कारखाना एक कुटुंब त्यासाठी एकनिष्ठता महत्त्वाची -पवार


माजी मंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी परिसराच्या प्रगतीत विविध पैलूद्वारे योगदान देत साखर कारखान्याची उभारणी केली,  कारखाना एक कुटुंब आहे त्यासाठी एकनिष्ठता महत्त्वाची असे प्रतिपादन मुख्य लेखापाल एस. एन. पवार यांनी केले.

            येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचेे लेखापाल बाजीराव उगले ३३  वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला.   त्याप्रसंगी ते बोलत होते.
              याप्रसंगी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे, रासायनिक कार्यालयीन अधिक्षक धनुभाउ होन, आदि खातेप्रमुख, उप खाते प्रुमुख उपस्थित होते.  प्रारंभी उप मुख्य लेखापाल प्रवीण  टेमगर यांनी प्रास्ताविक केले.  श्री लक्ष्मण वर्पे, श्री. कळसकर,.   श्री अनील आव्हाड, श्री. भूसे यांनी उगले यांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला.

             श्री एस. एन.  पवार पुढे म्हणाले की,  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यातील प्रत्येक कर्मचारी हा प्रगतीचा एक घटक आहे., कोपरगावच्या मातीला शंकरराव कोल्हे यांच्याशिवाय सुगंध नाही., हा सुगंध आसमंतात अजूनही दरवळतो आहे.   संस्था आपली आहे आणि तिच्या कामातून आपणा सर्वांचा उत्कर्ष आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवून त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी.   गीता ग्रंथ आपणा सर्वांना संस्काराची शिकवण देत असतो.   त्या शिकवणीतून सर्वांनी पुढे जायचं, सेवानिवृत्तीनंतरही प्रत्येकाने सामाजिक कार्यात स्वतःचे योगदान द्यावे असे ते म्हणाले.   शेवटी उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"