कोरोना काळात मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम योगोपचार महत्त्वाचा: योगतज्ञ उत्तमभाई शहा.


कोरोना महामारी संकटाचे हे दुसरे वर्ष.  त्यात माणुसकी हरवत चालली आहे.   मनुष्याला शाश्वत मार्ग सापडत नसल्याने तो सैरभैर झाला आहे तेव्हा कोरोना काळात मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम योगोपचार महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन ऐंशी वर्षाचे चिरतरुण योगतज्ञ उत्तमभाई शहा यांनी केले.
         कोपरगावचे  योगगुरू उत्तम भाई शहा यांचा बुधवारी 80 वा वाढदिवस त्यानिमित्त आमच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेऊन शुभेच्छा देत त्यांच्या भावना जाणून घेतल्या त्याप्रसंगी ते बोलत होते.

         चिरतरुण, हसमुख, प्रसन्न आणि नेहमीच विनाशुल्क योगोपचार याबद्दल मार्गदर्शन करून उच्चपदस्थ, राजकारणी, बडी सिनेमा कलावंत हस्ती, संत-महंत आदीपासून ते पहिली -दुसरीच्या मुला-मुलींना योगोपचाराचे धडे देऊन त्यांच्या प्रत्येक समस्येचे निरसन करणारे योगतज्ञ म्हणून उत्तमभाई शहा यांची आजही ख्याती आहे.   वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाली तरी त्यांनी योगोपचारiची साथ कधीच सोडली नाही.   सकाळ, संध्याकाळ त्यांची योगसाधना याही वयात सूरू आहे.   आता योग साधनेचे धडे देण्यात त्यांची दुसरी पिढी त्यांच्या मुलाचे रूपाने काम करत आहे.
        कोरोना महामारी संसर्ग गेल्या मार्चपासून सुरू झाला आणि त्यामुळे मानवी पिढीमध्ये नैराश्याचे  प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.   माणूस माणसापासून दूर चालला.   व्यावसायिकता आणि त्यांच्याभोवती निर्माण झालेली कोंडाळी तुम्ही आम्हाला सोडत नाही.   त्यातून नको ते प्रश्न आणि नको त्या समस्या निर्माण झाल्या आहेत.   आज प्रत्येक जण भौतिक सुखाच्या परिपूर्णते  साठी शारीरिक स्वास्थ हरवत चालला आहे,  जर शारीरिक स्वास्थ मजबूत राहिले तर हे विश्व तुम्हाला जवळून पाहता येईल अन्यथा सगळे व्यर्थ आहे.

         जागतिक महामारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकसंख्येच्या मानाने जगात दुसर्‍या स्थानी असलेला आपला भारत देश आज सैरभैर झाला आहे.   जो तो प्रशासकीय व्यवस्थेला नावे ठेवून लापरवाही जीवन जगत आहे.   या लापरवाही मुळे स्वतःबरोबर दुसऱ्यांचे अनमोल जीवन धोक्याच्या ठिकाणी पडू लागले आहे.  कोरोणाने मृत्यूच्या घराचा रस्ता अगदी तुमच्या पाया जवळ आणून ठेवला आहे.   तरीही मनुष्य गुरफटलेल्या अवस्थेत आहे. तुम्हा आम्हाला  या संकटावर मात करावयाची असेल तर योग, प्राणायाम ही जीवनशैली प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.   योग व्यायामासाठी प्रत्येकाने वेळ काढलाच पाहिजे.   मला हे काम आहे आणि त्यामुळे योग प्राणायाम जमत नाही हे म्हणणे  कोरोनाला जवळ करणे होय. कोरोनाणे अनेकांना आपले जीवन कसे जगायचे याचा धडा दिला आहे, तरीही आपण त्यापासून काही शिकत नाही म्हणजे आपण किती निष्काळजी बनलो आहे हेच या ठिकाणी आपल्याला सांगावेसे वाटते.   जागतिक कीर्तीचे योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी योग साधनेतून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी शिकवल्या टीप्स दिल्या त्या प्रत्येकाने आत्मसात केल्यास निश्चितच उद्याची पिढी सशक्त निरोगी व योगमय झालेली दिसेल असे सांगत त्यांनी चर्चेचा शेवट केला, व कोरोणा पासून दूर राहावे असे आपल्याला वाटत असल्यास आजपासूनच प्राणायाम आणि योग साधना करण्याचा निश्चय करा व सशक्त भारताचे स्वप्न साकार करा असेही शेवटी योगतज्ञ उत्तम शहा यांनी सांगितले.
योगतज्ञ उत्तम भाई शहा यांचा मुलगा अभिजित शहा पत्नी धनवंती शहा व पुणे येथील मुलगी अर्चना कोठारी हेसुद्धा योगात शिकवण्यात माहीर असून त्यांच्याकडे अनेक जण योगाचे धडे घेत आहेत काहींनी योगा शिकून त्यातून अनेक जण व्याधीमुक्त झाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"