धोत्रे येथील तलाठी सुशील शुकला 28 हजार रुपयांची लाच घेताना अटकेत दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश वर्षभरात चार जण लाचलुचपत च्या जाळ्यात
कोपरगाव प्रतिनिधी
तालुक्यातील धोत्रे येथील तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (३३) यांना २८ हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.सदरची घटना २९ मे रोजी घडली . तालुक्यातील महसूल विभागातील तलाठ्यांवर नाशिक येथील लाचलुचपत विभागाची वक्रदुष्टी असून गेल्या सहा महिन्यात तिसरा तलाठी प्रवर्गातील कर्मचारी जाळ्यात सापडला आहे. तर वर्षभरात एकूण चार जण लाचलुचपत च्या जाळ्यात अडकले आहेत याआधी येसगाव येथील ज्योती कवळे महिला तलाठी व कुंभारी येथील तलाठी सुनील साबणे विरुद्ध कारवाई करण्यात आली होती. तर येथील सब जेलर असलेले रवींद्र देशमुख हेही लाचलुचपत मध्ये सापडले होते. सदर प्रकारामुळे महसूल विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सदर तलाठी शुक्ला यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे अशी माहिती सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी दिली .
याबाबत अधिक माहिती अशी,
याबाबत अधिक माहिती अशी,
तक्रारदार यांचे वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष ६८ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी २८ हजाराची लाच स्वीकारताना शुक्ला यांना शहरातील एका गॅस गोडाऊन लगत रंगेहात पकडण्यात आले. त्यामध्ये हश व्हाल्यू व फोटो घेण्यात आले.सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने व अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे व पोलीस अधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला अधिकरी पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस नाईक प्रवीण महाजन,गरुड,गवळी, कराड,चापोशी,जाधव या पथकाने केली आहे. एकंदरीत नाशिक लाचलुचपत विभागाच्या या धडाकेबाज कारवाईमुले महसूल विभागाचे धाबे दणाणले आहे.
ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल तहसीलदार योगेश चंद्रे तहसीलदार योगेश चंद्रे यांचे आजवरचे काम पाहता त्यांनी सर्व तलाठी व महसूलच्या सर्व कर्मचाऱ्यांना अनेकदा बैठका घेऊन समज दिली गोरगरिबांची कामे आडवु नका त्यांना त्रास देऊ नका अशी सक्त ताकीद दिली असतानाही हे कर्मचारी त्यांच हि ऐकत नाही या आधी एका ऑडिओ क्लिप प्रकरणात महसूल चे दोन कर्मचारी यांची विभागीय चौकशी लावलेली आहे तर आज लाचलुचपत मध्ये अडकलेला शुक्ला तलाठी व एका कर्मचाऱ्याची चौकशी लावण्यात आली होती त्यांना तीन वर्ष प्रमोशन मिळणार नसल्याचे तहसीलदार चंद्रे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment