शहर व तालुक्याच्या परिसरात एक तास पावसाच्या सरी हवेत सुखद गारवा बारा मिलिमीटर पाऊस पडल्याची पाटबंधारे खात्याची नोंद
कोपरगाव प्रतिनिधी
शहर व तालुक्याच्या परिसरात एक ते दीड तास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने सुखद गारवा निर्माण झाला पडलेल्या पावसाने रस्ते घराचे छत गटारी स्वच्छ धुऊन गेल्या. कोपरगाव पाटबंधारे उपविभागात बारा मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे तर जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर पाच मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे तापमापक पारा 40 ते 42 अंशापर्यंत गेला होता आज पाऊस पडल्याने तो 36 ते 38 अंश काही प्रमाणात खाली आला. पावसाबरोबर सोसाट्याचा वारा ही जोरदार वाहत होता त्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या तर प्लॅस्टिक तावदाने उडून गेली शहरात असणारे रस्ते पडलेल्या पाण्यामुळे स्वच्छ धुऊन गेले तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे त्यातच दोन-अडीच तास वीज गायब झाली होती विजेच्या खेळखंडोबा मुळे नागरिकात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतात काढून ठेवलेले कांदा मिरच्या लसुन आदी पिके काही प्रमाणात भिजली गेली ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ झाली पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर तो बंगालच्या उपसागरात तसेच श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा वाढत असल्याने मान्सून वेगाने पुढे सरकत आहे त्यामुळे काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या संकटांची मालिका सुरूच असून कोरोना चे मोठे भूत जगाच्या मानगुटीवर बसले आहे त्यातून सावरत असताना चक्रीवादळाने अनेक ठिकाणी जोरदार तडाखा दिला आहे अशा मोठ्या संकटातून सर्वांना तारावे म्हणून अनेक जण देवाची प्रार्थना करीत आहेत .वीज वितरण कंपनीने शहर भागातील वीजवाहक तारांचे लगत असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी नुकतीच केली आहे .पडलेल्या पावसामुळे अल्हाददायक वातावरण तयार झाले होते हवेतील उष्णता कमी होऊन सुखद गारवा निर्माण झाला होता पडणाऱ्या पावसात अनेकांनी भिजण्याचा आनंद घेतला तर काहींनी आपल्या घरांच्या गच्चीवर मनमुराद नाचत पावसाच्या आगमनाची स्वागत केले.
Comments
Post a Comment