सुप्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ.कृष्णकुमार चोथाणी यांनी संस्थान रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले
शिर्डी -
राज्यात कोवीड १९ ची संभाव्य येणा-या तिस-या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधीत होण्याची शक्यता लक्षात घेवुन करावयाच्या उपाय-योजनांसाठी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीरामपुर येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ.कृष्णकुमार चोथाणी यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, शिर्डी ग्रामस्थ विजय कोते, श्री साईबाबा हॉस्पिटलचे प्र.वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, बालरोग तज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ, डॉ.अनंत भांगे, श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
सध्या कोरोना विषाणुची दुसरी लाट सुरु असून मोठया प्रमाणात संसर्ग वाढत आहे. तसेच यानंतर तिसरी लाट येणार असून या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधीत होणार असल्याचे मत विविध तज्ञांनी व्यक्त केलेले आहे. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी ही याबाबत राज्यातील आरोग्य व्यवस्था वाढवुन बालरोग तज्ञ यांची कमिटी स्थापन केलेली आहे. तसेच संस्थानच्या वतीने यापुर्वी कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी व उपचारांसाठी विविध उपाय योजना केलेल्या आहे. तिस-या लाटेची बाब लक्षात घेवुन करावयाच्या उपाय-योजनाकरीता हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात बालरोग तज्ञ डॉ.कृष्णकुमार चोथाणी म्हणाले की, सध्या देशात व राज्यात दुसरी लाट सुरु असून लवकरच तिसरी लाट येण्याबाबत तसेच या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे असे अनेक स्थरातुन भाकीत केले जात आहे. ही बाब गंभीरपणे हाताळणे गरजेचे आहे असे सांगुन यासाठी विशेष काळजी घेणे व योग्य औषधे आणि त्याचे प्रमाण याबाबत डॉ.चोथाणी यांनी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात बालरोग तज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ यांनी विविध उपाय-योजनाबाबत व उपचार पध्दती संदर्भात माहिती सादर केली. तसेच या चर्चासत्रास डॉ.चोथाणी हे उपस्थित राहील्याबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी त्यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment