांनी  केले. कोपरगाव व शिर्डी येथील बांधकाम व्यवसायीकांची संघटना असलेल्या क्रेडाई या संघटनेच्या वतीने  येथील लायन्स पार्क येथे  रक्तदान महायज्ञ शिबीराचे आयोजन  केले होते कोपरगाव संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक , दिनार कुदळे,  राजेश ठोळे,उपाध्यक्ष विलास खोंड सचिव चंद्रकांत कौले खजिनदार हिरेन पापडेजा आदी सदस्य यावेळी उपस्थित होते . या शिबीराचे उद्घाटन जिल्हा व सञ  न्यायालयाचे न्यायाधीश सयाजी को-हाळे, न्यायाधीश  पराग बोधनकर,प्रथम वर्ग न्यायाधीश अभिजीत डोईफोडे, न्यायाधीश विकास मिसाळ, न्यायाधीश रफिक शेख, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.जयंत जोशी, ॲड शंतनु धोर्डे, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण पोलिस ठण्या

श्रीमान गोकुळचंद विद्यालयात राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Image
कोपरगांव प्रतिनिधी शहरांतील श्रीमान गोकुळचंद विदयालयांत  थोर समाजसुधारक राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.   छत्रपती  शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक .मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते केले.              या वेळी विदयालयाचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी शाहु महाराजांना अभिवादन केले.   शिक्षक  इ एल जाधव यांनी प्रास्तविक  कलाशिक्षक.ए.बी.अमृतकर यांनी  सुत्रसंचलन केले.जेष्ठ शिक्षक .ए.जे कोताडे यांनी आभार मानले.  या  वेळी  आर.ई पाटील आर बी गायकवाड ,डी.व्ही.तुपसैंदर,एन.के.बडजाते , आर जे.चौधरी एस एन,शिरसाळे ,आदी शिक्षक,शिक्षिका  सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित  होते.

कोपरगांव परिसरात मुसळधार पाऊस चासनळी, पुणतांबा भागात पाणीच पाणी.... पहा प्रत्यक्ष विडियो....

Image

हवामानातील बदल - एक आव्हान...परिणाम व उपाय योजना

Image
कोपरगाव प्रतिनिधी हवामानातील होत असलेला बदल, मोसमी पावसाची एकूण वितरण पध्दती व पारंपरिक गुणधर्मावर गंभीर परिणाम करणारा असल्याचे, अलिकडील काळात निदर्शनास येऊ लागलेले आहे. मोसमी पावसाची पडण्याची पध्दत, एकूण पाऊसमान, एकूण पाऊसकाळ या मुख्य घटकांमध्ये अलीकडील तिन चार वर्षांत जाणवण्याइतपत बदल झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक ह्या बदलास, सुक्ष्म स्वरुपात चालू दशकाच्या अगोदर पासून सुरवात झालेली आहे. मात्र बदल सुक्ष्म असल्याने फारसे जाणवले नाहीत. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून यातील बदल प्रकर्षाने जाणवण्यास सुरवात झाली आहे. जागतिक स्तरावरील पर्यावरण, वाढते तापमान, हरीतगृह परिणाम याचा एकत्रित परिणामस्वरुप सध्याचा बदल होऊ घातला आहे. भविष्काळातही थोड्याफार फरकाने हा बदल अशाच स्वरुपात वाढता राहाणार आहे. हा होऊ घातलेला वा होत असलेला बदल, गेल्या साठ सत्तर वर्षात मोसमी पावसाच्या संदर्भाने प्रस्थापित झालेल्या विविध घटकांवर विपरीत परिणाम करणारा ठरणार आहे.              यासंदर्भात 'इंटरगव्हर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज'  ( IPCC ) , या यूनो संलग्न असलेल्या आणि 85 देशातील 830 तज्ञांनी सन 2013 व 2

काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र या इमारतीचे नागपूरमध्ये मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार लोकार्पण

Image
कोपरगाव प्रतिनिधी नंदनवन नागपूर येथे "काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र" या नावाने एका ईमारतीचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 27 रोजी दुपारी बारा वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली . त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते होत आहे अशी माहिती नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली.. काकासाहेब कोयटे लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे मुख्य समन्वयक असून - सहकार व पतसंस्था चळवळीच्या क्षेत्रात  आदराने उल्लेख केल्या जाणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे काकासाहेब कोयटे . कोपरगाव  तालुक्यातून आपल्या जिवनाची सुरूवात करणारे काका कोयटे यांचे संपूर्ण आयुष्य सहकारातून अनेकांना रोजगार, व्यवसायाकरिता प्रेरित करण्यात जात आहे. काकासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सहकारी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल 1000 कोटीची आहे. सहकार क्षेत्रात लाखो व्यक्तींना प्रशिक्षित करून रोजगाराची दिशा दाखवली. काकासाहेब आज महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. राजकारणात त्यांचा आदरयुक्त, सन्मानाने स्वागत होते.  काका  कोयटे यांचे मुळे कोपरगाव चे नाव निश्चितच उं

लायन्स क्लब ऑफ अध्यक्ष पदी रामदास थोरे उपाध्यक्षपदी परेश उदावंत सचिवपदी अक्षय गिरमे खजिनदार पदी सुमित भट्टड यांची निवड

Image
कोपरगाव प्रतिनिधी येथील लायन्स क्लब ऑफ अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम तसेच कोविड काळात समाजोपयोगी कामे करत समाजाशी आजही घनिष्ट संबंध प्रस्थापित केले आहे. या वर्षी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ५१ व्या वर्षात पदार्पण करीत असून २०२१-२२ या वर्षाकरिता लायन्स क्लब ऑफ चे अध्यक्ष पदी  रामदास थोरे, उपाध्यक्ष पदी  परेश उदावंत, सचिव  पदी .अक्षय गिरमे, खजिनदार पदी  सुमित भट्टड आदिंची  निवड झाल्याची माहिती ज्येष्ठ संचालक तुलसीदास खुबाणी यांनी दिली. लायन्स क्लब च्या माध्यमातून मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विशेष करून गरजवंतांना अन्नधान्य वाटप, डायलिसीस सेंटर अशा महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश होता. तसेच जयपूर फुट कॅम्प, प्लास्टिक सर्जरी शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, बिझनेस एक्स्पो अशा प्रकारचे  समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. अध्यक्षपदी निवड झालेले रामदास थोरे यांनी २०१७ साली सेक्रेटरी म्हणुन पद भूषवित असताना लायन्स क्लबचा ‘बेस्ट सेक्रेटरी’ या पुरस्काराने सन्मान झालेला आहे. तर २०१९-२०

साईबाबा कॉर्नरवर २६ जूनला ओबिसी आरक्षण साठी चक्का जाम आंदोलन

Image
कोपरगांव :-   महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यालयाने 26 जुन रोजी राज्यात ओबीसी आरक्षण कायम राहिलेच पाहिजे या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन आंयोजित केले असुन त्यानुसार कोपरगांव येथील साईबाबा काॅर्नर येथे 26 जुन रोजी सकाळी 10 वाजता ओबीसी आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यांत आले असुन सर्व भाजपा पदाधिकारी व सर्व सेलच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी व ओबीसी समाजप्रमुख कार्यकर्त्यानी हजर रहावे असे आवाहन प्रदेश सचिव स्नेहलता केाल्हे यांनी केले आहे.  सर्व  कार्यकर्त्यानी हे चक्काजाम आंदोलन यशस्वी करून सरकारला जाग आणण्यांसाठी प्रयत्न करावे असेही सौ. कोल्हे म्हणांल्या.

भातुकलीचे खेळ कालबाह्य

Image
कोपरगाव प्रतिनिधी भातुकली .....या शब्दामध्ये अख्खे बालपण सामावले आहे लहानपणी प्रत्येकानेच घराच्या अंगणात एकदा तरी भातुकलीचा खेळ मांडला असेलच, पण काळाच्या ओघात अंगणाची जागा फ्लॅटने घेतली आणि भातुकलीची भांडी गाठोड्यातून माळ्यावर विसावलीत, विटि-दांडू, लगोरी हे खेळ आता कुठे बघायला मिळत नाहीत. नातवंडांबरोबर आलेल्या आजोबांना, मुलांबरोबर आलेल्या बाबांना हे जुने खेळ पाहून लहानपणीच्या विश्वात पुन्हा एकदा फेरफटका मारायला मिळतो. पण एका आजोबांनी गाठोड्यात गुंडाळलेला हा खेळा पुन्हा बाहेर काढून चिमुकल्यांसाठी परत मांडला आहे. गेल्या 21 वर्षांपासून गावोगाव फिरून त्यांनी हा आगळावेगळा खजिना गोळा केला आहे. 3 हजारांहून अधिक वस्तूंचा हा खजिना सगळ्यांना बालपणात घेऊन जाईल आणि बालकांसाठी गंमत ठरेल... टीव्ही, इंटरनेट, ई-मेल आणि मोबाइलच्या युगात रमणा-या आजच्या पिढीला पाटा वरंवटा, पाणी गरम करणारा बंब, विहिरीवरील रहाट, कोळशाची शेगडी, भोवरे, भिंग-या, चटक्याच्या बिया या वस्तूंची फारशी माहिती नाही. पूर्वी घराघरांत वापरल्या जाणा-या या वस्तूंच्या लहान प्रतिकृती भातुकलीच्या खेळात असायच्या. घराघरांत लहान मुलांचे भातुकली