संजीवनी कोविड केअर सेंटर कोरोना रुग्णांचे बनणार आरोग्य आधार केंद्र - प्रातांधिकारी गोविंद शिंदे
कोपरगांव प्रतिनिधी
संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने कोल्हे परिवाराच्या देखरेखीखाली कोरोना रुग्णांसाठी सुरु केलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये उत्तम नियोजन केलेले असुन तेथे वैद्यकीय उपचार घेणा-या रुग्णांचे आरोग्य जपण्यास निष्चितच मदत होणार आहे. गोरगरिबांसाठी चे आधार केंद्र आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी. गोविंद शिंदे यांनी केले.
आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने सुरु केलेल्या कोविड सेंटरला श्री शिंदे यांनी भेट दिली यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रषांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते, डाॅ. वैशाली आव्हाड, संजीवनी कोविड केअर सेंटरचे समन्वयक उपस्थित होते.
प्रातंधिकारी श्री. शिंदे पुढे म्हणाले की, गोरगरीब कोरोना रुग्णांना निश्चितच येथे चांगले उपचार मिळतील अशी व्यवस्था संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने केली आहे. या कामासाठी प्रशासनाच्या वतीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील. रुग्णाचा प्राथमिक अहवाल हा सकारात्मक आल्यास तात्काळ संजीवनी कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होवुन उपचार घ्यावा. कोरोना ची रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येणारा काळ कसोटीचा आहे. 400 बेड चे सुरु केलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपचार देण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था केली असल्याचे शिंदे म्हणाले. प्रांतधिकारी शिंदे व उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांनी कोविड सेंटरमधील बेड व्यवस्थेसह इतर उपलब्ध करुन दिलेल्या सोयी सुविधांची पाहणी करुन रुग्णांच्या उपचारा बरोबर त्यांचे आरोग्य आबाधित ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे पाहुन समाधान व्यक्त केले.
Comments
Post a Comment