दिनांक २९ एप्रिल, २०२१... आज ३१३० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २९३५ बाधितांची रुग्ण संख्येत भर... रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७२ टक्के
अहमदनगर: जिल्ह्यात आज ३१३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ६५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २९३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ४६४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७९४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२४२ आणि अँटीजेन चाचणीत ८९९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९, जामखेड ११८, कर्जत ५८, कोपरगाव ६१, नगर ग्रामीण ५१, नेवासा ३२, पारनेर २४, पाथर्डी ७०, राहता ९२, राहुरी २४, संगमनेर ०२, शेवगाव ९८, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर ३५, कॅंटोन्मेंट बोर्ड ५०, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४५८, अकोले ०३, जामखेड ०९, कर्जत १६, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण १७८, नेवासा २७, पारनेर २४, पाथर्डी ३०, राहाता ७४, राहुरी ४५, संगमनेर २०५, शेवगाव १२, श्रीगोंदा ४८, श्रीरामपूर ६२, कॅंटोन्मेंट बोर्ड १७ आणि इतर जिल्हा २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ८९९ जण बाधित आढळुन आले. मनपा १६०, अकोले ०८, जामखेड २६, कर्जत ०४, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ७८, नेवासा ४१, पारनेर ५५, पाथर्डी ०५, राहाता ९४, राहुरी १२९, संगमनेर ४०, शेवगाव १८ श्रीगोंदा १६८, श्रीरामपूर १३, कॅंटोन्मेंट ०८ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ५९८, अकोले १९७, जामखेड ६६, कर्जत ३३६, कोपरगाव १७७, नगर ग्रामीण २१३, नेवासा १३७, पारनेर ४०, पाथर्डी १३९, राहाता ३०१, राहुरी १५४, संगमनेर २२६, शेवगाव १३६, श्रीगोंदा १२८, श्रीरामपूर १७४, कॅन्टोन्मेंट २४, मिलिटरी हॉस्पिटल १३, इतर जिल्हा ६९ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:१,४६,६५८
उपचार सुरू असलेले रूग्ण:२२४६४
मृत्यू:१९६५
एकूण रूग्ण संख्या:१,७१,०८७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
Comments
Post a Comment