नगरसेवकांना अंधारात ठेवुन प्रसिद्धीसाठी हपापलेल्या आमदार व नगराध्यक्षांनी शहर विकास कामांच्या उद्घाटनाची केली घाई- उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे
कोपरगाव प्रतिनिधी
नगरपरिषदेची २७ मे २०२१ रोजी स्थायी समितीची बैठक झाली त्यात कोपरगाव शहरातील विविध प्रभागातील विकास कामांना भाजपा सेना नगरसेवक सभापतींनी कुठल्याही प्रकारचे राजकारण न आणता बहुमताने मंजुरी दिली मात्र आमच्या नगरसेवकांना अंधारात ठेवून घाईघाईने प्रसिद्धीसाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी आमदार व नगराध्यक्षांनी आम्ही बहुमताने मंजूर केलेल्या कामाची उद्घाटने केली अशी टिका उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की सध्या कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात असतांना आमदार,नगराध्यक्ष यांनी शासकीय नियम उधळून लावत केवळ प्रसिद्धीसाठी विकासकामांची उद्घाटने केली हे बरोबर नाही.वास्तविक पाहता सदरचा निधी आणण्यात आमदारांचा कुठल्याही प्रकारचा संबध नसतांना नगरपालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पक्ष व शिवसेना नगरसेवकांनी बहुमताने विकास कामे मंजूर केली.मात्र केवळ राजकारण व प्रसिद्धीसाठी आमदार व नगराध्यक्षांनी भाजपा सेना नगरसेवकांना अंधारात ठेवून विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे.आमदारांनी कोपरगाव शहरातील जनतेसाठी निधी मंजूर करून आणावा व खुशाल उद्घाटने करावी त्यात आमचा विरोध असणार नाही मात्र निधी नगरपालिकेचा,विकास कामांना मंजुरी भाजपा सेना नगरसेवकांची आणि फक्त प्रसिद्धीसाठी उद्घाटने करायची ती आमदार व नगराध्यक्षांनी हा खोटा धंदा आता बंद करावा.
शासन निर्णयानुसार डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी करणे क्रमप्राप्त आहे.असे असतांना देखील सध्या पावसाळा सुरू झाला असून कोपरगाव शहरातील मंजूर विकास कामे घाई घाईने करणे उचित होणार नाही,सदर कामाची गुणवत्ता राहणार नाही,परिणामी निकृष्ट कामांची जबाबदारी आमदार व नगराध्यक्ष घेणार का.? सहमती एक्स्प्रेस नेमकी कशासाठी सुरू आहे याचा बोध सुज्ञ नागरिकांनी घ्यावा.तीन महिने व्यापारी व नागरिकांना वेठीस धरून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील धारणगाव रस्त्यावरील १६ लाख रुपये खर्चाची गटार अवघ्या १६ दिवसातच निकृष्ट कामामुळे मातीमोल झाली याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरअभियंता घेणार का? केवळ प्रसिद्धीसाठी नातकीपणा करू नये.कोविडचे संकट मोठे असतांना नगरपालिका बैठकीत आम्ही प्राणवायू व्यवस्थेची अद्ययावत रुग्णवाहिका, एच.आर.सी.टी. स्कॅनिंग मशीन इत्यादी केलेल्या मागणीला बगल देवून स्वतःचा उदोउदो करण्याचे काम सध्या सुरू आहे असेही स्वप्नील निखाडे शेवटी म्हणाले.
Comments
Post a Comment