सत्कार करणाऱ्या असंतुष्ट कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीशी दुरान्वये संबंध नाही- जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी
कोपरगाव प्रतिनिधी
सध्याच्या कोरोना परिस्थीतीमध्ये दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत रूग्णसेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आघाडीवर आहे. जिल्हयातही रूग्णसेवक म्हणून काम करतांना भाजपाचा कार्यकर्ता सर्वात पुढे आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मैदानात उतरून आपली रूग्णसेवा करत आहे, प्रत्यक्ष काम न करता कोणाला हार तुरे देणारे हे भाजपाचे कार्यकर्ते असूच शकत नाही.
ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नसून वर्षनुवर्षं काहींना काही कारणावरून पक्षाला बदनाम करनारे लोक आहे, त्यांचा भारतीय जनता पार्टीशी दुरान्वये संबंध नाही, असा खुलासा सरचिटणीस सुनिल वाणी यांनी केली आहे.
कोपरगाव येथे राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार यांचा भाजपा कार्यकर्त्यांनी सत्कार केला. अशा आशयाची बातमी प्रसिध्द झाली, यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सुनील वाणी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी हा विचारांचा पक्ष असुन त्याची ध्येय, धोरणे ही देशापासुन ते गावपातळीपर्यंत एकच आहे. त्या सर्व ध्येय धोरणांचे अनुकरण करून या पक्षाचा कार्यकर्ता काम करीत आहे. या धोरणांपासून लांब गेलेल्या व्यक्तींना या पक्षात थारा दिला जात नाही. असाच प्रकार कोपरगाव येथील कार्यकर्त्यांमध्ये दिसुन आल्याने अशा कार्यकर्त्यांनी यापुर्वीच पक्षातून काढून टाकलेले आहे. असे असतांना कोपरगाव मध्ये काही असंतुष्ट कार्यकर्त्यांकडून व्यक्तीद्वेषापोटी काहींना काही कारणावरून पक्षाला बदनाम करण्याच्या हेतुने हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप श्री वाणी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, सौ स्नेहलता कोल्हे यांनी गेली पाच वर्षं आमदार म्हणून काम केलेले असुन सध्या राज्य पातळीवर प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहे. परंतु ज्यांनी आजपर्यंत केवळ कागाळया करण्यात धन्यता मानली, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले, पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यात धन्यता मानली. त्यातील काही लोक पुढे येउन भारतीय जनता पार्टीला बदनाम करीत आहे. त्यांचा भारतीय जनता पार्टीशी कोणताही संबध नाही, त्यामुळे विरोधकांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केल्याच्या खोटया बातम्या पसरविलेल्या आहे. वास्तविक सत्कार करणाऱ्या त्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षाशी दुरान्वये संबंध नाही
Comments
Post a Comment