Posts

Showing posts from May, 2021

दिनांक ३० मे, २०२१...आज ११४५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १४४० बाधितांची रुग्ण संख्येत भर...रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२४ टक्के

Image
अहमदनगर: जिल्ह्यात आज ११४५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४६५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७७ आणि अँटीजेन चाचणीत ३९८ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०५, जामखेड ६४, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण २७, नेवासा ५१, पारनेर ४९, पाथर्डी ४८, राहता २४, राहुरी ०१, संगमनेर ४३, शेवगाव ११७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०५ आणि इतर जिल्हा ०९ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४४, अकोले ०९, जामखेड ३२, कर्जत ४९, कोपरगाव ७१, नगर ग्रा.२४,  नेवासा ९४,  पारनेर २३, पाथर्डी ०८, र

नगरसेवकांना अंधारात ठेवुन प्रसिद्धीसाठी हपापलेल्या आमदार व नगराध्यक्षांनी शहर विकास कामांच्या उद्घाटनाची केली घाई- उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे

Image
कोपरगाव प्रतिनिधी नगरपरिषदेची २७ मे २०२१ रोजी स्थायी समितीची बैठक झाली त्यात कोपरगाव शहरातील विविध प्रभागातील विकास कामांना भाजपा सेना नगरसेवक सभापतींनी कुठल्याही प्रकारचे राजकारण न आणता बहुमताने मंजुरी दिली मात्र आमच्या नगरसेवकांना अंधारात ठेवून घाईघाईने प्रसिद्धीसाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी आमदार व नगराध्यक्षांनी आम्ही बहुमताने मंजूर केलेल्या कामाची उद्घाटने केली अशी टिका उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की सध्या कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात असतांना आमदार,नगराध्यक्ष यांनी शासकीय नियम उधळून लावत केवळ प्रसिद्धीसाठी विकासकामांची उद्घाटने केली हे बरोबर नाही.वास्तविक पाहता सदरचा निधी आणण्यात आमदारांचा कुठल्याही प्रकारचा संबध नसतांना नगरपालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पक्ष व शिवसेना नगरसेवकांनी बहुमताने विकास कामे मंजूर केली.मात्र केवळ राजकारण व प्रसिद्धीसाठी आमदार व नगराध्यक्षांनी भाजपा सेना नगरसेवकांना अंधारात ठेवून  विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे.आमदारांनी कोपरगाव शहरातील जनतेसाठी निधी मंजूर करून आणावा व खुशाल उद्घाटने करावी त्

शेतकरी हिताचा विचार करून जिल्ह्यातील बाजार समित्या तातडीने सुरू करा -माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी

Image
कोपरगाव प्रतिनिधी   शासन कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील बाजार समित्या वारंवार बंद करीत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा विकावा कसा या विवंचनेत शेतकरी सापडलेले असून आधीच गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन मुळे कांदा पिकाला योग्य भाव मिळालेला नाही तसेच सर्व शेतकरी बाधवांकडे उत्पादित केलेला कांदा साठविण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने आता पावसाळा येऊन ठेपलेला असताना कांद्याचे करायचे काय असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामधील कांद्याचे व भुसार मालाचे लिलाव तातडीने सुरु करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव ,माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.                                               कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला आहे .गेल्या वर्षी राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शेतकरी बांधवांनी उसासह कांदा  पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती,मात्र कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे आणि शासनाच्या वारंवार बाजार समित्त्या चालू बंद करण्याच्या धोरणा

कारखाना एक कुटुंब त्यासाठी एकनिष्ठता महत्त्वाची -पवार

Image
माजी मंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी परिसराच्या प्रगतीत विविध पैलूद्वारे योगदान देत साखर कारखान्याची उभारणी केली,  कारखाना एक कुटुंब आहे त्यासाठी एकनिष्ठता महत्त्वाची असे प्रतिपादन मुख्य लेखापाल एस. एन. पवार यांनी केले.             येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचेे लेखापाल बाजीराव उगले ३३  वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला.   त्याप्रसंगी ते बोलत होते.               याप्रसंगी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे, रासायनिक कार्यालयीन अधिक्षक धनुभाउ होन, आदि खातेप्रमुख, उप खाते प्रुमुख उपस्थित होते.  प्रारंभी उप मुख्य लेखापाल प्रवीण  टेमगर यांनी प्रास्ताविक केले.  श्री लक्ष्मण वर्पे, श्री. कळसकर,.   श्री अनील आव्हाड, श्री. भूसे यांनी उगले यांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला.              श्री एस. एन.  पवार पुढे म्हणाले की,  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यातील प्रत्येक कर्मचारी हा प्रगतीचा एक घटक आहे., कोपरगावच्या मातीला शंकरराव कोल्हे यांच

धोत्रे येथील तलाठी सुशील शुकला 28 हजार रुपयांची लाच घेताना अटकेत दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश वर्षभरात चार जण लाचलुचपत च्या जाळ्यात

Image
कोपरगाव प्रतिनिधी तालुक्यातील धोत्रे येथील तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (३३)  यांना २८ हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.सदरची घटना २९ मे रोजी घडली .  तालुक्यातील महसूल विभागातील तलाठ्यांवर नाशिक येथील लाचलुचपत विभागाची वक्रदुष्टी असून गेल्या सहा महिन्यात तिसरा तलाठी प्रवर्गातील कर्मचारी जाळ्यात सापडला आहे. तर वर्षभरात एकूण चार जण लाचलुचपत च्या जाळ्यात अडकले आहेत याआधी येसगाव येथील ज्योती  कवळे महिला तलाठी व कुंभारी येथील तलाठी सुनील साबणे विरुद्ध कारवाई करण्यात आली होती. तर येथील सब जेलर असलेले रवींद्र देशमुख हेही लाचलुचपत मध्ये सापडले होते. सदर प्रकारामुळे महसूल विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सदर तलाठी शुक्ला यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे अशी माहिती सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी दिली .                                                याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष ६८ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी २८ हजाराची लाच स्वीकारताना शुक्ला यांना शह

पोहेगाव कोविड सेंटर मुळे परिसरातील कोरोणा संसर्ग रोखण्यात यश... तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी कोविड सेंटर सज्ज... औताडे

Image
कोपरगाव प्रतिनिधी तालुक्यात महिन्यापूर्वी कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. पोहेगांव परिसरातही कोरोना रुग्णांचे प्रमाण प्रचंड होते.  शहरा पाठोपाठ ग्रामीण भागातही कोविड सेंटर उभारून पोहेगांव परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोहेगाव येथे सेंटर सुरू करण्यात आले. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत औषध उपचार , जेवणाची  व्यवस्था, मनोरंजनासाठी कोरोना रुग्णांच्या प्रत्येक हॉलमध्ये एलसीडी टीव्हीची व्यवस्था, मानसिक आधार या सर्व उपाययोजनाच्या जीवावर  पोहेगाव कोविड सेंटरने परिसरातील कोरोणा संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेचा मुकाबला करण्यासाठी पोहेगाव कोविड सेंटर सज्ज असल्याचे कोविड सेंटरचे मार्गदर्शक शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी सांगितले.त्यांनी पोहेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन बडदे, डॉ राहुल गुडघे, डॉ.सुनिल मेहेत्रे, डॉ. जगदीश झंवर, डॉ. नितीन गवळी, डॉ उषा गवळी, डॉ.आनंद काळे, डॉ.घनश्याम  गोडगे, डॉ.नरेंद्र होन, डॉ रावसाहेब जावळे, डॉ गोरक्षनाथ रोकडे यांची भेट घेऊन परिसराती

परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर-कैलास जाधव

Image
कोपरगाव प्रतिनिधी राज्यातील सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान  देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही राज्य सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर लाभधारकांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन कोपरगाव तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर म्हणाले, रिक्षा परवाना धारकांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा करता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत   विकसित केलेल्या या प्रणालीची माहिती विभागाच्या  www.transport.maharashtra.gov. in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. त्यानंतर रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची खातरजमा करण्यात येईल. ती झाल्यानंतर आधार क्रमांकाशी

शहर व तालुक्याच्या परिसरात एक तास पावसाच्या सरी हवेत सुखद गारवा बारा मिलिमीटर पाऊस पडल्याची पाटबंधारे खात्याची नोंद

Image
कोपरगाव प्रतिनिधी शहर व तालुक्याच्या परिसरात एक ते दीड तास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने सुखद गारवा निर्माण झाला पडलेल्या पावसाने रस्ते घराचे छत गटारी स्वच्छ धुऊन गेल्या. कोपरगाव पाटबंधारे उपविभागात बारा मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे तर जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर पाच मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे तापमापक  पारा 40 ते 42 अंशापर्यंत गेला होता आज पाऊस पडल्याने तो 36 ते 38 अंश  काही प्रमाणात खाली आला. पावसाबरोबर सोसाट्याचा वारा ही जोरदार वाहत होता त्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या तर प्लॅस्टिक तावदाने उडून गेली शहरात असणारे रस्ते पडलेल्या पाण्यामुळे स्वच्छ धुऊन गेले तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे त्यातच दोन-अडीच तास वीज गायब झाली होती विजेच्या खेळखंडोबा मुळे नागरिकात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतात काढून ठेवलेले  कांदा मिरच्या लसुन आदी पिके काही प्रमाणात भिजली गेली ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ झाली पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार अंदमानात

दिनांक २८ मे, २०२१...आज २२९६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १४०८ बाधितांची रुग्ण संख्येत भर...रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२१ टक्के

Image
अहमदनगर: जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २४८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१० आणि अँटीजेन चाचणीत ५५० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले ५५, जामखेड ४७, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर २९, पाथर्डी ०२, राहुरी ०१, संगमनेर २८, शेवगाव ५७, श्रीगोंदा ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८, अकोले २२, जामखेड ३१, कर्जत ३०, कोपरगाव ५२, नगर ग्रा.४६,  नेवासा १५,  पारनेर ५०, पाथर्डी १५, राहाता १५,  राहुरी ५५, संगमनेर ७०, शेवगाव ६९, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर ५०, कॅंटोन्मेंट

सुप्रसिध्‍द बालरोगतज्ञ डॉ.कृष्‍णकुमार चोथाणी यांनी संस्‍थान रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले

Image
शिर्डी -  राज्‍यात कोवीड १९ ची संभाव्‍य येणा-या तिस-या लाटेत लहान मुले जास्‍त प्रमाणात बाधीत होण्‍याची शक्‍यता लक्षात घेवुन करावयाच्‍या उपाय-योजनांसाठी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या चर्चासत्रात श्रीरामपुर येथील सुप्रसिध्‍द बालरोग तज्ञ डॉ.कृष्‍णकुमार चोथाणी यांनी रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे ,  उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे ,  प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे ,  शिर्डी ग्रामस्‍थ विजय कोते ,  श्री साईबाबा हॉस्पिटलचे प्र. वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे ,  श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे ,  बालरोग तज्ञ डॉ.उज्‍वला शिरसाठ ,  डॉ.अनंत भांगे ,  श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.   सध्‍या कोरोना विषाणुची दुसरी लाट सुरु असून मोठया प्रमाणात संसर्ग वाढत आहे. तसेच यानंतर तिसरी लाट येणार असून या लाटेत लहान मुले जास्‍त प्रमाणात बाधीत होणार असल्‍याचे मत विविध तज्ञांनी व्‍यक्‍त केलेले आहे. तसेच याबाबत र

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक आवश्यक...प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन

Image
अहमदनगर: गेले सलग काही दिवस दिवस जिल्ह्यात २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या दररोज होत आहेत. आगामी काही दिवस याच पद्धतीने चाचण्या करुन बाधितांचा शोध घ्या आणि कोरोना संसर्ग साखळी तोडा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत घट दिसून येत असली तरी यंत्रणांनी अधिक व्यापक स्वरुपात चाचण्यांची गती वाढवावी. नागरिकांनीही कोविड सुसंगत वर्तणुकीचा अवलंब करुन संसर्ग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि आपला जिल्हा कोरोनापासून सुरुक्षित राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न   करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले दैनंदिनरित्या तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना आणि त्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी, करावयाची कार्यवाही आदींबाबत आढावा घेत आहेत. आज दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील,

राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला तिसऱ्यांदा पुरस्कार साधून केली विजयाची हॅट्रिक

Image
कोपरगाव प्रतिनिधी तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर बिगर शेती सहकारी पतसंस्थेला नाशिक विभागात १ ते १० कोटी रुपयांच्या गटात सन २०१९-२० या वर्षतील प्रथम क्रमांकाचा तिसऱ्यांदा मानाचा दीपस्तंभ पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांचे  हस्ते ऑनलाइन प्रदान करण्यात आला. राघवेश्वर पतसंस्थेने कुंभारी गावचाच नव्हे, तर नाशिक विभागाची महाराष्ट्र राज्यात मान उंचावली आहे. सदरचा पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ निलकंठ,अशोक वारुळे, सतीश निळकंठ यांनी स्वीकारला. पतसंस्थेचा सुव्यवस्थित कारभार व संस्थेचा आर्थिक निकषावर म्हणजेच सहकार कायद्याच्या चौकटीत काम सातत्याने ठेव कर्ज वृद्धी कडक वसुली, थकबाकी अत्यल्प प्रमाण, योग्य व सुरक्षित गुंतवणूक सुरक्षित कर्ज वाटप, लेखा  परीक्षणात सतत अ दर्जाचा वर्ग कायम राखत कोरोना काळात ग्राहकांना दिलेली सेवा, सामाजिक काम, या गोष्टी विचारात घेऊन निवड समितीने सदर पुरस्कारासाठी निवड केली. कोपरगाव तालुक्यातील कुंभारी सारख्या अतिग्रामीण भागात अडीच ते तीन हजार लोकवस्ती असलेल्या खेडे गावात राघवेश्वर पतसंस्थेने ग्राम

दिनांक २७ मे, २०२१...आज २५७२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १६१० बाधितांची रुग्ण संख्येत भर...रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८३ टक्के

Image
अहमदनगर: जिल्ह्यात आज २५७२ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४० हजार ९५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२ हजार ८०५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७३८ आणि अँटीजेन चाचणीत ६७१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, अकोले ५६, जामखेड ०१, कोपरगाव ११, नगर ग्रामीण २०, नेवासा १५, पारनेर ०३, पाथर्डी २९, राहता ०५, राहुरी २०, संगमनेर १६, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७९, अकोले १४, जामखेड ६१, कर्जत ४१, कोपरगाव ५५, नगर ग्रा.४५,  नेवासा १०५,  पारनेर २२, पाथर्डी १०, राहाता २६,  राहुरी ७७, संगमनेर ६१, शेवगाव ८२, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ४१, कॅंटोन्

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

Image
अहमदनगर :   जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र ,  अद्यापही जिल्ह्यातील  नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.   जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना आणि त्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी ,  करावयाची कार्यवाही आदींबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर ,  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,  महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे ,  निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित ,  नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले ,  उर्मिला पाटील ,  पल्लवी निर्मळ ,  जयश्री आव्हाड ,  रोहिणी नऱ्हे ,   जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे

सत्कार करणाऱ्या असंतुष्ट कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीशी दुरान्वये संबंध नाही- जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी

Image
कोपरगाव प्रतिनिधी सध्याच्या कोरोना परिस्थीतीमध्ये दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत रूग्णसेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आघाडीवर आहे. जिल्हयातही रूग्णसेवक म्हणून काम करतांना भाजपाचा कार्यकर्ता सर्वात पुढे आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मैदानात उतरून आपली रूग्णसेवा करत आहे, प्रत्यक्ष काम न करता कोणाला हार तुरे देणारे हे भाजपाचे कार्यकर्ते असूच शकत नाही. ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नसून वर्षनुवर्षं काहींना काही कारणावरून पक्षाला बदनाम करनारे लोक आहे, त्यांचा भारतीय जनता पार्टीशी दुरान्वये संबंध नाही, असा खुलासा सरचिटणीस सुनिल वाणी यांनी केली आहे. कोपरगाव येथे राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार यांचा भाजपा कार्यकर्त्यांनी सत्कार केला. अशा आशयाची बातमी प्रसिध्द झाली, यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सुनील वाणी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी हा विचारांचा पक्ष असुन त्याची ध्येय, धोरणे ही देशापासुन ते गावपातळीपर्यंत एकच आहे. त्या सर्व ध्येय धोरणांचे अनुकरण करून या पक्षाचा कार्यकर्ता काम करीत आहे. या धोरणांपासून लांब गेलेल्या व्यक्त

कोरोना योद्धा म्हणून काम करणा-या नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना ५ लाखाचे विमा कवच देण्यासह विविध विभागाच्या विकास कामांना स्थायी सभेमध्ये मंजूरी –भारतीय जनता पार्टी व शिवसेना नगरसेवकांची माहीती

Image
कोपरगांव प्रतिनिधी कोरोना काळात नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी कोरोना योद्धे म्हणून काम करणा-या कर्मचा-यांचा 5 लाखाचा विमा,नगरपरिषदेमार्फत एच.आर.सी.टी स्कॅनींग मशीन,ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर,अद्यावत कार्डीयाक अँम्बुलन्स  तसेच  नगरपरिषदेच्या विविध विभागांतर्गत येणा-या विकास कामांना दिनांक 27. रोजी झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेमध्ये मंजुरी दिल्याची माहिती  उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे,भाजपा गटनेते रविंद्र पाठक व शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी दिली असून यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.              राज्यात गेल्या एक ते दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे बाधीत झालेल्या गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना नगरपरिषदेमार्फत आरोग्यविषयक पुरेशा सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही त्यातच कोरोनाच्या     दुस-या लाटेमुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे..भारतीय जनता पार्टी,शिवसेना युतीच्या सर्व नगरसेवकांनी गेल्या अनेक दिवसापांसून नगरपरिषदेकडे  आरोग्य विषयक सुविधा शहरवासियांना पुरविण्यात याव्यात अशी मागणी वारंवार केली त्या मागणीस आजच्या ऑनलाईन सभेमध्ये ठेवलेल्या सर्व विषयांना