शेतकरी हिताचा विचार करून जिल्ह्यातील बाजार समित्या तातडीने सुरू करा -माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी
कोपरगाव प्रतिनिधी
शासन कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील बाजार समित्या वारंवार बंद करीत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा विकावा कसा या विवंचनेत शेतकरी सापडलेले असून आधीच गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन मुळे कांदा पिकाला योग्य भाव मिळालेला नाही तसेच सर्व शेतकरी बाधवांकडे उत्पादित केलेला कांदा साठविण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने आता पावसाळा येऊन ठेपलेला असताना कांद्याचे करायचे काय असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामधील कांद्याचे व भुसार मालाचे लिलाव तातडीने सुरु करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव ,माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला आहे .गेल्या वर्षी राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शेतकरी बांधवांनी उसासह कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती,मात्र कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे आणि शासनाच्या वारंवार बाजार समित्त्या चालू बंद करण्याच्या धोरणामुळे त्याच्या अडचणीत भरच पडलेली आहे.
Comments
Post a Comment