पोहेगाव कोविड सेंटर मुळे परिसरातील कोरोणा संसर्ग रोखण्यात यश... तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी कोविड सेंटर सज्ज... औताडे


कोपरगाव प्रतिनिधी

तालुक्यात महिन्यापूर्वी कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. पोहेगांव परिसरातही कोरोना रुग्णांचे प्रमाण प्रचंड होते.  शहरा पाठोपाठ ग्रामीण भागातही कोविड सेंटर उभारून पोहेगांव परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोहेगाव येथे सेंटर सुरू करण्यात आले. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत औषध उपचार , जेवणाची  व्यवस्था, मनोरंजनासाठी कोरोना रुग्णांच्या प्रत्येक हॉलमध्ये एलसीडी टीव्हीची व्यवस्था, मानसिक आधार या सर्व उपाययोजनाच्या जीवावर 
पोहेगाव कोविड सेंटरने परिसरातील कोरोणा संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेचा मुकाबला करण्यासाठी पोहेगाव कोविड सेंटर सज्ज असल्याचे कोविड सेंटरचे मार्गदर्शक शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी सांगितले.त्यांनी पोहेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन बडदे, डॉ राहुल गुडघे,
डॉ.सुनिल मेहेत्रे, डॉ. जगदीश झंवर, डॉ. नितीन गवळी, डॉ उषा गवळी, डॉ.आनंद काळे, डॉ.घनश्याम  गोडगे, डॉ.नरेंद्र होन, डॉ रावसाहेब जावळे, डॉ गोरक्षनाथ रोकडे यांची भेट घेऊन परिसरातील या डॉक्टरांनी कोविड सेंटर मधील रुग्णांना मोफत तपासणी व उपचारासाठी वेळ दिला त्यामुळेच  महिनाभरात 160 रुग्ण या कोविड सेंटर मधून बरे होऊन घरी गेले असल्याचे  औताडे यांनी सांगितले. तिस-या  लाटेचा धोका लक्षात घेता पोहेगांव कोरोना सेंटरमध्ये विविध सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.‌कोरोना रुग्णांसाठी मोफत चहा नाश्ता जेवण, भव्य डायनिंग हॉल, आंघोळीसाठी बॉयलर बसवून गरम पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र स्नानगृह, औषध उपचार आदी सुविधा या सेंटरमध्ये करण्यात आल्या आहेत.

पोहेगाव ग्रामपंचायत ,पोहेगांव नागरी पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामाने पोहेगांव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.लोकसहभागातून सुरू झालेल्या या कोविड सेंटरमध्ये परिसरातील कोरोणा रुग्णांना वेळीच व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार मिळाला. कोरोणा रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ यामुळे थांबली. लोकसहभागातून निर्माण झालेल्या या सेंटरला अनेक स्तरातून वास्तुरूप व आर्थिक मदत मिळाली. परिसरातील रुग्णांसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, राजेंद्र औताडे ग्रामविकास अधिकारी रामदास काळे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दररोज डॉक्टरांशी हितगूज करत लक्ष ठेवून आहेत. कोरोणाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पोहेगाव कोविड सेंटर सज्ज आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. माक्स सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचा वापर नियमित करावा असे आवाहनही नितीनराव औताडे यांनी केले..

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"